१० वी नंतर Engineering मध्ये Diploma करायचा आहे ?
इयत्ता दहावी नंतर विद्यार्थ्याने लहानसा Diploma करुन स्वतःच्या पायावर उभे राहून जॉब करावा असे अनेक पालकांना वाटत असते. Engineering मध्ये वेगवेगळ्या Diploma Courses मधून आवडीचा एखादा कोर्स करून विद्यार्थी आपले करिअर पुढे चांगल्या प्रकारे घडवू शकतो हे सांगणारा लेख देत आहोत. लेखमालेतील यापूर्वीचे लेख वाचण्यासाठी ह्या लेखाच्या शेवटी लिंक दिली आहे. जिज्ञासूंनी याचा लाभ घ्यावा.
- श्री. भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा
मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरी
उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय
संपर्क : 9822478463
10 वी नंतर Engineering मध्ये Diploma करण्याची संधी
इयत्ता दहावी नंतरची संधी
इयत्ता दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक पालक आपल्या पाल्यांसाठी Engineering मध्ये Diploma अथवा तंत्रशिक्षणासाठी ( Polytechnic ) आग्रह धरताना दिसतात. विद्यार्थ्याने स्वत: च्या पायावर लवकर उभे राहावे, इयत्ता बारावी सायन्स नंतर Engineering च्या प्रवेशाच्या CET मधून मुक्तता मिळावी. आपल्या पाल्यावर अभ्यासाचा फार ताण येऊ नये या उद्देशाने दहावीनंतर Engineering Diploma हा एक विद्यार्थ्यांसाठी चांगला पर्याय आहे.
दहावी नंतरचे Diploma Courses
इयत्ता दहावी नंतर अनेक Diploma Courses उपलब्ध असून त्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये विशेष आवडीचे Courses म्हणजे :
1. Diploma in Automobile Engineering.
2. Diploma in Computer Science and Engineering.
3. Diploma in Electronic and Communication Engineering.( DETCE )
4. Diploma in Mechanical Engineering ( DME )
5. Diploma in Aeronautical Engineering.
6. Diploma in Information Science and Engineering.
7. Diploma in Civil Engineering ( DCE ).
8. Diploma in Electrical Engineering.
9. Diploma in Metallurgical Engineering.
10. Diploma In Electronic Instrumentation and Control Engineering.
त्याचप्रमाणे Chemical, Printing, Textile
इत्यादी अनेक Diploma Courses करता येतात. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्या https://msbte.org.in या संकेतस्थळावर त्याची सविस्तर माहिती व Diploma नंतरचे Jobs यासंदर्भातील माहिती दिलेली आहे.
महाराष्ट्रातील कॉलेजेस
महाराष्ट्रामध्ये Engineering मध्ये Diploma Courses असणारे दोन हजार पेक्षा जास्त कॉलेजेस आहेत. Diploma Courses चा कालावधी तीन वर्षांचा असून खाजगी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना सहज प्रवेश उपलब्ध असतो. प्रवेशासाठी दहावी मध्ये 35 टक्के मार्कांची आवश्यकता असते. सरकारी महाविद्यालयांमध्ये दहावी मार्कांच्या गुणवत्तेवर प्रवेश मिळतो. Diploma Courses केल्यानंतर Engineering च्या पदवीच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेशासाठी विद्यार्थी पात्र असतो. इयत्ता 12 वी सायन्स नंतर महाराष्ट्र शासनाच्या CET Cell च्या वतीने घेतली जाणारी CET परीक्षा देण्याची गरज राहत नाही.
Engineering मधील पदवी
इयत्ता बारावी सायन्स झाल्यानंतर, CET परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्याचा गुणवत्तेनुसार पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश निश्चित होतो. पदवीचा अभ्यासक्रम चार वर्षांचा असतो. Diploma केल्यामुळे प्रथम वर्ष करण्याची गरज नसून Engineering च्या पदवीच्या द्वितीय वर्षाला डायरेक्ट प्रवेश मिळतो. हा एक महत्त्वाचा फायदा Diploma चा असून सर्वात महत्त्वाचे म्हणजे Diploma झालेल्या विद्यार्थ्याला Job उपलब्ध आहेत.
नोकरीसाठी Placement Cell
आज Engineering च्या प्रत्येक महाविद्यालयात Placement Cell असून या Cell च्या माध्यमातून सतत Camps Interview चे आयोजन केले जात असते. Engineering मध्ये Diploma झालेल्या विद्यार्थ्यांनी याचा फायदा घेऊन नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. खाजगी Placement सेवा देखील उपलब्ध असून या सेवेमार्फत देखील विद्यार्थ्यांना Job मिळू शकतो. कंपनीतील जॉबमध्ये प्रामाणिक काम, कामातील कौशल्य, नव्या अद्ययावत ज्ञानाचा मागोवा घेऊन ते आत्मसात केल्यास जॉबमध्ये Diploma केलेल्या विद्यार्थ्याला निश्चितच चांगले भवितव्य असते. राज्य सरकारच्या, केंद्र सरकारच्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयांमध्ये, स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षांच्या माध्यमातून, रेल्वेच्या परीक्षांमधून Engineering च्या Diploma झालेल्या उमेदवाराला नोकरीच्या भरपूर संधी आहेत हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे.
हा लेख लिहित असताना महावीर एज्युकेशन सोसायटी संचलित महावीर पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे ग्रंथपाल आणि जनसंपर्क अधिकारी श्री. राजेंद्र आढाव यांच्याशी केलेल्या चर्चेचा उपयोग झाला आहे.
( लेखक इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयाचे उपप्राचार्य असून स्पर्धा परीक्षांचे महाराष्ट्रातील नामवंत लोकप्रिय मार्गदर्शक आहेत. विविध विषयांवर त्यांची विविध मार्गदर्शक पुस्तके प्रसिद्ध आहेत. )
◆ लेखमालेतील १ ते १९ ह्या लेखांसाठी खालील लेखांक २० च्या शेवटी सर्व लिंक दिल्या आहेत. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.
https://igatpurinama.in/archives/2428
◆ लेखांक २१ साठी क्लिक करा