दहावी बारावी नंतर पुढे काय ? लेखांक १९

12 वी नंतर Visual Art मध्ये करिअर करायचेय ?
विद्यार्थीनींना इयत्ता बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर Bachelor of Visual Art या चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन अनेक संधी प्राप्त करता येतात. महिलांसाठी मुंबई येथील एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठाने तशी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. B. V. A. या वेगळ्या अभ्यासक्रमाचा परिचय व त्यातील करिअरच्या संधी याविषयी मार्गदर्शन करणारा लेख देत आहोत. लेखमालेतील यापूर्वीचे लेख वाचन करण्यासाठी ह्या लेखाच्या शेवटी लिंक दिल्या आहेत. जिज्ञासूंनी त्याचा लाभ घ्यावा.
- श्री. भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा
प्रा. देविदास गिरी, उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय

मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरी
उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय
संपर्क : 9822478463

Visual Art मध्ये करिअर करण्याची विद्यार्थिनींना सुवर्णसंधी

बारावीच्या विद्यार्थीनींसाठी
इयत्ता बारावी कला, वाणिज्य, विज्ञान, एमसीव्हीसी, होम सायन्सच्या सर्व विद्यार्थीनींना करता येईल असा अभ्यासक्रम मुंबई येथील एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठाने सुरू केलेला आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी बारावी उत्तीर्ण एवढीच पात्रता आहे. ज्या विद्यार्थीनींना ड्रॉईंग आणि पेंटींगमध्ये पदवी प्राप्त करावयाची आहे त्यांच्यासाठी हा अभ्यासक्रम अनेक संधी उपलब्ध करुन देणारा आहे.

ड्रॉईंग अँड पेंटींग
या क्षेत्रात ज्या विद्यार्थीनी शिक्षण घेऊ इच्छितात त्यांना तसेच या क्षेत्राची लहानपणापासून आवड असणाऱ्या विद्यार्थीनींना अत्यंत उपयुक्त होय. यामध्ये वीस टक्के अध्ययन आणि ऐंशी टक्के प्रात्याक्षिकावर भर असतो. इयत्ता बारावीचा निकाल लागल्यावर ज्या ज्या महाविद्यालयात हा अभ्यासक्रम चालतो  त्यांच्या प्रवेशाच्या जाहिराती प्रसिद्ध होतात.

Bachelor of Visual Art
B. V. A. म्हणजेच Bachelor of Visual Art  होय. बारावीनंतर हा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असून, विद्यार्थीनींच्या अंगीभूत असलेल्या कलागुणांना विकसित करण्याची चांगली संधी आहे. यात कलेची साधना आहे, उपासना आहे, कलेशी समरस होऊन जीवनाचे, निसर्गाचे अनेक विभ्रम रेखाटता येतात. यातील आनंद हा अविस्मरणीय आणि स्वतःला जेवढा आनंद देतो. तेवढाच आनंद ह्या कलेचा आस्वाद घेणारा रसिक मिळवित असतो.

अभ्यासक्रम आणि विषय
B. V. A. या चार वर्षांच्या अभ्यासक्रमात डिझायनिंग, नेचर ऑब्जेक्ट, थ्रीडी डिझायनिंग, कलेचा इतिहास, चित्र शैली, पाश्चात्य व भारतीय चित्रक लेचा इतिहास, पाश्चात्य आणि भारतीय सौंदर्यशास्त्र इत्यादी विषयांचा समावेश असून प्रात्याक्षिकावर जास्तीत जास्त भर असतो. शेवटच्या वर्षाला शोधप्रबंध सादर करावा लागतो. हा अभ्यासक्रम विद्यार्थीनींसाठी असून नाशिक येथे गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एस. एम. आर. के. महिला महाविद्यालयात तसेच एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठाच्या मुंबई आणि पुणे येथील महिला महाविद्यालयात शिकवला जातो.

B. V. A. पदवीनंतरच्या संधी
ही पदवी संपादन केल्यानंतर M. V. A. म्हणजेच 1. Master of Visual Art, म्युझिओलॉजी, ऑर्किओलॉजी, डिझाईनिंग इत्यादी पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो.
2. सेट डिझाईनर
3. ग्राफिक डिझाईनर
4. अॅनिमेटर
5. इलेस्ट्रेटर
6. स्टुडिओ मॅनेजर
7. सिरॅमिक डिझाईनर
8. बुक जॅकेट डिझाईनर
9. प्रिंटींग प्रेसमध्ये आर्टिस्ट
10. टेक्सटाईल डिझाईनर
11. फाईन आर्टिस्ट
12. पेंटींग अॅकेडमी
13. स्वतःच्या चित्रांचे प्रदर्शन
14. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये ड्रॉईंग टिचर इत्यादी क्षेत्रात भरपूर संधी आहेत.

पीएचडी पदवी
M. V. A. ही पदव्युत्तर पदवी संपादन केल्यानंतर भारतातील विविध विद्यापीठांमध्ये PET परीक्षा दिल्यानंतर अथवा NET किंवा JRF परीक्षा पास झाल्यानंतर पीएचडी च्या सर्वोच्च पदवीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो.

वेगळे क्षेत्र, वेगळी संधी
इयत्ता बारावी नंतर विद्यार्थीनींना अतिशय चांगले क्षेत्र म्हणून आज या पदवीकडे पाहिले जाते. केवळ योग्य त्या मार्गदर्शनाच्या अभावी या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थीनींना पाठविले जात नाही. विद्यार्थीनींजवळ उपजतच सौंदर्यदृष्टी असते. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून एक चांगले स्वत:च्या पायावर उभे राहाता येईल असे क्षेत्र होय हे विद्यार्थीनींनी लक्षात घ्यावे.
                   

( लेखक इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयाचे उपप्राचार्य असून स्पर्धा परीक्षांचे महाराष्ट्रातील नामवंत लोकप्रिय मार्गदर्शक आहेत. विविध विषयांवर त्यांची विविध मार्गदर्शक पुस्तके प्रसिद्ध आहेत. )

लेखांक १ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/1815

लेखांक २ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/1838

लेखांक ३ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/1887

लेखांक ४ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/1921

लेखांक ५ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/1965

लेखांक ६ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2018

लेखांक ७ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2030

लेखांक ८ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2067

लेखांक ९ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2090

लेखांक १० साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2132

लेखांक ११ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2157

लेखांक १२ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2204

लेखांक १३ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2238

लेखांक १४ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2244

लेखांक १५ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2292

लेखांक १६ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2317

लेखांक १७ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2356

लेखांक १८ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2392

Similar Posts

error: Content is protected !!