ज्ञानेश्वर मेढेपाटील : इगतपुरीनामा न्यूज – नाशिक जिल्हा ॲथॅलेटिक्स असोसिएशनच्या वतीने आणि व्ही डी के स्पोर्ट फाउंडेशनच्या सहकार्याने नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुलात दोन दिवसीय सब ज्युनियर गटाच्या नाशिक जिल्हा ॲथॅलेटिक्स स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत ७, ८,१२, १४ आणि १६ वर्ष वयोगटातील मुले आणि मुली वयोगटाचा समावेश होता. यामध्ये त्र्यंबकराज ॲथॅलेटिक ग्रुपने आपला दबदबा कायम […]
इगतपुरीनामा न्यूज – वेळुंजे येथे नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी गावकऱ्यांसोबत वाढदिवस साजरा केला. डॉ. सुधीर तांबे यांनी वाढदिवसाचे औचित्य साधुन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एक चांगला निर्णय घेतला आहे. डॉ. तांबे हे “जयहिंद लोकचळवळ” या सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून संस्थेमार्फत वेळुंजे गावचे ग्रामीण सहभागीय मूल्य अवलोकन, सामाजिक आर्थिक सर्वेक्षण, […]
इगतपुरीनामा न्यूज – २९ नोव्हेंबरला रात्री त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील वेळुंजे येथील भगवान महाले यांच्या घरामध्ये अज्ञात आरोपींनी संमतीशिवाय प्रवेश करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ५ लाख २३ हजार १७४ रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता. याबाबत भान्यासं कलम ३०५ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. यानंतर हरसुल पोलीस ठाणे हद्दीत १५ डिसेंबरला मध्यरात्री अज्ञात […]
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – स्वतंत्र मतदारसंघाची आवश्यकता असताना प्रत्यक्षात त्र्यंबकेश्वर १९६२ पर्यंत नाशिक मतदारसंघात समाविष्ट होते. १९६२ च्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान त्र्यंबकेश्वरचा समावेश इगतपुरी मतदारसंघात झाला. मतदारसंघाचे स्वतंत्र अस्तित्व नसल्यामुळे त्र्यंबकेश्वरची सातत्याने उपेक्षा झाल्याची लोकभावना आहे. आजवर या भागातील एकाही स्थानिक व्यक्तीला कोणत्याच पक्षाने निवडणूक लढविण्याची संधी दिलेली नाही. १९६२ पासून मतदारसंघावर काँग्रेसचे […]
इगतपुरीनामा न्युज – २००८ मध्ये झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मारहाण केल्याप्रकरणी शिंदे गट युवासेना उपजिल्हाप्रमुख मिथुन राऊत यांच्यावर आणि त्यांचे सहकारी पेठ पंचायत समितीचे माजी सभापती अंबादास चौरे, आमलोण ग्रामपंचायत माजी सरपंच प्रकाश बोरसे, घनशेतचे माजी सरपंच कैलास चौधरी, हरसुलचे माजी सरपंच अशोक लांघे, मुरंबीचे माजी सरपंच अर्जुन मौळे, गावठाचे माजी सरपंच हिरामण […]
इगतपुरीनामा न्यूज – लोकसभेच्या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारल्यानंतर काँग्रेसने आता आपला मोर्चा विधानसभेच्या निवडणुकीकडे वळवला आहे. म्हणून महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष व युवा वर्गात लोकप्रिय असलेले उदयोन्मुख नेतृत्व लकी जाधव यांच्यावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी इगतपुरी व त्र्यंबकेश्वर मतदार संघ पिंजून मतदार संघातील सर्वसामान्यांच्या समस्या जाणून त्यांचे […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदार संघातील वायघोळ मतदार केंद्रात सायंकाळी ६ नंतरही किमान २५० मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगेत उभे आहेत. मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावर ही गर्दी असून आतापर्यंत ह्या केंद्रात ८०२ मतदान पार पडलेले आहे. १ हजार ३०० मतदार संख्या असलेल्या ह्या मतदान केंद्रात रात्री ९ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु राहील असा अंदाज […]
इगतपुरीनामा न्यूज – आज शुक्रवारी दुपारच्या सुमाराला त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे हद्दीत नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवर खंबाळे शिवारातील मानस लॉजिंग व बोर्डिंग येथे कुंटनखाना चालत असल्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीणचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार हॉटेल मानस लॉजिंग व बोर्डिंग येथे बनावट गिऱ्हायिक पाठवून हॉटेल मानस लॉजिंग व बोर्डिंग येथे […]
इगतपुरीनामा न्यूज – वाढोली ता. त्र्यंबकेश्वर येथील पंडीत वाळु महाले वय ६५ वर्षे हे वयोवृध्द इसम १८ मार्चपासून बेपत्ता झाले आहे. त्यांचा मुलगा हिरामण पंडीत महाले यांनी याबाबत त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. वाढोली येथून नाशिकला कोपऱ्या शिवायला जात असल्याचे सांगुन पंडित mahale घरातुन बाहेर पडले. परंतु ते रात्री पर्यत घरी न परतल्याने त्यांच्या […]
इगतपुरीनामा न्यूज : नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी नाउघड गुन्हे उघडकीस आणण्यासाठी निर्देश दिलेले आहेत. त्यानूसार अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कार्यरत आहे. पथकाने उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांमध्ये आरोपींची गुन्हा करण्याची पध्दत व रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे सध्याचे राहण्याचे वास्तव्य याबाबत माहिती काढून समांतर तपास केला. त्याअनुषंगाने […]