महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सिद्धार्थ सपकाळे बिनविरोध

इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी राज्य आदर्श पुरस्कार प्राप्त तंत्रस्नेही शिक्षक सिद्धार्थ सपकाळे यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी संघटनेच्या राज्य शाखेच्या सहविचार सभेत संघटनेचे राज्याध्यक्ष तथा सर्व कार्यकारिणी यांच्या ऑनलाईन बैठकीत सिध्दार्थ सपकाळे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. परंतु सपकाळे यांना सदर निवड मान्य नव्हती. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालुन दिलेल्या लोकशाही पध्दतीने कोणतीही संघटना अथवा सार्वजनिक पद हे सार्वभौम पद्धतीने निवडले जावे असे त्यांना वाटत होते. त्यामुळे आज जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष व शिक्षक पदाधिकारी यांची सहविचार सभा घेण्यात आली. ह्या सभेत पुन्हा एकदा सिद्धार्थ सपकाळे यासारख्या लढवय्या, प्रामाणिक, शिक्षकांच्या समस्यांची जाण असणाऱ्या तंत्रस्नेही शिक्षकाची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. सिध्दार्थ सपकाळे यांनी शिक्षक समस्या, अडीअडचणी तथा संघटनेच्या वाढीसाठी नक्कीच प्रयत्नशील असेल अशी ग्वाही दिली. या सहविचार सभेत संघटनेचे राज्य सरचिटणीस कैलास बोढारे, राज्य कोषाध्यक्ष अनिल बागुल, जिल्हा सरचिटणीस सुनिल मोरे, सुधाकर अहिरे, नाशिक मनपा तालुकाध्यक्ष पोपट घाणे, सुभाष लोहकरे, प्रेमचंद गांगुर्डे, राजेश बावनगडे, शांताराम आहिरे, संतोष श्रीवंत, सोपान लहीरे, बापु गरुड, महिला आघाडी प्रमुख दिपाली मोरे, नाशिक मनपा कोषाध्यक्षा मनिषा सैंद्रे आदी उपस्थित होते.

Similar Posts

error: Content is protected !!