दहावी बारावी नंतर पुढे काय ? लेखांक १७

12 वी नंतर Design क्षेत्रात करिअर करायचे ?
बारावी नंतर सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांना Bachelor of Design चा अभ्यासक्रम करण्याची सोय विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे. पारंपरिक अभ्यासक्रमापेक्षा एक वेगळा आणि स्वतःच्या पायावर उभा करणारा नव्या युगाला उपयुक्त असा हा अभ्यासक्रम होय. आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा लेख निश्चितच उपयुक्त ठरेल.
- श्री. भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा
प्रा. देविदास गिरी, उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय

मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरी
उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय
संपर्क : 9822478463

डिझाईन क्षेत्रात करिअर करण्याची संधी

वेगळे काही करण्यासाठी
बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयात एखादा विद्यार्थी गायक, खेळाडू, चित्रकार, डान्स, सुंदर रांगोळी काढणारी विद्यार्थीनी, अभिनय करणारा विद्यार्थी असे छंद व कला जोपासणारे विद्यार्थी असतात. या विद्यार्थ्यांचा कल पारंपरिक अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त वेगळा अभ्यासक्रम निवडण्याकडे असतो.आपल्या ठिकाणी असलेल्या कलेला कोणत्या क्षेत्रात वाव आहे याचा शोध घेणारे विद्यार्थी असतात. त्याचप्रमाणे भविष्यातील गरजा काय आहेत ? कोणत्या क्षेत्रात आपल्याला चांगले करिअर करता येईल ? याचा विचार करणारे विद्यार्थी असतात. अशा विद्यार्थ्यांसाठी देखील अनेक संधी आहेत. त्यातील एक संधी म्हणजे Design हे क्षेत्र होय.

Design क्षेत्रातील पदवी
आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात नाविन्यता, सजावट, आकर्षकपणा, सुंदरता, सौंदर्यवेधी मांडणी, कल्पकता या गोष्टींना जीवनाच्या सर्वच क्षेत्रात अनन्यसाधारण असे स्थान प्राप्त झालेले आहे. विद्यार्थ्यांना या क्षेत्रात पदवी संपादन करावयाची असल्यास आज अनेक Architecture  महाविद्यालयांमध्ये Bachelor of Design ( B. DES. ) चा अभ्यासक्रम शिकविला जातो. कारण आज या अभ्यासक्रमाची उपयुक्तता प्रत्येक क्षेत्रात असल्याचे जाणवते, दिसून येते. शासनाने आणि विद्यापीठांनी देखील विद्यापीठ पातळीवर अशा नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमाला अनेक वर्षांपासून मान्यता दिलेली असून विद्यार्थ्यांचा कल याकडे आज वाढताना दिसतो आहे.

Specialization ची सोय
Bachelor of Design ( B. DES. ) या पदवीमध्ये Interior  Design , Product design, SET Design, Furniture Design या क्षेत्रात अथवा विषयात स्पेशलायझेशनची सोय आहे. अभ्यासक्रम शिकविण्याबरोबर प्रत्यक्ष सरावाला, कृतीला प्राधान्य दिले जाते. त्याचप्रमाणे Study Tours, Annual Exhibitions, Workshops and Events, Conference and Webinars आदी माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला, सुप्त गुणांना वाव दिला जातो. आपल्या जिल्ह्यात नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेले मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित College of Architecture and Center for Design, Nashik या महाविद्यालयात Bachelor Of Design ( B. DES ) मध्ये पदवी अभ्यासक्रमाची सोय आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत इतरही महाविद्यालयात तसेच महाराष्ट्रातील अन्य विद्यापीठांमध्ये देखील या अभ्यासक्रमाची सोय आहे.

Interior Design
बंगले, अपार्टमेंट, रो हाऊसेसमध्ये अंतर्गत सजावट करणे, बॅंका, मॉल, ऑफिसेस यामधील Interior Design, हॉस्पिटल, नर्सिंग होम, रिसॉर्ट, हॉटेल, रेस्टॉरंट, शाळा, कॉलेजेस यांच्या Interior Design च्या संदर्भातील अभ्यासक्रम यात प्राधान्याने शिकविला जातो.

Product Design
माणसांच्या गरजा, आवडी यानुसार उत्पादनांची निर्मिती केली जाते. या उत्पादनांच्या Design च्या संदर्भातील अभ्यासक्रम असून यामध्ये क्राफ्ट, टेक्नॉलॉजी यातील गोष्टींवर प्रामुख्याने अभ्यासक्रमाची आखणी केलेली आहे.

SET Design
जाहिराती, सिनेमा, मालिका इत्यादींमधील जे SET असतात त्याची निर्मिती, सजावट, नाविन्यता, आकर्षकता, मांडणी, भव्यता आणि दिव्यता बांधणी, त्यातील तंत्रज्ञान या सर्वांचा समावेश असलेला अभ्यासक्रम आहे. त्यात Event Design आणि Exhibition Design इत्यादीचा समावेश होय.

Furniture Design
यामध्ये ऑफिसेस, बंगले, फ्लॅट, मॉल आदींना लागणारे फर्निचर, त्याचे Design, त्यातील विविधता, आकर्षकता, वापरकर्त्याची उपयोगिता इत्यादींचा विचार करून Furniture Design ची मांडणी. यात विद्यार्थ्यांना मटेरिअल अँड प्रोसेसेस, Craft Documentation, History of Furniture Design आणि Advanced Photography यासारख्या विषयांचा अभ्यासक्रमात समावेश होय.

वेगळा अभ्यासक्रम
अशाप्रकारे हा पारंपरिक अभ्यासक्रमांपेक्षा वेगळा असा अभ्यासक्रम असून बारावी उत्तीर्ण झालेल्या सर्व शाखांच्या म्हणजेच कला, वाणिज्य, विज्ञान, एमसीव्हीसी इत्यादी शाखांच्या विद्यार्थ्याना एक उपयुक्त व स्वतःच्या पायावर उभा करणारा हा अभ्यासक्रम  होय हे विद्यार्थ्यानी लक्षात घ्यावे.
                      

( लेखक इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयाचे उपप्राचार्य असून स्पर्धा परीक्षांचे महाराष्ट्रातील नामवंत लोकप्रिय मार्गदर्शक आहेत. विविध विषयांवर त्यांची विविध मार्गदर्शक पुस्तके प्रसिद्ध आहेत. )

लेखांक १ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/1815

लेखांक २ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/1838

लेखांक ३ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/1887

लेखांक ४ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/1921

लेखांक ५ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/1965

लेखांक ६ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2018

लेखांक ७ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2030

लेखांक ८ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2067

लेखांक ९ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2090

लेखांक १० साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2132

लेखांक ११ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2157

लेखांक १२ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2204

लेखांक १३ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2238

लेखांक १४ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2244

लेखांक १५ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2292

लेखांक १६ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2317

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!