मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरी
उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय
संपर्क : 9822478463
■ सायन्स मधील महत्त्वाची संधी
इयत्ता बारावी सायन्सचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात NEET ( National Eligibility cum Entrance Test – UG ) या परीक्षेची तयारी इयत्ता अकरावी सायन्स या वर्गाला प्रवेश घेतल्यापासूनच करतात. अनेक विद्यार्थ्यांनी शालेय वयातच आपण डॉक्टर व्हायचे असे स्वप्न मनाशी ठरविलेले असते. त्यांना त्यांच्या पालकांचे देखील मार्गदर्शन आणि पाठिंबा असतो.
■ परीक्षेचे महत्त्व
NEET ची तयारी करणारे विद्यार्थी या परीक्षेच्या अभ्यासक्रमावर फोकस करताना दिसतात. या परीक्षेला दरवर्षी भारतातून पंधरा लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी बसतात. भारतातील सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये ही परीक्षा जरी अवघड असली तरी विद्यार्थी आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचे ध्येय म्हणून जिद्दीने, नियोजनपूर्वक, अभ्यासात सातत्य ठेऊन तयारी करतात. हे या ठिकाणी सर्वात महत्त्वाचे होय.
■ NEET उत्तीर्ण झाल्यानंतर..!
ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर
1. Medical – MBBS
2. Dental – BDS
3. AYUSH – Ayurveda, Yoga and Naturopathy, Unani Siddha and Homeopathy – BAMS, BUMS, BHMS या वैद्यकीय अभ्यासक्रमांना AIIMS ( All India Institute Medical Science ), शासकीय आणि खाजगी वैद्यकिय महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना कट ऑफ गुणांच्या आधारे प्रवेश मिळतो. NTA म्हणजेच National Testing Agency मार्फत ही परीक्षा दरवर्षी घेतली जाते.
■ NEET साठी पात्रता
या परीक्षेला प्रवेश मिळण्यासाठी PCB ग्रुप बारावीला असणे आवश्यक आहे. बारावी बोर्डात या ग्रुपला जनरल विद्यार्थ्यांसाठी पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक गुण असणे आवश्यक आहे तर ओबीसी, एससी, एसटी आदी प्रवर्गांसाठी चाळीस टक्के गुणांपेक्षा अधिक गुण असणे आवश्यक आहे.
■ परीक्षा पॅटर्न
NEET परीक्षेसाठी ऑफलाईन परीक्षा असून यासाठी एकच प्रश्नपत्रिका असते. ही प्रश्नपत्रिका एकूण सातशे वीस गुणांची असते. यामध्ये
1. Biology 90 प्रश्न 360 मार्क
2. Physics 45 प्रश्न 180 मार्क
3. Chemistry 45 प्रश्न 180 मार्क
याप्रमाणे प्रत्येक प्रश्नाला चार गुण असतात. एकूण प्रश्नांची संख्या 180 असते. या परीक्षेला Negative Marking असून बरोबर येणाऱ्या प्रश्नाला चार गुण मिळतात. चुकीच्या प्रश्नासाठी मिळणारे गुण + 1 गुण असे गुण वजा होतात. या परीक्षेसाठी तीन तासांचा वेळ असतो.
■ अभ्यासक्रम
या परीक्षेचा अभ्यासक्रम हा इयत्ता अकरावी व बारावी विज्ञान शाखेचा CBSE Board साठी NCERT ने तयार केलेला Physics, Chemistry व Biology चा अभ्यासक्रम असतो हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे.
■ परीक्षेची तयारी
या परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीची परीक्षा संपल्यापासूनच तयारीला सुरुवात करावी. अभ्यासात सातत्य, अभ्यासाचे नियोजन, कष्ट घेण्याची तयारी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे NEET च्याच अभ्यासक्रमावर फोकस करणे गरजेचे आहे. विषयातील संकल्पना मुळातच समजावून घेणे याला अनन्यसाधारण महत्त्व होय. तसेच ‘माझे हे ध्येय आहे आणि ते मी मिळविणारच’ ही भूमिका असणे आवश्यक आहे. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेतल्यास परीक्षा फार अवघड नाही. यामध्ये यश तुमचेच आहे हे लक्षात ठेवा.
लेखक इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयाचे उपप्राचार्य आहेत. विविध स्पर्धा परीक्षांचे ते महाराष्ट्रातील लोकप्रिय नामवंत मार्गदर्शक आहेत. विविध विषयांवर त्यांची विविध मार्गदर्शक पुस्तके प्रसिद्ध आहेत. इगतपुरीनामा वेब पोर्टलवर ते नियमितपणे वाचकांना मार्गदर्शन करतात.
◆ लेखांक १ साठी क्लिक करा
https://igatpurinama.in/archives/1815
◆ लेखांक २ साठी क्लिक करा
https://igatpurinama.in/archives/1838
◆ लेखांक ३ साठी क्लिक करा
https://igatpurinama.in/archives/1887
◆ लेखांक ४ साठी क्लिक करा
https://igatpurinama.in/archives/1921
◆ लेखांक ५ साठी क्लिक करा
https://igatpurinama.in/archives/1965
◆ लेखांक ६ साठी क्लिक करा
4 Comments