दहावी – बारावी नंतर पुढे काय ? लेखांक ३

दहावी बारावी नंतर विद्यार्थ्यांच्या भवितव्याची चिंता प्रत्येक पालकाला असते. त्यासाठी प्रत्येकाला योग्य वेळी योग्य मार्गदर्शक लाभावा लागतो. आता पालकांनी चिंता करण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील यशवंत विद्यार्थ्यांची मोठी फौज घडवणारे स्पर्धा परीक्षांचे लोकप्रिय मार्गदर्शक प्रा. देविदास गिरी आपल्याला नियमित मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी इगतपुरीनामा वेब पोर्टलला नियमित भेट देत राहा..! – भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा वेब पोर्टल.

मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरी
उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय
संपर्क : 9822478463

स्वतःच्या पायावर उभे राहणे
दहावी बारावी नंतर पुढे काय ? या प्रश्नाचा विचार करत असताना बरेच विद्यार्थी व पालक प्रश्न विचारतात की, लवकरात लवकर आमचा पाल्य स्वतःच्या पायावर कसा उभा राहील ? त्यासाठीचे काही अभ्यासक्रम, कोर्सेस आहेत का ? आमची परिस्थिती पुढे पाल्याला शिकवण्यासारखी नाही ? यासाठी काही कोर्सेस, अभ्यासक्रम आहेत. त्याचा परिचय आपण पाहणार आहोत.

शिक्षण क्षेत्रातील संधी
दहावी नंतर कला शाखेत इयत्ता अकरावी व बारावीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर  डी. एल. एड. ( Diploma in Elementary Education ) चा दोन वर्षांचा अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्राथमिक शाळेत शिक्षक पदाची एक चांगली संधी उपलब्ध होते. याठिकाणी विद्यार्थी प्रश्न विचारतात की, नोकरीचे काय ? या प्रश्नाला उत्तर असे की इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये सध्या नोकरीची संधी आहे. दुसरे म्हणजे शिक्षणशास्त्रातील ही पदविका प्राप्त केल्यानंतर अध्यापनाची एक दृष्टी येते. यानंतर आपण आपला शिकवणीचा म्हणजेच स्वतःचे क्लासेस काढून स्वतःच्या पायावर उभे राहू शकतो. आता आपल्याला स्वतःचे पर्याय देखील शोधायचे आहेत हे लक्षात घ्या.

आजची गरज
आज विद्यार्थ्याचे आई वडिल नोकरी, कामाच्या निमित्ताने आपल्या पाल्याचा अभ्यास घेऊ शकत नाही. त्यामुळे समाजाची गरज म्हणून आपण स्वतःच्या क्लासेस मार्फत स्वतःच्या उदरनिर्वाहाचे साधन निर्माण करू शकतो. आज कितीतरी गृहिणी स्वतःचा संसार सांभाळून हे शैक्षणिक कार्य करीत आहेत.

पुढील शिक्षण घेता येते
शिक्षण क्षेत्रातील ही पदविका घेतल्यानंतर पुढील शिक्षणात खंड न पाडता आपण आपले शिक्षण पूर्ण करू शकतो. तशी संधी पारंपरिक विद्यापीठांनी बहिस्थ शिक्षणाद्वारे निर्माण केलेली आहे. तसेच मुक्त शिक्षण प्रणालीद्वारे देखील पुढील शिक्षण पूर्ण करून शिक्षण क्षेत्रातील पुढील अनेक संधी मिळवू शकतो. तसे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

सर्वोच्च संधी पर्यंत शिक्षण
पदविका शिक्षण घेतल्यानंतर पुढे पदवी, पदव्युत्तर पदवी, टेट ( शिक्षक पात्रता परीक्षा ), सीटीईटी ( केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ), शिक्षणशास्त्रातील पदवी, पदव्युत्तर पदवी, पीएचडी पर्यंतचे उच्च शिक्षण घेतलेल्यांची असंख्य उदाहरणे आहेत. ही गोष्ट महत्त्वाची होय. थोडक्यात मनाची तयारी, जिद्द, कष्ट घेण्याची तयारी, अभ्यासाची आवड आणि सकारात्मक दृष्टिकोन असणे आवश्यक होय. अवघड काहीच नाही हे सतत लक्षात ठेवा.

अनेक पर्याय आहेत
कमी शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहून, पुढे सर्वोच्च शिक्षण पूर्ण करण्याचे असंख्य पर्याय आज उपलब्ध आहेत. याची माहिती करून घ्या. अनेक विद्यार्थ्यांनी याप्रकारे अर्धवट राहिलेल्या शिक्षणाचे स्वप्न पूर्ण केलेले आहे. ही उदाहरणे आपले आदर्श आहेत याची जाणीव सतत ठेवा.

लेखांक १ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/1815

लेखांक २ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/1838

( लेखक इगतपुरी येथील केपीजी महाविद्यालयाचे उपप्राचार्य असून स्पर्धा परीक्षांचे लोकप्रिय मार्गदर्शक आहेत. )

Similar Posts

6 Comments

  1. avatar
    प्रा. रोमा विष्णुसिंग परदेशी says:

    अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे.

  2. avatar
    प्रा. संग्राम सीताराम गोसावी says:

    सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांपुढे आपले करिअर नेमके कशात करावे हा एक यक्ष प्रश्नच उभा राहिलेला आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधताना पालक आणि पाल्य दोघेही बऱ्याच वेळा संभ्रमावस्थेत पडलेले जाणवतात अशा वेळी आपल्या सारख्या तज्ज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन दिशादर्शक म्हणून फार उपयोगी पडते. अतिशय सुंदर आणि सुलभ प्रकारे आपले मार्गदर्शन आणि माहिती असते.अशा च प्रकारचे आणखी विविध क्षेत्रातील मार्गदर्शन आपल्याकडून व्हावे ही सदिच्छा.. इगतपुरीनामा चे संपादक आणि आपले मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

Leave a Reply

error: Content is protected !!