इगतपुरीनामा न्यूज – हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या निमित्ताने इगतपुरी तालुक्यातील खडकवाडी येथील ग्रामस्थ आणि महिलांनी नवा पायंडा पाडला आहे. ह्या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण गावात स्वच्छता अभियान राबवून गावाला यापुढेही स्वच्छ आणि सुंदर बनवण्याची शपथ घेण्यात आली. बचत गटाच्या सर्व महिलांनी पदर खोचून स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन परिसर साफ केला. रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या, ओला […]
इगतपुरीनामा न्यूज – डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या सौजन्याने आज देशभरात जिल्हा तालुका स्तरावरील सरकारी कार्यालयांच्या आवारासह प्रमुख रस्त्यांची साफसफाई करण्यासाठी स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभियान मोहिमेचे स्वच्छतादूत म्हणून राज्यपालांनी डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची नियुक्ती केली […]
इगतपुरीनामा न्यूज – सोमठाणे येथील शिवसरस्वती फाउंडेशन आणि कृषी विभागातर्फे ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ या संकल्पने अंतर्गत मिलेट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थांची संख्या कमी करून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा शेतमाल मिळावा या उद्देशाने ह्या महोत्सवात बचत गट उत्पादने, पौष्टिक तृणधान्य विक्री व प्रदर्शन होणार आहे. […]
लेखन – डॉ. अविनाश गोरे, बालरोगतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा रुग्णालय नाशिक संपर्क – ७९७२४२६५८५. गुलेन /गियान बारे सिन्ड्रोम हा आजार आपल्या केंद्रीय मज्जासंस्थेचा असून आपली इम्युनिटी जेंव्हा चुकीच्या पद्धतीने कार्य करते तेंव्हा होतो. शरीरातील आपली इम्युनिटी जेंव्हा आपल्याच चांगल्या पेशींवर हल्ला करते तेंव्हा अनेक आजार होऊ शकतात त्यांपैकी हा एक आजार आहे. ह्याचा प्रादुर्भाव पुण्याच्या […]
इगतपुरीनामा न्यूज – क्षयरोग दुर्धर आजाराचा उपचार सहा महीने प्रदिर्घ आहे. उपचारादरम्यान चांगला आहार मिळाल्यास प्रतिकार शक्ती वाढून आजारावर मात करणे शक्य आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी क्षयरोग रुग्णांसाठी पुढाकार घेऊन मदत करावी असे आवाहन बेलगाव कुऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विश्वनाथ खतेले यांनी केले. इगतपुरीचे तालुका वैद्यकीय अधिकारी एम. बी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली […]
इगतपुरीनामा न्यूज – नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित इगतपुरी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबीर फांगुळगव्हाण येथे संपन्न झाले. १९ ते २५ जानेवारी या कालावधीत आयोजित ह्या शिबीरात युथ फॉर माय भारत युथ फॉर डिजिटल लिटरसी या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रम राबविण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा […]
इगतपुरीनामा न्यूज – सर्वत्र रक्ताचा तुटवडा असल्याने मोठी वाचू शकणाऱ्यांचा प्राण धोक्यात आलेला आहे. रक्ताचे संकलन होणे काळाची गरज असून यामुळे अनेकांचे प्राण वाचवण्यासाठी हातभार लागतो. केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष तथा केमिस्ट हृदयसम्राट जगन्नाथ शिंदे यांच्या अमृतमहोत्सवी ७५ व्या वाढदिवसानिमित्त राज्यभर ७५ हजार रक्त पिशव्या जमा करण्याचा कार्यक्रम आज संपन्न झाला. त्यानुसार नाशिक जिल्हा […]
इगतपुरीनामा न्यूज – रेझिंग डे अर्थात पोलीस स्थापना दिवसानिमित्त इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपले रक्तदान केले. पोलीस स्थापना दिवस आणि या दिवशी पोलिसांना ध्वज प्रदान करण्यात आल्याच्या निमित्ताने दरवर्षी जानेवारीचा पहिला आठवडा रेझिंग डे सप्ताह म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त वाडीवऱ्हे […]
इगतपुरीनामा न्यूज – जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेतून इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो सेवा केंद्र येथील कै. दत्तात्रय सहदेव ठमके वय ८४ यांचे त्यांच्या इच्छेनुसार मरणोत्तर देहदान करण्यात आले. नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या पुढाकारातून झालेले हे ७५ वे मरणोत्तर देहदान आहे.धामणगाव येथील एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयाला कुटुंबियांनी कै. दत्तात्रय सहदेव ठमके यांचा देह सुपूर्द केला. […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यात आपल्या आदर्श आणि सेवाभावी कार्याने सुपरिचित असणारे कुमारशेठ चोरडिया यांची इगतपुरी तालुका केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी सार्थ निवड करण्यात आली आहे. मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी ही निवडीची घोषणा करून नियुक्तीपत्र दिले. यावेळी नाशिक जिल्हा मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश आहेर, उपाध्यक्ष गणेश निकम, अतुल आहेर, गोरख चौधरी, सुरेश […]