author

संस्था आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध – ॲड. संदीप गुळवे : नूतन चेअरमन झोले, व्हॉ. चेअरमन धांडे, व सचिव संघटना जिल्हाध्यक्ष नाठे यांचा सत्कार संपन्न

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. २५ – राजकीय मतभेद बाजुला सारुन संस्था वाढीस लागावी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी तालुक्यातील सर्व नेत्यांनी एकत्र येऊन खरेदी-विक्री संघाची निवडणूक बिनविरोध केली. यामध्ये योगदान देणाऱ्या सर्व घटकांचे ऋण व्यक्त करतो असे प्रतिपादन मविप्रचे संचालक ॲड. संदीप गुळवे यांनी घोटी येथे केले. मुकणे ग्रामपंचायतीतर्फे खरेदी विक्री संघाचे नूतन चेअरमन माजी […]

बंद हरिनाम सप्ताह सुरू करण्यासाठी आवश्यक सहाय्य करणार : गोकुळ महाराज पुंडे

इगतपुरीनामा न्यूज, दि. २५ – अनेक गावांत वारकरी सांप्रदायिक नामजप यज्ञ असणारे अखंड हरिनाम सप्ताह गावांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे बंद पडत आहेत. वारकरी सांप्रदायाची पताका मजबूत करून हरिनामाचा जागर करण्यासाठी ह्या सप्ताहांचे मोठे योगदान आहे. बंद असणारे सप्ताह सुरू करण्यासाठी आर्थिक घडी बिघडलेल्या गावांनी तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन ज्ञानोबाराय तुकोबाराय वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हभप […]

बालाजी मित्र मंडळातर्फे श्री स्वामी समर्थ प्रगटदिन उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

इगतपुरीनामा न्यूज, दि. २४ – घोटी येथील बालाजी मित्र मंडळाने श्री स्वामी समर्थ प्रगटदिन उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. श्री स्वामी समर्थ जयंती उत्सवाचे हे १६ वे वर्ष असून मोठ्या उत्साहाने जयंती उत्सव साजरा करण्यात आला. स्वामी समर्थ महाराजांचा जयघोष करीत शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी हभप विजय महाराज चव्हाण यांचा हरिपाठाचा कार्यक्रम संपन्न […]

गंभीर गुन्ह्यातील आरोपी इगतपुरी पोलीस पथकाकडून जेरबंद : इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या मार्गदर्शनाने कारवाईला यश

इगतपुरीनामा न्यूज, दि. २३ – इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने गंभीर गुन्ह्यातील संशयित आरोपीला शिताफीने अटक केली आहे. सचिन सुभाष म्हसणे वय २४ रा. फांगूळगव्हाण ता. इगतपुरी असे संशयित आरोपीचे नाव आहे. इगतपुरी पोलीस ठाण्यात २०१७ मध्ये गंभीर गुन्हा दाखल आहे. ह्या गुन्ह्यात भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ३०७, १४३ […]

शेणवड आश्रमशाळेचे मुख्याध्यापक हरी आव्हाड यांचा सेवापुर्ती सत्कार कार्यक्रम संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. २४ – सर्वांसाठी तत्परतेने मदतीला धावून जाणारे मुख्याध्यापक हरी आव्हाड हे विद्यार्थीप्रिय व्यक्तीमत्व आहेत. त्यांनी शाळेला घर मानून स्वतःला शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात वाहून घेतले. प्रभावी काम करून विद्यार्थ्यांमध्ये यशाची बीजे पेरली असून त्यांचा हेवा व अभिमान वाटतो. शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी आयुष्य घडविण्यासाठी त्यांचा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन खेड शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक नवनाथ […]

प्रभुनयन आणि साई सहाय्य समितीतर्फे पालखीतील साईभक्तांच्या आरोग्यासाठी शिबीर संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. २४ – रामनवमी निमित्त मुंबई ते शिर्डी मार्गावर मोठ्या संख्येने साई पालख्यांचे आगमन होत आहे. यामुळे इगतपुरीजवळील महामार्ग साई भक्तांमुळे फुलून निघाला आहे. मुंबई लालबाग येथील मानाच्या साईलीला पालखीचे कसारा घाट चढल्यानंतर इगतपुरी येथील सह्याद्री नगर दत्त मंदिरात आगमन झाले. या पालखीने विसावा घेतल्यानंतर साई भक्तांसाठी प्रभू नयन फाउंडेशन, श्री साई सहाय्य […]

टायगर ग्रुपचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांचा वाढदिवस घोटी ग्रामीण रुग्णालयात फळवाटप करून संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. २३ – इगतपुरी तालुक्यातील दौंडत येथील युवा नेते टायगर ग्रुपचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून त्यांचा जन्मदिन घोटी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करीत साजरा केला. यावेळी घोटी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश गोरे यांनी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शिवशाही संघटना अध्यक्ष ॲड.रोहित उगले, डॉ.  स्वराज्य संघटनेचे महेंद्र […]

नाशिक जिल्हा गटसचिव संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी देविदास नाठे यांची बिनविरोध निवड

इगतपुरीनामा न्यूज, दि. २३ – नाशिक जिल्हा गटसचिव संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील भूमिपुत्र देविदास नाठे यांची बिनविरोध निवड झाली आली आहे. सहकार क्षेत्रातील अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व ह्या पदावर विराजमान झाल्याने इगतपुरी तालुक्यात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नाशिक जिल्हा केडर कार्यालयात नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या सभेत एकमताने निवड प्रक्रिया पार पडली. गटसचिव व कर्मचारी […]

दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या परीक्षांचा निकाल जाहीर

इगतपुरीनामा न्यूज, दि. २२ – दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंटस ऑफ इंडियातर्फे संपूर्ण भारतभर घेतल्या जाणाऱ्या डिसेंबर २०२२ परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत नाशिक शाखेच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत याही वर्षी घवघवीत यश संपादन केले आहे. वाणिज्य क्षेत्रात सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या सीएमए ( CMA ) परीक्षेतील या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वच […]

घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक २७ मार्चला होणार जाहीर : इगतपुरी तालुक्याचे राजकारण चांगलेच तापणार

इगतपुरीनामा न्यूज, दि. २१ – उच्च न्यायालयाकडून बाजार समिती निवडणुकांची निकाल लागेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ३० एप्रिल २०२३ पर्यंत करण्याचे निर्देश निवडणूक प्राधिकरणाला देण्यात आले होते. या आदेशामुळे इगतपुरी तालुक्यातील घोटी बाजार समितीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला होता. त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे पडघम आता वाजले आहे. २७ मार्चला घोटी कृषी उत्पन्न […]

error: Content is protected !!