कवी : प्रकाश पाटील कवठेकर
संवाद : 9860702169
विसरू नको रे कर्तव्याला
जगण्या आयुष्य थोडे !
कळणार नाही तुला
कोरोनाचे कोडे !!
रोग आहे हा भयंकर
सरणावर नेऊन सोडे !
कळणार नाही तुला
कोरोनाचे कोडे !!
नियमांचे तू पालन कर
कुटूंबासाठी थोडे !
कळणार नाही तुला
कोरोनाचे कोडे !!
अनमोल आहे आयुष्य तुझे रे
घे माणुसकीचे धडे !
कळणार नाही तुला
कोरोनाचे कोडे !!
रेमडीसिविर मिळविण्यासाठी
तुझे कुटुंब झाले रे वेडे !
कळणार नाही तुला
कोरोनाचे कोडे !!
जगण्यासाठी प्राणवायू रे
वृक्ष तुला रे सोडे !
कळणार नाही तुला
कोरोनाचे कोडे !!
जागा हो माणसा आता
जीवन जगण्या थोडे !
कळणार नाही तुला
कोरोनाचे कोडे !!
( कवी प्रकाश पाटील कवठेकर हे इगतपुरी पंचायत समिती अंतर्गत कोरपगाव येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत. ते सर्वोत्तम चित्रकार असून आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या तैलचित्रांना अव्वल दर्जा मिळाला आहे. अनेक पारितोषिके त्यांच्या नावावर आहेत. )