इगतपुरीनामा न्यूज – स्पर्धेच्या युगात स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी अविरत प्रयत्न, प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवणे गरजेचे आहे. लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षा, त्यांचा अभ्यासक्रम, मुलाखत व निवडपद्धती याविषयी सविस्तर माहिती गरजेची आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्याचे प्रमाण जास्त आहे याला ग्रामीण तरुणांचा प्रामाणिकपणा व […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील राजमुद्रा सामाजिक शैक्षणिक मंडळातर्फे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, होतकरू विद्यार्थ्यांसह सर्वांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हरी होम साई ढाबा संचालक अकबरशेठ पठाण यांच्या सौजन्याने व तरुणांचे आदर्श माजी अध्यक्ष संदीप नाठे व राजमुद्रातर्फे उद्या शनिवारी २६ ऑगस्टला हा कार्यक्रम […]
इगतपुरीनामा न्यूज – राजयोग प्रतिष्ठानतर्फे इगतपुरी तालुक्यातील विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना इगतपुरी रत्नगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. उद्या रविवारी १३ ऑगस्टला वतीने पालकमंत्री आणि विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. यावेळी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर घेण्यात येणार आहे. गोंदे दुमाला येथील लक्ष्मी लॉन्स येथे सकाळी ११ […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २ – इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते जिल्हा परिषद शाळेतून शिक्षणात सुरुवात करून अभिनव शाळा घोटी, जनता विद्यालय घोटी या आदिवासी भागातील शाळांत शिक्षण घेऊन पूनम अहिरे उपजिल्हाधिकारी झाली आहे. तिचे हे स्वप्न स्वप्न साकार झाल्याने आदिवासी भागात आनंद व्यक्त होतोय. भंडारदरावाडी, काळुस्ते, घोटी या गावात आईवडीलांच्या नोकरी निमित्ताने बालपणात पूनमच्या शाळा बदलत गेल्या. […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. 12 मोठी स्वप्न आणि त्या स्वप्नासाठी अविरत कष्ट घेण्याची तयारी असल्यास कोणतेही मोठे उद्धीष्ठ पूर्ण व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. ग्रामीण भागातील सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना मोडाळे येथील अभ्यासिकेमुळे देशाच्या आणि राज्याच्या सेवेतील उच्च अधिकारी होण्याची संधी आहे. यासाठी गोरख बोडके आणि आम्ही अधिकारी आपल्या सर्वांच्या पाठीशी आहोत. स्पर्धा परीक्षाद्वारे सुलभ यश मिळवण्यासाठी […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २१ इगतपुरी तालुक्यातील आदर्श गाव मोडाळे येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले अभ्यासिकेचा लोकार्पण सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज तथा स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते होणार आहे. शुक्रवारी २९ जुलैला मोडाळे येथे सकाळी ११ वाजता हा भव्य लोकार्पण सोहळा होणार असल्याची माहिती जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके, […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ११ इगतपुरी तालुक्यातून उच्च क्षेत्रातील गुणवंत अधिकाऱ्यांची फौज निर्माण करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांनी कंबर कसली आहे. MPSC आणि UPSC मध्ये अधिकारी होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्षेत्रात गगनभरारी घ्यावी यासाठीही गोरख बोडके यांनी संकल्प केलेला आहे. यासाठी इगतपुरी तालुक्यातील मोडाळे ह्या गावात २ मजली सुसज्ज अभ्यासिका उभी […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ४ गोंदे दुमाला येथे राजयोग प्रतिष्ठानच्या वतीने वाडीवऱ्हे जिल्हा परिषद गटातील सर्व विद्यार्थ्यासाठी करिअर मार्गदर्शन शिबीर व गुणगौरव सोहळा गोंदे दुमाला येथे संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी खचून न जाता अपयशाची भीती मनातून काढावी. यश हे सहजासहजी मिळत नाही. रक्ताचे पाणी करुन ते मिळत असते शहरी भागात शैक्षणिक सुविधा असतात. ग्रामीण भागात सुविधा नसूनही […]
सीएमए ही एक जागतिक मान्यता मिळालेली प्रोफेशनल डिग्री असून अत्यंत कमी खर्चिक आणि कमी खर्चात उत्कृष्ट दर्जाचं शिक्षण मिळवता येते. कोर्सला लागणारा एकूण खर्च अंदाजे ४५,००० इतका येतो. CMA झाल्यानंतर लगेचच एक चांगल्या पदावर काम करण्याची संधी उपलब्ध होते. पदवी मिळाल्यानंतर संस्थेकडून कॅम्पसचे आयोजन केले जाते. ज्यात बहुविध उद्योग, सरकारी, निम सरकारी, खाजगी कंपन्या सहभागी […]
इगतपुरीनामा, न्यूज, दि. ७ मुलगी वाचवा मुलगी शिकवा यानुसार मुलींचा शैक्षणिक आलेख उंचावण्यासाठी समाजाने आणि पालकांनी प्रोत्साहन द्यावे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर काळुस्ते येथील जिल्हा परिषद शाळेतून शिक्षणाची सुरुवात करून पुनम अहिरे हिने मंत्रालय कक्ष अधिकारी पदाला गवसणी घातली असल्याचा अभिमान वाटतो असे प्रतिपादन राज्य आदर्श शिक्षक भिला अहिरे यांनी व्यक्त केले. नुकत्याच झालेल्या राज्यसेवा […]