इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम धामडकीवाडी येथे प्रल्हाद ओंकारवती फाऊंडेशनतर्फे विद्यार्थी शिक्षक आणि ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी विविध आजारावर नि:शुल्क चिकित्सा शिबीर आणि वैद्यकीय उपचार करण्यासाठी फाउंडेशनच्या आरोग्य पथकाने परिश्रम घेतले. फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. मनुश्री मुखर्जी, डॉ. प्रसाद देसाई, संस्थापक सदस्य शशिकांत मुखर्जी यांच्याकडून जिल्हा परिषद शाळेत स्वच्छता पंधरवडा कार्यक्रमांतर्गत स्वच्छतेचे […]
प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज – पाडळी देशमुख येथील श्री सिद्धिविनायक गणेशाचे मनमोहक, आकर्षक व निसर्गरम्य वातावरणात असलेले मंदिर भाविक वा गणेश भक्तांचे श्रद्धास्थान आहे. गणेशोत्सव काळात हा परिसर भाविक भक्तांच्या गर्दीने फुलून निघत आहे. येथील मनमोहक मंदिरामुळे इगतपुरी तालुक्याच्या पर्यटनात भर पडली आहे. संजय अनंत तुपसाखरे यांनी आपल्या स्वतःच्या जमिनीत श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर […]
इगतपुरीनामा न्यूज – पिंप्री सदो ता. इगतपुरी येथील जि. प. ऊर्दु शाळेतील सहा वर्गांचा एकशिक्षकी कारभार आणि इगतपुरीचे गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, विस्ताराधिकारी अशोक मुंढे यांच्या एकतर्फी कारभाराविरोधात मुस्लिम विद्यार्थी शिक्षणमंत्र्यांकडे गाऱ्हाणे मांडायला रेल्वेने निघाले. विद्यार्थ्यांची आणि पालकांची समजूत घालता घालता या अधिकाऱ्यांची त्रेधातिरपिट उडाली. गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील यांच्याशी बोलणे सुरु असतांना विस्ताराधिकारी अशोक मुंढे मध्येच […]
इगतपुरीनामा न्यूज – पिंप्री सदो, ता. इगतपुरी येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेला आज संतप्त पालकांनी टाळे ठोकले. मागील महिन्यात दिलेला पर्यायी शिक्षक आता शाळेत येणे बंद झाले आहे. इगतपुरीचे गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी जिल्हा पातळीवर शिक्षक मागणीचा प्रस्ताव पाठवला नसल्याने या शाळेसाठी आता शिक्षक मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या बेजबाबदार कारभारामुळे पहिली ते सहावीच्या […]
दीपाली जगदाळे : इगतपुरीनामा न्यूज – ‘परमेश्वरास संकटकाळी प्रत्येक वेळी उपस्थित राहणे शक्य नसल्याने त्याने डॉक्टरांची निर्मिती केली आहे’ या विचाराची प्रचिती पानेवाडी ( ता. नांदगाव ) येथील काकड कुटुंबियांना बुधवारी आली. त्यांच्या एक वर्षाच्या चिमुकल्याने खेळता खेळता बामची डबी गिळली असता त्यास मरणाच्या दारातून परत आणण्यास डॉक्टरांना यश आले. त्यामुळे डॉक्टरांच्या रूपात काकडे कुटुंबीयांनी […]
इगतपुरीनामा न्यूज – सध्याच्या सर्वदूर घडत असलेल्या घटना, असुरक्षिततेचे वातावरण याबाबत समाजघटकात चिंता व काळजी व्यक्त होत असतानाच समाजात वावरताना मुलींनी व महिलांनी सजग व सक्षम होऊन धाडसी वृत्ती बाळगावी असे प्रतिपादन घोटी ग्रामपालिकेच्या सदस्या तथा प्रतिष्ठित महिला संघटक वैशाली विजय गोसावी यांनी केले. घोटी येथे सौ. गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पुढाकाराने मुलींसाठी दोन दिवसीय […]
इगतपुरीनामा न्यूज – समाज जागृतीच्या हेतूने सुरू झालेल्या गणेशोत्सवाची परंपरा गणेश मंडळांनी ठेवत ठेवावी. नियमांचे तंतोतंत पालन करून उत्सवाला गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नसून सामाजिक जबाबदारीने काम करावे असे आवाहन वाडीवऱ्हेचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी केले. वाडीवऱ्हे येथे आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक घेण्यात आली. […]
इगतपुरीनामा न्यूज – आरोपी विजय खन्ना याचा २८ ते ३० ऑगस्टला ७९७७३८०१९८ आणि ८३७४६१९८२७ या नंबरवरून व्हॉटस अप कॉल येवुन त्यात आम्ही सीबीआय मधुन पोलीस अधिकारी बोलत असल्याचे त्याने खोटे सांगितले. फिर्यादीला त्याची सर्व माहिती विचारून तुमच्या विरूध्द कॅनरा बँकेत मनी लॉन्ड्रींगची केस दाखल आहे. तुम्ही नरेश गोयल यांच्यासोबत मिळुन ७ कोटीची मनी लॉन्ड्रींग केलेली […]
इगतपुरीनामा न्यूज – महामार्गावरील टोल टॅक्स फास्टॅगद्वारेच कापला जातो. टोल रोखीने भरल्यास दुप्पट रक्कम आकारली जाते. यामुळेच आता बहुतांश वाहनचालक फास्टॅग वापरतात. कोणत्याही टोल बूथवरून कारने न जाताही टोल टॅक्स कापला जात असल्याच्या घटना ऐकण्यात येत असतात. इगतपुरी तालुक्यातील पत्रकार भास्कर सोनवणे यांच्या नाशिकच्या घराबाहेर उभ्या असलेल्या अल्टो कारचा टोलही त्यांच्या घरापासून ६० किलोमीटर अंतरावर […]
इगतपुरीनामा न्यूज – शेती व शेतकऱ्यांबद्दल जिव्हाळा असणारे राष्ट्रीय हिंदू संघाचे प्रदेशाध्यक्ष संतोष घुगे कुटुंबात यंदाचा बैलपोळा सण पारंपारिक पद्धतीने उत्साहात पार पडला. यावेळी सर्जाराजाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. कुटुंबाच्या वतीने बैलजोडीचे औक्षण केले. वडील बाबुराव घुगे,आई वत्सलाबाई प्रगतशील शेतकरी असून काळ्या आईची सेवा करीत आहे. त्यांच्या योग्य संस्कारातून या मातीची सेवा करण्याचे भाग्य […]