दहावी बारावी नंतर पुढे काय ? लेखांक १५

12 वी नंतर Nursing क्षेत्रात करिअर करायचे आहे ?
इयत्ता बारावी नंतर उमेदवार Nursing मधील ANM पासून शिक्षणाला प्रारंभ करुन Ph. D. पदवीपर्यंत शिक्षण घेऊ शकतो. यामध्ये उत्तम प्रकारचे करिअर करण्याची उत्तम संधी आहे. हा करिअरचा मार्ग आजच्या परिस्थितीत उमेदवाराना निश्चितच उपयुक्त आणि नवी दिशा देणारा आहे. आजच्या लेखातील परिपूर्ण मार्गदर्शन यशाकडे घेऊन जाऊ शकते. लेखमालेतील इतर लेखांची लिंक शेवटी दिली आहे.
- भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा
प्रा. देविदास गिरी, उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय

मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरी
उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय
संपर्क : 9822478463

इयत्ता बारावी विद्यार्थिनींसाठी
इयत्ता बारावी शाखेतील विद्यार्थीनींना नर्सिंग क्षेत्रात मोठया प्रमाणात संधी आहेत. सध्या कोविड महामारीच्या प्रादुर्भावामुळे आरोग्य क्षेत्रातील करिअरला अनन्यसाधारण असे स्थान निर्माण झाले आहे. हे शिक्षण घेण्यासाठी खर्च देखील कमी येतो. तसेच नर्सिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सरकारी तसेच खाजगी आरोग्य क्षेत्रात लगेचच नोकरीची संधी उपलब्ध आहे. इयत्ता बारावी नंतर लवकरात लवकर जर स्वतःच्या पायावर आर्थिकदृष्टया उभे राहावयाचे असेल तर या क्षेत्रात करिअरच्या भरपूर संधी आहेत.

ANM
Auxiliary Nurse Midwife हा इयत्ता बारावी नंतरचा अभ्यासक्रम असून यामध्ये बारावीच्या कोणत्याही शाखेच्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळतो. हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम आहे. नर्सिंग क्षेत्रातील बेसिक अभ्यासक्रम म्हणून याला संबोधले जाते. सरकारच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात अथवा उपकेंद्रात नोकरी मिळते. उमेदवार खाजगी हॉस्पिटलमध्ये देखील नोकरी करु शकतो. अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर नर्सिंग कौन्सिलकडे रजिस्ट्रेशन करणे आवश्यक असते.

GNM
General Nursing Midwifery ज्या विद्यार्थ्यांचा ANM हा अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे त्यांना GNM साठी प्रवेश मिळतो. हा अभ्यासक्रम तीन वर्षांचा आहे. अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर परिचारिका म्हणून सरकारी व खाजगी आरोग्य क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. उमेदवाराने Additional Education ची नोंदणी करणे आवश्यक असते.

Post Basic B Sc. Nursing
ज्यांचे GNM  झालेले आहे त्यांच्यासाठी हा अभ्यासक्रम दोन वर्षांचा आहे.

B Sc. Nursing
हा अभ्यासक्रम बारावी सायन्स नंतर असून PCBE म्हणजेच बारावी सायन्सला ज्यांचे Physics, Chemistry, Biology, English हे विषय आहेत. आणि जनरल प्रवर्गासाठी 45 टक्के मार्क आणि राखीव प्रवर्गासाठी 40 टक्के मार्क आहेत. त्यांना NEET देऊन गुणवत्तेनुसार प्रवेश घेता येतो.

M Sc. Nursing
B Sc. Nursing उत्तीर्ण झालेले विद्यार्थी M Sc. Nursing अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात. हा अभ्यासक्रम दोन वर्षांचा पदव्युत्तर पदवीचा होय.

पीएचडी
M Sc. Nursing झालेले उमेदवार पीएचडी नर्सिंगच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात.

Post Certificate Courses
GNM नंतर उमेदवार एक वर्षाचे प्रमाणपत्र Courses करू शकतात. उदाहरणार्थ
1. Public health Nursing
2. Paediatrics Nursing
3. Oncology Nursing
4. Orthopedic Nursing
5. Gynaec and Obstetric Nursing
6. Cardiac Nursing
याप्रमाणे उमेदवार प्रमाणपत्र कोर्स करू शकतो.
                      

( लेखक इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयाचे उपप्राचार्य असून स्पर्धा परीक्षांचे महाराष्ट्रातील नामवंत लोकप्रिय मार्गदर्शक आहेत. विविध विषयांवर त्यांची विविध मार्गदर्शक पुस्तके प्रसिद्ध आहेत. )

लेखांक १ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/1815

लेखांक २ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/1838

लेखांक ३ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/1887

लेखांक ४ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/1921

लेखांक ५ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/1965

लेखांक ६ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2018

लेखांक ७ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2030

लेखांक ८ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2067

लेखांक ९ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2090

लेखांक १० साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2132

लेखांक ११ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2157

लेखांक १२ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2204

लेखांक १३ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2238

लेखांक १४ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2244

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!