दहावी बारावी नंतर पुढे काय ? लेखांक २५

१२ वी नंतर Sanitary Inspector कोर्ससाठी प्रवेश घ्यायचा आहे ?
इयत्ता बारावी नंतर कोणत्याही शाखेतील विद्यार्थी, विद्यार्थिनींना कमी कालावधीच्या अनेक चांगल्या कोर्सची संधी आहे. विशेषतः आर्थिक दृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर लवकर उभे करणारे हे कोर्सेस आहेत. त्यातील कोर्सचा परिचय करून देणारा लेख आज देत आहोत. लेखमालेतील यापूर्वीचे लेख वाचण्यासाठी ह्या लेखाच्या शेवटी लिंक दिल्या आहेत. जिज्ञासूंनी याचा लाभ घ्यावा.
- श्री. भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा
प्रा. देविदास गिरी, उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय

मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरी
उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय
संपर्क : 9822478463

12 वी नंतर Sanitary Inspector होण्यासाठी महत्वाचा कोर्स

कमी कालावधीचे अभ्यासक्रम
इयत्ता बारावी नंतर शिक्षण घेणाऱ्यांची भारतात टक्केवारी खूप कमी आहे. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे विद्यार्थ्याला कामाला जावे लागते. शेती करावी लागते. आपल्या आईवडिलांचा परंपरागत व्यवसाय करावा लागतो. एखाद्या कंपनीमध्ये, दुकानामध्ये कामासाठी जावे लागते. त्यामुळे कमी कालावधीचे अभ्यासक्रम, पदविका, पदव्या असतील आणि त्या केल्यानंतर आमच्या पाल्याला स्वतःच्या पायावर उभे राहाता आले पाहिजे असा पालकांचा आग्रह किंवा प्रश्न असतो. पालकांच्या दृष्टीने हा आग्रह ही अपेक्षा महत्त्वाची होय. यासाठी काही निवडक कोर्सेस, अभ्यासक्रम, पदविका याबद्दल माहिती.

AIILSG
All India Institute of Local Self – Government यांच्या वतीने लहान लहान अभ्यासक्रम, Course, पदविका यासारखे अभ्यासक्रम आहेत। गरीब, आर्थिक दृष्टया कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे अभ्यासक्रम कमी कालावधीचे आहेत. यासह अभ्यासक्रम सोपा असल्यामुळे व नोकरीची शाश्वती असल्यामुळे करायला हरकत नसावी.

Sanitary Inspector Diploma
AIILSG यांच्या वतीने अनेक महाविद्यालयामध्ये अशा प्रकारचे अभ्यासक्रम राबविले जातात. त्यातील एक महत्त्वाचा अभ्यासक्रम, कोर्स, Diploma म्हणजे Sanitary Inspector हा होय. ज्याला जॉबच्या भाषेत आरोग्य सुपरवायझर, आरोग्य निरीक्षक असे संबोधले जाते.

शैक्षणिक पात्रता व कालावधी
हा Diploma 18 महिने कालावधीचा असून इयत्ता बारावी कला, वाणिज्य, विज्ञान, एमसीव्हीसी, होम सायन्स या शाखेतील कोणताही उत्तीर्ण झालेला विद्यार्थी विद्यार्थीनी हा कोर्स करू शकते.

अभ्यासक्रमातील विषय
अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांच्या बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमातील घटकांवरील माहितीचा असून स्वच्छ भारत यासारख्या राष्ट्रव्यापी अभियानामुळे या अभ्यासक्रमाला महत्त्व प्राप्त झालेले आहे. कोविडच्या महामारीमुळे जनतेच्या दैनंदिन  जीवनात स्वच्छता याविषयाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. यामध्ये
1. परिसर अभ्यास
2. आरोग्य
3. स्वच्छता
4. कचरा व्यवस्थापन
5. जीवशास्त्र
6. सार्वजनिक स्वच्छता
7. कचऱ्याची विल्हेवाट
8. प्रदूषण
9. पर्यावरण
10. सांडपाणी व्यवस्थापन इत्यादी अभ्यास घटकांचा समावेश असतो.

नोकरीच्या संधी
Sanitary Inspector चा Diploma पूर्ण केल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये
1. जिल्हा परिषदेत आरोग्य निरीक्षक
2. महानगरपालिका आरोग्य निरीक्षक
3. नगर पालिका आरोग्य निरीक्षक
4. रेल्वेत आरोग्य निरीक्षक
5. विमानतळ आरोग्य निरीक्षक
6. एस. टी. महामंडळ आरोग्य निरीक्षक
7. मोठ्या कंपन्यांमध्ये आरोग्य निरीक्षक
8. मोठ्या हॉटेलमध्ये आरोग्य निरीक्षक
9. खाजगी क्षेत्रात जसे मॉल, इत्यादींमध्ये क्लास तीनच्या वेतनावर काम करता येते.

( लेखक इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयाचे उपप्राचार्य असून स्पर्धा परीक्षांचे महाराष्ट्रातील नामवंत लोकप्रिय मार्गदर्शक आहेत. विविध विषयांवर त्यांची विविध मार्गदर्शक पुस्तके प्रसिद्ध आहेत. )

◆ लेखमालेतील १ ते १९ ह्या लेखांसाठी खालील लेखांक २० च्या शेवटी सर्व लिंक दिल्या आहेत. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.

https://igatpurinama.in/archives/2428

लेखांक २१ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2460

लेखांक २२ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2484

लेखांक २३ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2500

लेखांक २४ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2534

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!