दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईत आरोपीच्या पोलीस हवालदार सागर सौदागर यांनी आवळल्या मुसक्या

इगतपुरीनामा न्यूज – सतत दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देऊन न्यायालयातील सुनावण्यांना हजर न राहणाऱ्या फरार संशयित आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. घोटी पोलीस ठाण्यामधील दबंग म्हणून ओळखणारे पोलीस हवालदार सागर सौदागर यांनी त्याला कल्याणमधून मोठ्या शिताफीने अटक केले आहे. हरेश्वर हरी उर्फ आकाश सदाशिव मोगरे वय वर्ष ३० रा. टिटवाळा पूर्व असे संशयित सराईत आरोपीचे […]

सरकारी कामात अडथळा – पिंपळगाव मोरचे माजी चेअरमन पंढरीनाथ काळे न्यायालयाकडून निर्दोष

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरीच्या सहाय्यक निबंधक कार्यालयात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पिंपळगाव मोर सोसायटीचे माजी चेअरमन पंढरीनाथ काळे यांची निर्दोष ठरवण्यात आले आहे. डिसेंबर २०२० मध्ये इगतपुरी पोलीस ठाण्यात तत्कालीन सहकार अधिकारी अनिल रामसिंग पाटील यांनी पंढरीनाथ काळे यांच्याविरोधात भारतीय दंडविधान संहितेचे कलम ३५३, ५०४ व ५०६ अन्वये फिर्याद दाखल केली होती. सविस्तर असे की […]

ॲट्रॉसिटी गुन्हात २ आरोपी अटक ; गावठी कट्टा आणि २ काडतुसे हस्तगत : वाडीवऱ्हे पोलिसांच्या तपास पथकाकडून गुन्हा उघड

इगतपुरीनामा न्यूज – वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेसह भारतीय हत्यार कायदा कलमांप्रमाणे गुन्हा दाखल होता. पोलीस ठाण्याच्या हद्धीतील गौळाणे येथे दोन समाजामध्ये भांडण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. घटनास्थळी तात्काळ तपास पथक रवाना होऊन ह्या गुन्ह्यातील २ संशयित आरोपी अटक करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून १ गावठी कट्टा व २ जिवंत काडतुसे हस्तगत […]

टाकेद विद्यार्थिनी अत्याचार प्रकरण – इगतपुरीत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा विराट मुक मोर्चा : सहावीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापकासह शिक्षकाला फाशी देण्याची मागणी : लकीभाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली झाला मूक मोर्चा

इगतपुरीनामा न्यूज – टाकेद बुद्रुक येथील विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी. पीडित मुलीच्या शिक्षणाचा खर्च व मान्य केलेली १५ लाखांची रक्कम तात्काळ मुलीच्या खात्यावर जमा करावी. ज्या दिवशी ही काळीमा फासणारी घटना घडली त्या घटनेच्या दिवशी फरार झालेल्या ६ शिक्षकांचे निलंबन करावे, यापुढे महिला आणि मुलींच्या बाबत तक्रार आल्यास त्यावर सत्वर लक्ष घालावे. […]

विद्यार्थिनींवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी उपपाययोजना न केल्यास राज्यभर आंदोलन : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे लकीभाऊ जाधव यांचा इशारा : संस्थेकडून पीडितेला १५ लाख आणि उचलणार शिक्षणाचा खर्च

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील टाकेद बुद्रुक येथील सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर शाळेच्या मुख्याध्यापकाने शिक्षकाच्या मदतीने अत्याचार केल्याची घटना सर्वांना मान खाली घालायला लावणारी आहे. यामुळे पवित्र नाते अविश्वासात बदलले गेले असून यामध्ये सहभाग असणाऱ्यांवर कठोरात कठोर कठोर कारवाई केली पाहिजे. संपूर्ण तालुक्यातील जनतेला आणि शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलींना सुरक्षितता दाखवणे गरजेचे आहे. या प्रकरणी अत्याचारात […]

शिक्षक संघटना सरसावल्या ; टाकेद प्रकरणातील गुन्हेगारांना कठोर शिक्षेची निवेदनाद्वारे मागणी

इगतपुरीनामा न्यूज – टाकेद बुद्रुक ता. इगतपुरी येथे झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा इगतपुरी तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टावर चालवण्यात यावे. संबंधित नराधमांना अधिकाधिक कठोर शिक्षा करावी अशी सर्व शिक्षक संघटनांची मागणी आहे. त्याबाबतचे निवेदन सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने इगतपुरीचे तहसीलदार, गटविकास अधिकारी व […]

काय सांगता ? – टाकेदच्या पीडित विद्यार्थिनीचे “बदलापूर” प्रकरणाशी कनेक्शन ? : “बिचारी” विद्यार्थिनी फुफाट्यातून पडली अत्याचाराच्या आगीत : एल्गार कष्टकरी संघटनेच्या महिलांकडून पीडितेशी चर्चा

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील टाकेद बुद्रुक येथील सहावीच्या विद्यार्थिनीवर शाळेच्या नराधम मुख्याध्यापकाने शिक्षकाच्या मदतीने अत्याचार घडल्याने सर्वत्र संतापाचे वातावरण आहे. १३ वर्षीय पीडित विद्यार्थिनीचे ‘बदलापूर” येथे घडलेल्या घृणास्पद घटनेशी कनेक्शन असल्याचे समजले आहे. पीडित विद्यार्थिनी बदलापूर येथील शाळा सोडून टाकेद बुद्रुक शाळेत जुनपासून शिकत आहे. पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबाशी एल्गार […]

टाकेद विद्यार्थिनी अत्याचार प्रकरण – टाकेदच्या थातूरमातुर कार्यक्रमांत येणाऱ्या इगतपुरीच्या अधिकाऱ्यांकडून अद्यापही शाळेसह पीडितेच्या कुटुंबाला भेट नाही : टाकेद परिसरातील पालकांची संतप्त भूमिका ; मुख्याध्यापक, शिक्षकाला मिळाली कोठडी

शहाबाज शेख : इगतपुरीनामा न्यूज – संपूर्ण इगतपुरी तालुक्याला हादरवून सोडणाऱ्या टाकेद येथील सहावीच्या विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणातील आरोपी मुख्याध्यापक तुकाराम साबळे, शिक्षक गोरक्षनाथ जोशी या दोघांना पोलिसांनी रविवारी इगतपुरी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांनाही १३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यापुर्वीही या परिसरात अनेकवेळा अशा प्रकारच्या घटना काही विद्यार्थीनीबरोबर घडल्या आहेत. परंतु दबाव आणून त्या […]

टाकेदचे अत्याचार प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधम मुख्याध्यापक आणि शिक्षकाला फाशी द्या – शेतकरी नेते नारायण राजे भोसले यांची आक्रमक मागणी

इगतपुरीनामा न्यूज – टाकेद बुद्रुक येथील माध्यमिक शाळेचा नराधम मुख्याध्यापक व शिक्षकाने सहावीतल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या घटनेने पूर्ण तालुका आणि जनमाणसे हादरून गेले आहेत. ह्या घृणास्पद घटनेने शिक्षण क्षेत्र आणि माणुसकीला मान खाली घालायला लागली आहे. अशा क्लेशदायक घटना पुन्हा पुन्हा घडू नये म्हणून हे जलदगती न्यायालयात चालवावे. कसून तपास करून दोन्हीही नराधम आरोपींना […]

टाकेद अनामिका लैंगिक अत्याचार – इगतपुरी शिक्षण विभागाचे चाललेय तरी काय ? : मद्यधुंद अधिकारी आणि शिक्षकांचे खाली डोके वरती पाय…!

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – आजचा दिवस तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत काळाकुट्ट म्हणावा असा उगवला आहे. ज्यांना गुरू म्हटले जाते त्या शिक्षकानेच शाळेतील एक अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना आज सकाळीच उघडकीस आली आहे. या एका घटनेने तालुक्याच्या शिक्षण विभागाच्या कारभाराचा पंचनामा चव्हाट्यावर मांडला आहे. आधीच आदिवासी समाज शिक्षणापासून वंचित राहिला आहे, ज्या थोड्याफार […]

error: Content is protected !!