१२ वी नंतर कायदा क्षेत्रात करिअर करायचंय ?
बारावीच्या तिन्ही शाखेच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना एलएलबी पदवी मिळवता येते. यासाठी CET सेलची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर ५ वर्षाच्या एलएलबी अभ्याक्रमासाठी प्रवेश मिळतो. ह्या संपूर्ण प्रक्रियेची सुलभ शब्दांत माहिती मिळवण्यासाठी लेखांक १२ बहुगुणी ठरेल. कायदा क्षेत्रात उत्तम करिअर किंवा वकील होण्याचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी आजचा लेख बहुमोल ठरेल. ह्या लेखमालेतील आधीचे लेख वाचण्यासाठी ह्या लेखाच्या शेवटी लिंक दिल्या आहेत.
- श्री. भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा
मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरी
उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय
संपर्क : 9822478463
बारावीच्या सर्व शाखांसाठी
इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पारंपरिक शिक्षणाचा आग्रह धरतात. म्हणजेच इयत्ता अकरावी व बारावीला प्रवेश घेतात. हे प्रमाण आजमितीला 75 टक्के आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी उपलब्ध आहे. ती म्हणजे कायदा, विधी, Law या विषयात पदवी मिळवायची. 2016 -17 या वर्षापासून इयत्ता बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र CET cell ने पाच वर्षांच्या LLB.( Bachelor of Laws ) अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी CET चा अभ्यासक्रम तयार केला आहे.
कायदा शाखेची पदवी
इयत्ता बारावी उत्तीर्ण झालेला कोणत्याही शाखेचा विद्यार्थी LLB च्या पाच वर्षांच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी पात्र असतो. काही विद्यार्थी लहाणपणापासून वकिल होण्याचे स्वप्न पहात असतात. यासाठी आपणही कायद्याचा अभ्यास करून पदवीधर होण्याचे स्वप्न पहात असतात. करिअरसाठी हे क्षेत्र देखील महत्त्वाचे आहे.
महाराष्ट्र CET cell
महाराष्ट्रात CET Cell मार्फत राज्यस्तरावरील LLB च्या पाच वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळतो. यासाठीची CET ( Common Entrance Test ) सामाईक प्रवेश परीक्षेचे आयोजन दरवर्षी केले जाते. या CET प्रवेश परीक्षेत चांगले मार्क मिळविणारा विद्यार्थी हव्या त्या आपल्या आवडीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळवू शकतो. त्याचप्रमाणे खाजगी महाविद्यालयात देखील प्रवेशासाठी CET प्रवेश परीक्षा देणे आवश्यक असते.
CET परीक्षेचे स्वरूप
LLB च्या पाच वर्षांच्या अभ्यासक्रमासाठीची जी CET परीक्षा आहे त्या परीक्षेत 150 Objective Questions असतात. प्रत्येक प्रश्नाला एक गुण असतो. अशाप्रकारे 150 मार्कांची ही परीक्षा असून यासाठी 120 मिनिटे म्हणजेच दोन तास वेळ असतो. या परीक्षेचा अभ्यासक्रम दिलेला आहे. याची चांगल्या प्रकारे तयारी केल्यास विद्यार्थी LLB ला प्रवेश मिळवू शकतो.
LLB CET अभ्यासक्रम
पाच वर्षांच्या या LLB च्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी जी CET द्यावी लागते त्याच्या अभ्यासक्रमात खालील पाच अभ्यास घटकांचा समावेश आहे.
1. Legal Aptitude and Legal Reasoning 40 प्रश्न 40 मार्क.
2. General Knowledge with Current Affairs 30 प्रश्न 30 मार्क.
3. Logical and Analytical Reasoning 40 प्रश्न 40 मार्क.
4. English 30 प्रश्न 30 मार्क.
5. Basic Mathematics 10 प्रश्न 10 मार्क ( या अभ्यास घटकातील सविस्तर अभ्यासक्रम CET cell च्या संकेतस्थळावर दिलेला आहे. तो विद्यार्थ्यांनी मुळातून पाहाणे आवश्यक आहे. ) याप्रकारे अभ्यासघटक, प्रश्नसंख्या व मार्कांची विभागणी आहे. या परीक्षेला Negative Marking नाही. तसेच प्रश्न हे इंग्रजी व मराठी मध्ये विचारलेले असतील हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे.
करिअरसाठीचा चांगला पर्याय
इयत्ता बारावी नंतर कोणत्याही शाखेच्या विद्यार्थ्याला करिअर करण्यासाठी एक चांगला पर्याय, एक चांगली संधी आहे. विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर चांगल्या प्रकारे पदवी संपादन केल्यास चांगल्या क्षेत्रात पदार्पण करता येईल. या क्षेत्राचे स्वप्न पाहाणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वतःचा ठसा या क्षेत्रात निर्माण करता येतो हे लक्षात घ्यावे.
( लेखक इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयाचे उपप्राचार्य असून स्पर्धा परीक्षांचे महाराष्ट्रातील नामवंत लोकप्रिय मार्गदर्शक आहेत. विविध विषयांवर त्यांची विविध मार्गदर्शक पुस्तके प्रसिद्ध आहेत. )
◆ लेखांक १ साठी क्लिक करा
https://igatpurinama.in/archives/1815
◆ लेखांक २ साठी क्लिक करा
https://igatpurinama.in/archives/1838
◆ लेखांक ३ साठी क्लिक करा
https://igatpurinama.in/archives/1887
◆ लेखांक ४ साठी क्लिक करा
https://igatpurinama.in/archives/1921
◆ लेखांक ५ साठी क्लिक करा
https://igatpurinama.in/archives/1965
◆ लेखांक ६ साठी क्लिक करा
https://igatpurinama.in/archives/2018
◆ लेखांक ७ साठी क्लिक करा
https://igatpurinama.in/archives/2030
◆ लेखांक ८ साठी क्लिक करा
https://igatpurinama.in/archives/2067
◆ लेखांक ९ साठी क्लिक करा
https://igatpurinama.in/archives/2090
◆ लेखांक १० साठी क्लिक करा
https://igatpurinama.in/archives/2132
◆ लेखांक ११ साठी क्लिक करा
4 Comments