
इगतपुरीनामा न्यूज – सामाजिक कार्यकर्ते प्रवीण ( पप्पू ) कडू यांची कन्या कार्तिकी प्रवीण कडू हिचा दुसरा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. यानिमित्त वाकी ( डहाळेवाडी ) जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रमही राबवण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांना गळ्यातील दर्जेदार टाय आणि पाणी पिण्याच्या उत्तम बॉटल आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका थेटे मॅडम यांनी प्रवीण कडू यांच्या शालेय जीवनातील कठीण प्रसंग आणि जुन्या गोष्टींना उजाळा दिला. प्रवीण कडू यांचे वडील बाळू गंगाराम कडू यांच्या निधनानंतर सर्व जबाबदारी त्यांच्या आई उज्वलाताई कडू यांच्यावर पडली. त्यांनी मिळेल ते काम आणि मजुरी करून सर्व मुलांना शिक्षण दिले. त्यांच्या पुढच्या पिढीसाठी हे आदर्श काम असून वाढदिवसाच्या निमित्ताने समाजासाठी उपक्रम उपयुक्त असल्याचे सौ. थेटे म्हणाल्या. कार्यक्रमावेळी उज्वलाताई कडू, ॲड. हनुमान मराडे यांनी कार्तिकी हिला शुभेच्छा दिल्या. वसंत मराडे, माजी सरपंच किसन कुंदे, ग्रामपंचायत सदस्य अनिल डहाळे, नंदू डाके, मयूर घुटे, केशव जोशी, ग्रामस्थ आणि सर्व शिक्षक उपस्थित होते.
