दहावी बारावी नंतर पुढे काय ? लेखांक २७

12 वी नंतर वैमानिक प्रशिक्षण स्वरूप व पात्रता
इयत्ता बारावी सायन्समध्ये Physics, Mathematics हे विषय घेऊन इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे, शारीरिक तंदुरुस्तीसह, ध्येय निश्चिती, समायोजन कौशल्य, निर्णयक्षमता, व्यवस्थापन कौशल्य, संज्ञापन कौशल्य आणि सुरक्षिततेला प्राधान्य, विमान उड्डाणाचे यशस्वी प्रशिक्षण या गुणांच्या आधारे चांगला पायलट म्हणून कार्य करता येते. याबाबत सखोल मार्गदर्शन आजच्या लेखाद्वारे करीत आहोत. लेखमालेतील यापूर्वीचे महत्वपूर्ण लेख वाचण्यासाठी या लेखाच्या खाली लिंक दिल्या आहेत. जिज्ञासूंनी त्याचा लाभ घ्यावा.
- भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा
प्रा. देविदास गिरी, उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय

मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरी
उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय
संपर्क : 9822478463

12 वी नंतर वैमानिक प्रशिक्षणाद्वारे स्वप्नपूर्तीची संधी

वैमानिक ( Pilot ) होण्याचे स्वप्न
लहाणपणापासून विद्यार्थ्याला वेगवेगळ्या गोष्टींची स्वप्न असतात. मला सायकल चालविता आली पाहिजे ? त्यानंतर दुचाकी चालविणे, चारचाकी चालविणे त्याचप्रमाणे अनेकांना वैमानिक होण्याचे स्वप्न असतात. शालेय वयात असताना मी वैमानिक झालो तर !  या विषयावर निबंध देखील लिहिलेला असतो. अनेकांना या क्षेत्रात यावेसे वाटते. पूर्वीसारखे पर्यटनाचे क्षेत्र तसेच दळणवळणाची साधने मर्यादित राहिलेली नाहीत. जागतिकीकरणामुळे जग अत्यंत जवळ आले आहे. त्यामुळे सामान्य कुटुंबातील व्यक्तीदेखील विमान प्रवास करताना आपल्याला दिसतात. पर्यटन क्षेत्र विस्तारल्यामुळे देखील या क्षेत्राला चांगले दिवस आलेले आहेत. जगातील हवाई वाहतूकीला आता खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे. त्यामुळे या क्षेत्रात करिअरच्या संधी मोठ्या प्रमाणात आहेत.

शैक्षणिक पात्रता
वैमानिक ( Pilot ) व्हायचे असेल तर इयत्त्ता बारावी सायन्स मध्ये Physics आणि Mathematics हे विषय घेतलेले हवेत. तसेच किमान वय १७ पूर्ण असायला हवे.

शारीरिक पात्रता
कोणत्याही प्रकारचा दृष्टीदोष नसावा. शरीरात कोठेही फ्रॅक्चर नसावे. वैद्यकीय चाचणीमध्ये शारीरिक तंदुरूस्ती महत्त्वाची असते.

प्रशिक्षण संस्था
वैमानिकाचे प्रशिक्षण देण्यासाठी भारतात अनेक प्रशिक्षण संस्था आहेत. त्यामध्ये
इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण संस्था : या संस्थेत विविध प्रकारच्या हवाई वाहतुकीचे प्रशिक्षण दिले जाते. सर्व प्रकारच्या अत्याधुनिक यंत्रणा संस्थेत उपलब्ध आहे.
■ मुंबई फ्लाईंग क्लब : भारतातील या संस्थेने कमर्शिअल पायलट ट्रेनिंग सुरु केलेले आहे. धुळे येथे या संस्थेचे प्रशिक्षण केंद्र आहे.
■ सी ए ई ऑक्सफर्ड एविएशन संस्था : गोंदिया येथे ही संस्था एअरपोर्ट अँथॉरिटी ऑफ इंडियाच्या संयुक्त विद्यमाने स्थापन करण्यात आलेली आहे. या संस्थेने कमर्शिअल पायलट ट्रेनिंग प्रोग्रॅम सुरू केला आहे.
■ अधिकृत फ्लाईंग स्कूल : भारतामध्ये अनेक ठिकाणी अधिकृत, मान्यताप्राप्त फ्लाईंग स्कूल आहेत. त्यामध्ये बारामती, गोवा, बेंगलोर, पुणे, इंदौर, दिल्ली आदी ठिकाणी प्रशिक्षण केंद्र आहेत.

उड्डाण प्रशिक्षण
भारतात CPL म्हणजेच कमर्शिअल पायलट लायसन्स मिळविण्यासाठी दोनशे तासांचे यशस्वी प्रशिक्षण आवश्यक असते. प्रशिक्षणामधील अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणे, अभ्यासक्रमातील सर्व पेपर्स उत्तीर्ण होणे, वैद्यकीय शारीरिक चाचणी यशस्वीरित्या पूर्ण करणे या गोष्टी पायलट प्रशिक्षणामध्ये आवश्यक असतात. प्रशिक्षणाची फी मोठी असते. प्रत्येक प्रशिक्षण संस्थेनुसार फी वेगवेगळी असते.

थोडक्यात महत्वाचे
या अभ्यासक्रम आणि प्रशिक्षणामध्ये ध्येय निश्चिती, शैक्षणिक व शारीरिक पात्रता, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, समायोजन कौशल्य, दैनंदिन जीवनातील लवचिकता, निर्णय क्षमता, व्यवस्थापन कौशल्य, संज्ञापन कौशल्य आणि सुरक्षिततेला प्राधान्य या गुणांची देखील आवश्यकता महत्त्वाची मानली जाते. या गुणांच्या आधारे एक चांगला पायलट म्हणून यशस्वी होता येते.

( लेखक इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयाचे उपप्राचार्य असून स्पर्धा परीक्षांचे महाराष्ट्रातील नामवंत लोकप्रिय मार्गदर्शक आहेत. विविध विषयांवर त्यांची विविध मार्गदर्शक पुस्तके प्रसिद्ध आहेत. )

◆ लेखमालेतील १ ते १९ ह्या लेखांसाठी खालील लेखांक २० च्या शेवटी सर्व लिंक दिल्या आहेत. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.

https://igatpurinama.in/archives/2428

लेखांक २१ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2460

लेखांक २२ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2484

लेखांक २३ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2500

लेखांक २४ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2534

लेखांक २५ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2550

लेखांक २६ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2579

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!