१२ वी नंतर BBA ची पदवी मिळवण्याचा मंत्र
पारंपरिक पदवीपेक्षा इयत्ता बारावी नंतर कोणत्याही शाखेचा विद्यार्थी BBA ह्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊन आपले करिअर चांगल्या प्रकारे घडवू शकतो. तसेच विविध कंपन्या, बँका, वित्तीय क्षेत्र, स्पर्धा परीक्षा, संशोधन क्षेत्र, अध्यापन क्षेत्र आदी अनेक क्षेत्रातील संधी प्राप्त करू शकतो हे सांगणारा आजचा लेख देत आहे. लेखमालेतील यापूर्वीचे लेख वाचण्यासाठी ह्या लेखाच्या शेवटी लिंक दिली आहे. जिज्ञासूंनी याचा लाभ घ्यावा.
- श्री. भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा
मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरी
उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय
संपर्क : 9822478463
१२ वी नंतर BBA पदवी मिळवण्याचा मंत्र
BBA पदवी
इयत्ता बारावी कला, वाणिज्य, विज्ञान, एमसीव्हीसी, होम सायन्स या वर्गांच्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना BBA पदवीसाठी प्रथम वर्षाला गुणवत्तेनुसार संबंधित महाविद्यालयात प्रवेश मिळतो. व्यवस्थापन शास्त्रामध्ये, वाणिज्यमध्ये, विविध कंपन्यांमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून ज्या विद्यार्थ्यांना पुढे करिअर करावयाचे आहे असे विद्यार्थी BBA च्या प्रवेशासाठी प्रयत्न करतात.
पदवी अभ्यासक्रम
BBA चा हा पदवी अभ्यासक्रम तीन वर्षांचा आहे. यामध्ये Marketing, Finance, Human Resource यामध्ये विद्यार्थी साधारणतः पदवी मिळवणे पसंद करतात. BBA म्हणजे Bachelor of Business Administration होय.
MBA ची पूर्वतयारी
BBA चा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर बरेच विद्यार्थी MBA म्हणजेच Master of Business Administration च्या प्रवेशासाठी प्रयत्न करतात.
MBA CET
BBA ची पदवी संपादन केल्यानंतर MBA प्रवेशासाठी महाराष्ट्रात महाराष्ट्र शासनाच्या CET Cell च्या वतीने घेतल्या जाणाऱ्या CET परीक्षा देऊन विद्यार्थी MBA साठी प्रवेश घेतात.
M. Com. पदव्युत्तर पदवी
BBA पदवी संपादन केलेला विद्यार्थी कोणत्याही विद्यापीठाच्या M. Com. प्रवेशासाठी पात्र असतो. M. Com. ची पदव्युत्तर पदवी दोन वर्षांची असते. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी SET, NET, JRF या परीक्षा देऊ शकतो. पुढे PET परीक्षा देऊन Ph. D. च्या अभ्यासक्रमाला विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो.
MBA झालेला विद्यार्थी
BBA नंतर जे विद्यार्थी MBA करतात त्यांना SET, NET, JRF या परीक्षा Management या विषयात देऊ शकतात. तसेच Ph. D. ची जी प्रवेश परीक्षा आहे ती Ph .D. Entrance Test ही परीक्षा देऊन संबंधित विद्यार्थी Ph. D. च्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतो.
ICWA
BBA झालेला विद्यार्थी Institute of Cost and Work Accountants ची ICWA ही परीक्षा देऊ शकतो.
DTL
BBA पदवी संपादन केल्यानंतर विद्यार्थी DTL म्हणजेच Diploma In Taxation Law हा Diploma लॉ कॉलेजमध्ये असलेला संबंधित विद्यार्थी करू शकतो.
Management Trainer
BBA पदवी संपादन केलेला विद्यार्थी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून जॉब करू शकतो. BBA नंतरची ही जॉबची चांगली संधी होय.
वेगळ्या संधी
BBA ची पदवी संपादन केल्यानंतर विद्यार्थी MPSC, UPSC, SSC ( Staff Selection Commission ), BANK, Railway, Indian Post Department इत्यादींच्या स्पर्धा परीक्षा देखील विद्यार्थी देऊ शकतो. CA देखील BBA नंतर करायचे असेल तर विद्यार्थी करु शकतो.
थोडक्यात
BBA ची पदवी इयत्ता बारावी नंतर संपादन करून विद्यार्थी पुढचे शिक्षण घेऊ शकतो. जॉब करू शकतो. स्पर्धा परीक्षाही देऊ शकतो.थोडक्यात ह्या पर्यायात अनेक संधी आहेत हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे.
( लेखक इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयाचे उपप्राचार्य असून स्पर्धा परीक्षांचे महाराष्ट्रातील नामवंत लोकप्रिय मार्गदर्शक आहेत. विविध विषयांवर त्यांची विविध मार्गदर्शक पुस्तके प्रसिद्ध आहेत. )
◆ लेखमालेतील १ ते १९ ह्या लेखांसाठी खालील लेखांक २० च्या शेवटी सर्व लिंक दिल्या आहेत. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.
Comments