
इगतपुरीनामा न्यूज – श्री शंकराचार्य संस्कृत युनिव्हर्सिटी, कलाडी, केरळ येथे अखिल भारतीय विद्यापीठ स्तरावरील शरीरसौष्ठव स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत नाशिप्र संचालित इगतपुरी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाचे दोन विद्यार्थी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सहभागी झाले होते. या स्पर्धेत ७० किलो वजनी गटात प्रथम वर्ष वाणिज्य शाखेतील गणेश भागडे याने गोल्ड मेडल पटकावले. ६५ किलो वजनी गटात तृतीय वर्ष वाणिज्य शाखेतील कु. पंढरीनाथ बोंडे याने सिल्वर मेडल पटकावले. महाविद्यालय आणि विद्यापीठासाठी ही गर्वाची बातमी आहे असल्याचे महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. प्रतिभा हिरे म्हणाल्या. यशस्वी खेळाडूंना माजी विद्यार्थी खेळाडू रितेश भडांगे आणि क्रीडा संचालिका प्रा. प्रतिभा सकट यांनी मार्गदर्शन केले.नाशिक नाशिप्रचे अध्यक्ष मारुती कुलकर्णी, सेक्रेटरी अश्विनीकुमार येवला, महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष हेमंत सुराणा यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करुन अभिनंदन केले. महाविद्यालय समन्वयक डॉ. बाळू घुटे, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी, नागरिक आदींनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.
