इगतपुरीनामा न्यूज : महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती संघ संचलित संजीवनी प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळेत निवासी विद्यार्थ्यांसाठी जॉन्सन अँड जॉन्सन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे डोळ्यांची तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. मुंबई येथील “जॉन्सन” प्लांटच्या ऑप्टोमेट्रिस्ट टीमकडून निवासी विद्यार्थ्यांसाठी या मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले. जॉन्सनचे सहाय्यक व्यवस्थापक संतोष भांगे, ऑप्टोमेट्रिस्ट मनन गाला, प्रथमेश ससाने, प्रणव सप्नंदन यांच्यासह […]
इगतपुरीनामा न्यूज : इगतपुरी शहरातील प्रथीतयश वैद्यकीय व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. काजल परदेशी यांचा वाढदिवस संजीवनी आश्रम शाळेत उत्साहात साजरा करण्यात आला. आश्रमशाळा प्रशासनाकडून यावेळी त्यांचे हृद्य सत्कार करण्यात आला, त्याचबरोबर आश्रमशाळेतील विद्यार्थिनींनी डॉ. परदेशी यांचे औक्षण करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण आश्रमशाळेमध्ये मिळत आहे, त्याचबरोबर उत्तम दर्जाच्या भौतिक सुविधाही […]
इगतपुरीनामा न्यूज : राज्यात दोन टप्प्यात शिक्षक भरती केली जाणार असून पहिल्या टप्प्यात जवळपास तीस हजार जागा भरण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान स्पष्ट केले होते. त्यासाठीचे वेळापत्रकही त्यांनी जाहीर करून 15 ऑगस्ट पासून पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. मात्र 15 ऑगस्ट नंतर आज सहा […]
इगतपुरीनामा न्यूज : परीक्षेतील गुण हा आकड्यांचा खेळ असला तरी यातही काही गमतीदार उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. असेच एक गमतीदार आकड्यांचे उदाहरण आम्ही आज दाखवणार आहोत. आजच दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. निकाल म्हटलं की कुणाला किती गुण मिळाले असतील याची सगळ्यांनाच उत्सुकता असते. घसघशीत गुण मिळवून पास होणाऱ्यांचं कमी गुण मिळवून पास होणाऱ्यांचं होत […]
इगतपुरीनामा न्यूज : इगतपुरी येथील महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती संघ संचलित संजीवनी माध्यमिक आश्रमशाळेचा दहावीचा निकाल 85 टक्के लागला आहे. राजेंद्र गोविंद दासरी याने 74.80 टक्के गुण मिळवून आश्रम शाळेत प्रथम क्रमांक, सावन सुरेश माळी याने 71.80 गुण मिळवून द्वितीय तर लीना दिनेश गोसावी हिने 69.80 टक्के गुण मिळवून आश्रम शाळेमधून तृतीय क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांच्या […]
इगतपुरीनामा न्यूज – मार्च २०२३ मध्ये राज्य शासनाच्या माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या शालांत (दहावी) परीक्षेचा निकाल उद्या ( दि. ०२ ) जाहीर होणार आहे. परीक्षा मंडळाच्या अधिकृत संकेत स्थळावर याबाबतचे प्रकटन जाहीर करण्यात आले असून त्यात उद्या दुपारी एक वाजेनंतर विद्यार्थ्यांना मंडळाच्या संकेत स्थळावर निकाल पाहता येईल, असे म्हटले आहे. दरम्यान दहावी नंतरच्या उच्च […]
आज दुपारी दोन वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही घरबसल्या थेट निकाल पाहू शकता, डाऊनलोड करू शकता! लिंक वर क्लिक करण्यापूर्वी तुमचा बैठक क्रमांक तयार ठेवा. दिलेल्या लिंक वर बैठक क्रमांक आणि योग्य स्पेलिंग सह आईचे नाव टकले की तुमचा निकाल लगेच स्क्रीनवर दिसेल! https://mahresult.nic.in https://hscresult.mkcl.org https://hsc.mahresults.org.in
इगतपुरीनामा न्यूज – फेब्रुवारी २०२३ मध्ये राज्य शासनाच्या उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या ( दि. २५ ) जाहीर होणार आहे. परीक्षा मंडळाच्या अधिकृत संकेत स्थळावर याबाबतचे प्रकटन जाहीर करण्यात आले असून त्यात उद्या दुपारी दोन वाजेनंतर विद्यार्थ्यांना मंडळाच्या संकेत स्थळावर निकाल पाहता येईल, असे म्हटले आहे. दरम्यान बारावी नंतरच्या उच्च […]
इगतपुरीनामा न्यूज दि. १ : राज्यात उद्यापासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील महात्मा गांधी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे परीक्षा केंद्र नियोजन बैठक संपन्न झाली. विद्यालयाचे उपप्राचार्य तथा परीक्षा केंद्र संचालक उमाकांत वाकलकर हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. इगतपुरी शहरात दोन परीक्षा केंद्र कार्यान्वित आहेत. दोन्ही परीक्षा केंद्र मिळून जवळपास एक हजारांहून […]
इगतपुरीनामा न्यूज दि. १९ : इगतपुरी येथील महात्मा गांधी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्राचार्य अनिल पवार हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. शिवाजी महाराजांची कर्तृत्व डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे आचरण केल्यास नक्कीच उत्तम विद्यार्थी घडतील असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे मुख्य वक्ते कुणाल जोशी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध युद्ध मोहिमा, […]