दहावी बारावी नंतर पुढे काय ? लेखांक २८

१२ वी नंतर German Studies मधील संधी

इयत्ता बारावी नंतर German Studies मध्ये B. A., M. A., Ph. D. आदी पदव्या संपादन करून व्यवसाय आणि नोकरीच्या अनेक संधी मिळवता येतात. याबाबतचे मार्गदर्शन करणारा लेख आज देत आहोत. लेखमालेतील यापूर्वीचे लेख वाचण्यासाठी  ह्या लेखाच्या शेवटी लिंक दिल्या आहेत. जिज्ञासूंनी याचा लाभ घ्यावा.
- भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा
प्रा. देविदास गिरी, उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय

मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरी
उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय
संपर्क : 9822478463

12 वी नंतर German Studies मध्ये करिअर

भाषा विषयात करिअर
भारतातील महत्त्वाच्या भाषा जसे मराठी, हिन्दी, इंग्रजी, तामिळ, गुजराथी, आसामी इत्यादी तसेच परदेशी भाषा ( Foreign Language ) भाषांचे शिक्षण घेऊन पदवी संपादन करावी. त्या भाषेवर प्रभुत्व संपादन करून अतिशय चांगल्या प्रकारचे करिअर करता येते. करिअर घडवण्याच्या दृष्टीने भाषा विषयांचा देखील विचार विद्यार्थ्यांनी करणे गरजेचे होय.

जागतिकीकरणात महत्त्वाचे क्षेत्र
भाषांचा अभ्यास जागतिकीकरणाच्या काळात अत्यंत महत्त्वाचा होय. यासाठी विविध कंपन्या, उद्योगक्षेत्र, परदेशी पाहुणे, अभ्यासक, तंत्रज्ञ यांच्यासाठी अनुवादक, भाषांतरकार म्हणून काम करणे, सेवा पुरविणे, गाईड म्हणून काम करणे इत्यादी चांगली कामे, चांगली नोकरी या माध्यमातून मिळविता येते.

जर्मन भाषेचा अभ्यास
पापजर्मन भाषा, साहित्य, संस्कृती, परंपरा, इतिहास आदींमध्ये पदवी मिळवण्यासाठी भारतातील व महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठांमध्ये अभ्यासाची सुविधा उपलब्ध आहे. इयत्ता बारावी नंतर कोणत्याही शाखेचा विद्यार्थी की ज्या विद्यार्थ्याला 45 टक्के मार्क आहेत तो विद्यार्थी प्रवेश परीक्षा, मुलाखत देऊन आपला प्रवेश निश्चित करू शकतो. जागांची संख्या 30 ते 50 पर्यंतच असते हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे.

B. A. in GERMAN STUDIES
हा पदवी अभ्यासक्रम तीन वर्षांचा असून F. Y. B. A./ S. Y. B. A./ T. Y. B. A. या तीन वर्षात जर्मन भाषेचे सखोल ज्ञान, जर्मन भाषेतील साहित्य, जर्मन संस्कृती, परंपरा, जर्मन भाषेचा इतिहास इत्यादी विषयांच्या माध्यमातून तीन वर्षांच्या कालावधीत विद्यार्थी पदवी संपादन करतो.

M. A. in GERMAN  STUDIES
B. A. German Studies पदवी संपादन केल्यानंतर दोन वर्षांचा M. A. in German Studies हा दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सुविधा देखील विद्यापीठांमध्ये उपलब्ध आहे.

Department of German
भारतातील व महाराष्ट्रातील काही विद्यापीठांमध्ये B. A., M.A., Ph. D. या अभ्यासक्रमांची सुविधा उपलब्ध असून यासाठी या विद्यापीठांमध्ये स्वतंत्र जर्मन विभागाची स्थापना केली गेलेली आहे. M. A. in German Studies या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमानंतर  विद्यावाचस्पती म्हणजेच Ph. D. पूर्ण करण्याची सुविधा देखील निवडक विद्यापीठांमध्ये आहे.

व्यवसाय व नोकरीच्या संधी
जर्मन भाषा, साहित्य, संस्कृती, परंपरा, भाषेचा अभ्यास यानंतर तसेच कोणत्याही भाषेच्या अभ्यासानंतर व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने
1. भाषांतरकार
2. अनुवादक
3. लेखनिक
4. मिडिया क्षेत्र
5. वृत्तपत्रे
6. नियतकालिके
7. दूरदर्शन वाहिन्या
8. वेब पोर्टल
9. पत्रकार
10. संपादक
11. लेखक
12. प्रकाशक
13. मुद्रणक्षेत्र
14. ट्रॅव्हल गाईड
15. मुद्रितशोधक
16. शिक्षक, प्राध्यापक
17. संशोधक
18. भाषा अभ्यासक
19. भाषा वैज्ञानिक
20. संशोधक मार्गदर्शक
21. भाषा शिक्षण देणारी संस्था इत्यादी असंख्य संधी आहेत. यासाठी अभ्यास, वाचन, प्रभुत्व, संधींचा शोध घेणे या गोष्टी आवश्यक होय.

( लेखक इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयाचे उपप्राचार्य असून स्पर्धा परीक्षांचे महाराष्ट्रातील नामवंत लोकप्रिय मार्गदर्शक आहेत. विविध विषयांवर त्यांची विविध मार्गदर्शक पुस्तके प्रसिद्ध आहेत. )

◆ लेखमालेतील १ ते १९ ह्या लेखांसाठी खालील लेखांक २० च्या शेवटी सर्व लिंक दिल्या आहेत. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.

https://igatpurinama.in/archives/2428

लेखांक २१ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2460

लेखांक २२ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2484

लेखांक २३ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2500

लेखांक २४ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2534

लेखांक २५ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2550

लेखांक २६ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2579

लेखांक २७ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2606

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!