इगतपुरीनामा न्यूज : राज्यातील शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात इगतपुरी तालुक्यातील ज्ञानदा माध्यमिक विद्यालयाने इगतपुरी तालुक्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने जिल्ह्यात उत्तेजनार्थ बक्षीस पटकावले आहे. दोन्ही शाळांच्या यशाबद्दल राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांनी कौतुक करून अभिनंदन केले आहे. गोरख बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानदा विद्यालय […]
इगतपुरीनामा न्यूज – नाशिक जिल्हा मराठी अध्यापक संघ आयोजित जागतिक मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्काराने निनावी जि. प. शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका सुशीला चोथवे यांना पद्मश्री राहीबाई पोपरे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक गौरवण्यात आले. शिरवाडे वणी येथे जागतिक मराठी दिन गौरव, दिन कविवर्य कुसुमाग्रज जीवन गौरव सन्मान सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष गौतम पाटील होते. […]
इगतपुरीनामा न्यूज : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ अंतर्गत इगतपुरी येथील ‘नाशिप्र’ संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात ‘इतर उपक्रम योजना’ या उपक्रमांतर्गत एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत मनोहर घोडे यांनी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये स्पर्धा परीक्षांचे महत्त्व, स्पर्धा परीक्षांचे शिखर गाठण्यासाठी एमपीएससी/यूपीएससी, तलाठी, ग्रामसेवक, तहसीलदार परीक्षांची […]
इगतपुरीनामा न्यूज – पाथर्डी फाटा येथील न्यु इंग्लिश स्कुलमध्ये गोंदे दुमाला येथील १९९७-९८ मधील दहावीच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत आठवणींना उजाळा दिला. तब्बल २५ वर्षांनी त्यांची शाळा भरल्याने त्यांनी आनंद व्यक्त करीत अधिक स्नेहबंध घट्ट केले. यावेळी तत्कालीन शिक्षकांनी सर्व उपस्थित माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या शाळेची विद्यार्थ्यांची पहिली यशस्वी बॅच दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर गेली पंचवीस […]
इगतपुरीनामा न्यूज – विद्यार्थी आणि महाविद्यालये नव्या भारतासाठी प्रेरणास्रोत आहेत. समस्यांचा बाऊ न करता यश मिळेपर्यंत लढायला शिका. आईवडील गुरुजनांचे स्वप्न साकार करण्यासाठी कामाला लागा. यासह मुलींमध्ये महापुरुष जन्माला घालण्याची क्षमता आहे. माँ जिजाऊ सारख्या माता जन्माला आल्या तरच शिवबांसारखे महापुरुष जन्माला येतील असे प्रतिपादन सुप्रसिद्ध गीतकार, गायक , समाजप्रबोधनकार प्रा. डाॅ. गणेश चंदनशिवे यांनी […]
इगतपुरीनामा न्यूज – पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळ व नाशिप्र मंडळ संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब जयकर तीन दिवसीय व्याख्यानमाला संपन्न झाली. केंद्र कार्यवाह प्रा. कांतीलाल दुनबळे यांनी प्रास्ताविक केले. पहिल्या विचार पुष्पात प्रा. संजय शेलार यांनी ‘भारतातील शैक्षणिक स्थित्यंतर आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील गावठा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुंबई येथील ऊर्जा ग्रुपकडून विविध कामे पूर्ण करण्यात आली. राज्य आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी यांनी ह्या शाळेत वर्गखोली व व्हरांडा फरशीकाम, नवीन ध्वजस्तंभ, रंगमंच, पाण्याची टाकी, ओटा यांची दुरुस्ती, फरशीकाम, मुलामुलींचे स्वच्छतागृह दुरुस्ती, लाईट फिटिंग दुरुस्ती, नळ फिटिंग दुरुस्ती, खिडक्या वेल्डिंग काम, स्वच्छता गृहाकडे जाणारा […]
इगतपुरीनामा न्यूज – आजच्या तीव्र स्पर्धेच्या युगामध्ये अर्थप्राप्तीसाठी केवळ नोकरीवर विसंबून न राहता त्याला पूरक व्यवसायाची जोड द्यावी. विविध व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करून आत्मनिर्भर होण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपली क्षमता ओळखावी. व्यवसायात यशस्वी होण्यासाठी यशस्वी झालेल्या उद्योजकांचे योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत. सूक्ष्म अभ्यास करून सहज करता येणारे शेकडो व्यवसाय नव उद्योजकांची वाट पाहत असल्याने संधीचे सोने […]
इगतपुरीनामा न्यूज – स्पर्धेच्या युगात स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी अविरत प्रयत्न, प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवणे गरजेचे आहे. लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षा, त्यांचा अभ्यासक्रम, मुलाखत व निवडपद्धती याविषयी सविस्तर माहिती गरजेची आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्याचे प्रमाण जास्त आहे याला ग्रामीण तरुणांचा प्रामाणिकपणा व […]
इगतपुरीनामा न्यूज – मानवेढे येथे झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष चषक तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत पेहरेवाडी शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे. धावण्याच्या स्पर्धेत पेहेरेवाडीचा खेळाडू विशाल शिद याने ४०० मीटर धावणे स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवला. मुलांच्या कबड्डी संघाने प्रथम दोन सामने एकहाती जिंकत अंतिम सामन्यात धडक मारली. अटीतटीची लढत होऊन अंतिम सामना पेहेरेवाडीने तीन गुणांनी […]