दहावी बारावी नंतर पुढे काय ? लेखांक २०

१२ वी नंतर Home Science मध्ये करिअर करायचंय ?
विद्यार्थीनींना इयत्ता बारावी नंतर Home Science या विषयात तीन वर्षांमध्ये पदवी संपादन करून विविध क्षेत्रात पदार्पण करता येते. तसेच पुढे शिक्षण घेऊन सर्वोच्च पदवी संपादन करता येते. आपल्या कुटुंबाला देखील आपल्या शिक्षणाचा उपयोग करता येईल असा दुहेरी फायदा या पदवीचा होऊ शकतो हे विद्यार्थीनींनी लक्षात घ्यावे. एका वेगळ्या पदवीची ओळख आजच्या लेखात दिली आहे. लेखमालेतील यापूर्वीचे लेख वाचण्यासाठी लेखाच्या शेवटी लिंक दिलेल्या आहेत. जिज्ञासूंनी याचा लाभ घ्यावा.
- श्री. भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा
प्रा. देविदास गिरी, उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय

मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरी
उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय
संपर्क : 9822478463

Home Science मध्ये करिअर करण्याची विद्यार्थिनींना सुवर्णसंधी

गृहविज्ञान ( Home Science )
इयत्ता अकरावी, बारावी झाल्यानंतर कोणत्याही शाखेच्या म्हणजेच कला, वाणिज्य, विज्ञान, एमसीव्हीसी, होम सायन्स मध्ये अकरावी, बारावी झालेल्या विद्यार्थीनी Home Science मध्ये पदवीधर होऊ शकतात. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई आदी महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये Home Science मध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवी तसेच पुढील शिक्षण घेऊ शकतात.

Home Science मधील विषय
यामध्ये Food Science and Nutrition, Textile Science and Clothing, Resource Management, Human Development, Extension Education  and Communication आदी विषयांमध्ये स्पेशलायजेशनची सोय आहे. इयत्ता बारावी नंतर विद्यार्थिनी  Home Science मध्ये F. Y. B. Sc, S. Y. B. Sc, T. Y. B. Sc. या तीन वर्षांचा पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात. आपल्या उत्तर महाराष्ट्रात नाशिक येथे गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एस. एम. आर. के. महिला महाविद्यालयात Home Science मध्ये पदवी स्तरावरील अभ्यासक्रम शिकविला जातो हे विद्यार्थीनींनी लक्षात घ्यावे.

Home Science  मधील पदव्युत्तर पदवी
Home Science मध्ये पदवी संपादन केलेल्या विद्यार्थीनी पुढे Home Science मध्ये पदव्युत्तर पदवी घेऊ शकतात. या पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम दोन वर्षांचा असतो. M. Sc. Home Science First Year आणि M. Sc. Home Science Second Year.

SET,  NET
पदव्युत्तर पदवी संपादन केल्यानंतर विद्यार्थीनी State  Eligibility Test ( SET ), National Eligibility Test ( NET ) परीक्षा देऊन वरिष्ठ महाविद्यालयात अथवा विद्यापीठात Home Science या विषयाच्या सहायक प्राध्यापक पदासाठी पात्र होतात.

JRF
विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली यांच्यातर्फे घेतल्या जाणाऱ्या Junior Research Fellowship म्हणजेच जेआरएफ कनिष्ठ संशोधन शिष्यवृत्ती ही परीक्षा देऊन पुढे पीएचडी करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाची ( University Grants Commission ) शिष्यवृत्ती मिळवू शकतात. त्यासाठी JRF ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते.

PET
ज्या विद्यार्थीनींना JRF परीक्षेत यश मिळत नाही पण पीएचडी अभ्यासक्रम करावयाचा आहे अशा विद्यार्थीनींसाठी Ph. D. Entrance Test ( PET ) देऊन या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो.

नोकरीच्या संधी
Home Science मध्ये पदवी, पदव्युत्तर पदवी संपादन केल्यानंतर विद्यार्थीनींना अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यामध्ये खालील विषयांचा समावेश आहे.
1. Teacher in Education Institution .
2. Assistant Professor .
3. Dietician
4. Food Product .
5. Health Educator.
6. Event Managers.
7. Self – Employment- Day Care Center, Play School Franchise
8. Fashion Coordinator.
9. Fashion and Costume designer.
10. Textile and Fashion Industry.
11. Consultant Health  Club, Gymkhana.
12. Working with Creative Media.
13. Recreation Center Management.

थोडक्यात
विद्यार्थीनींना वेगळ्या क्षेत्रातल्या या वाटा नव्या वाटतील. परंतु चांगला विचार केल्यास आपल्या घरातील सदस्यांना देखील या अभ्यासक्रमाचा उपयोग होईल. त्याचप्रमाणे आजच्या नव्या युगातील अनेक संधी या अभ्यासक्रमातून मिळविता येतील हे लक्षात घ्यावे.         

( लेखक इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयाचे उपप्राचार्य असून स्पर्धा परीक्षांचे महाराष्ट्रातील नामवंत लोकप्रिय मार्गदर्शक आहेत. विविध विषयांवर त्यांची विविध मार्गदर्शक पुस्तके प्रसिद्ध आहेत. )

लेखांक १ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/1815

लेखांक २ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/1838

लेखांक ३ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/1887

लेखांक ४ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/1921

लेखांक ५ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/1965

लेखांक ६ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2018

लेखांक ७ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2030

लेखांक ८ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2067

लेखांक ९ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2090

लेखांक १० साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2132

लेखांक ११ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2157

लेखांक १२ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2204

लेखांक १३ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2238

लेखांक १४ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2244

लेखांक १५ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2292

लेखांक १६ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2317

लेखांक १७ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2356

लेखांक १८ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2392

लेखांक १९ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2404

Similar Posts

8 Comments

Leave a Reply

error: Content is protected !!