दहावी बारावी नंतर पुढे काय ? लेखांक २४

12 वी नंतर B. Sc. हॉस्पिटॅलिटी अँड हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये करिअरच्या संधी

इयत्ता बारावी नंतर राष्ट्रीय पातळीवरील B. Sc. हॉस्पिटॅलिटी अँड हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पदवी संपादन करून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील हॉटेल व्यवसायाच्या क्षेत्रात उच्च पगाराची नोकरी उमेदवार प्राप्त करू शकतो. हे सांगणारा लेख देत असून लेखमालेतील यापूर्वीचे लेख वाचण्यासाठी ह्या लेखाच्या शेवटी लिंक दिल्या आहेत. जिज्ञासूंनी याचा लाभ घ्यावा.
- श्री. भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा
प्रा. देविदास गिरी, उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय

मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरी
उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय
संपर्क : 9822478463

12 वी नंतर B. Sc. हॉस्पिटॅलिटी अँड हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये करिअरची संधी

B. Sc. हॉस्पिटॅलिटी
इयत्ता बारावी कोणत्याही शाखेतील विद्यार्थी या पदवीसाठी प्रवेश घेऊ शकतात. भारतातून या पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रवेशासाठी उत्सुक असतात. पदवी संपादन केल्यानंतर चांगल्या पगाराची नोकरी प्राप्त करता येते. भारतातील हा हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशन क्षेत्रातला महत्त्वाचा आणि दर्जेदार अभ्यासक्रम होय.

प्रवेश प्रक्रिया
नॅशनल कौन्सिल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीशी ( NCHMCT ) संलग्न असलेला  B. Sc. हॉस्पिटॅलिटी अँड हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशन असे या पदवी अभ्यासक्रमाचे नाव आहे. यासाठी एनटीए ( National Testing Agency ) मार्फत या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची परीक्षा घेतली जाते. राष्ट्रीय स्तरावरील ही परीक्षा होय.

अभ्यासक्रमाचे स्वरूप
प्रवेश परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेनुसार प्रवेश मिळतो. हा पदवी अभ्यासक्रम तीन वर्षांचा असून वयोमर्यादा २५ असून एससी, एसटी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादा २८ ही होय. हा अभ्यासक्रम पूर्णवेळ असून Internship आवश्यक असते.

प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम
या प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम पाच घटकांवर आहे. ते याप्रमाणे :
1. Numerical Ability & Analytical Aptitude.
2. Reasoning & Logical Deduction.
3. General Knowledge & current Affairs.
4. English Language.
5. Aptitude for Service.
या पाच अभ्यास घटकांवर 200 प्रश्न विचारले जातात. यासाठी एकूण गुण 200 असतात. प्रश्नांचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी स्वरूपाचे असते. यासाठी तीन तासांचा वेळ असतो. परीक्षेचे माध्यम हिन्दी किंवा इंग्रजी असते. उमेदवार कोणत्याही एका भाषेची निवड करू शकतो. ही परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्याच्या समुपदेशनानंतर ( Counseling ) प्रवेशासाठी निवड होते.

पदवी अभ्यासक्रमाचे स्वरूप
या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमात :
1. Food Production.
2. Hospitality Management.
3. Front office Foundation.
4. Business Communication .
5. Food and Beverage Service .
6. Tourism.
7. Food Science.
8. Nutrition
9. Hotel Economics
इत्यादी यासारखे विषय असतात. इंग्रजी भाषेला प्राधान्य दिले जाते. पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पंचतारांकित हॉटेल सारख्या सेवांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध असतात.

पदवीनंतर नोकरीच्या संधी
ही पदवी संपादन केल्यानंतर 
1. Front office Manager.
2. General Manager.
3. Chef .
4. Customer Relationship Manager.
5. Kitchen Management.
6. Cabin Crew etc.
या पदांसाठी पदवी प्राप्त उमेदवार पात्र असून
1. Hotels
2. Restaurants
3. Resorts
4. Cruise Liners
5. Airlines
6. Catering Companies
7. Travel and Tourism Companies इत्यादींमध्ये हे जॉब उपलब्ध असतात.

( लेखक इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयाचे उपप्राचार्य असून स्पर्धा परीक्षांचे महाराष्ट्रातील नामवंत लोकप्रिय मार्गदर्शक आहेत. विविध विषयांवर त्यांची विविध मार्गदर्शक पुस्तके प्रसिद्ध आहेत. )

◆ लेखमालेतील १ ते १९ ह्या लेखांसाठी खालील लेखांक २० च्या शेवटी सर्व लिंक दिल्या आहेत. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.

https://igatpurinama.in/archives/2428

लेखांक २१ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2460

लेखांक २२ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2484

लेखांक २३ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2500

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!