दहावी बारावी नंतर पुढे काय ? लेखांक १४

१२ वी नंतर Company Secretary व्हायचंय ?
इयत्ता बारावीनंतर कोणत्याही शाखेच्या विद्यार्थ्याला Company Secretary होता येते. C. S. चे चार टप्पे, स्वरूप, अभ्यासक्रम, योग्य ते नियोजन करावे. यासाठी जिद्दीने अभ्यासात कष्ट घेतले तर विद्यार्थी अतिशय चांगले करिअर करुन अल्पावधीत स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभा राहू शकतो हे सांगणारा आजचा लेख आहे. लेखमालेतील आधीचे लेख वाचण्यासाठी शेवटी लिंक दिल्या आहेत.
- श्री. भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा
प्रा. देविदास गिरी, उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय

मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरी
उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय
संपर्क : 9822478463

12 वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी संधी
इयत्ता बारावी आर्टस, कॉमर्स आणि सायन्स उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना Company Secretary ( C. S. ) होता येते. इयत्ता बारावी नंतर ही सुध्दा एक चांगली संधी आहे. विविध कंपन्यांमध्ये Company Secretary  हे एक महत्त्वाचे पद होय. या क्षेत्रात खूप कमी विद्यार्थी जाताना दिसतात. परंतु चांगल्या प्रकारे या अभ्यासक्रमाचे टप्पे, स्वरूप, परीक्षा पॅटर्न, अभ्यासक्रम समजावून घेतल्यास सामान्यातील सामान्य विद्यार्थी या क्षेत्रात चांगले करिअर करु शकतो हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे.

Company  Secretary
C. S. होण्यासाठी किमान कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. ही परीक्षा The Institute of Company Secretaries of India ह्या संसदेच्या कायद्यान्वये अस्तित्वात आलेल्या संस्थेच्या वतीने घेतली जाते. या संस्थेची वेबसाइट www.icsi.edu ही आहे.

CSEET
म्हणजेच Company Secretary Executive Entrance Exam होय. यामध्ये चार विषय असतात.
Paper 1. Business Communication
Paper 2. Legal Aptitude and Logical Reasoning
Paper 3. Economic and Business Environment
Paper  4. Current Affairs, Presentation and Communication Skills
( Viva Voice )
वरील चारही पेपर प्रत्येकी 100 मार्कांचे असून यामध्ये प्रत्येक पेपरला 40 मार्क मिळणे आवश्यक असते. मार्कांची बेरीज मात्र 50 टक्के होणे आवश्यक आहे. अशा विद्यार्थ्याला खालील चार टप्प्यातील पहिला टप्पा म्हणजे Foundation Program करण्याची गरज नसून त्याला सरळ Executive Program साठी प्रवेश मिळतो. विद्यार्थी यात वरीलप्रमाणे मार्क मिळवून पात्र झाला नाही तर त्याला खालील चार टप्प्यातून जावे लागेल हे विद्यार्थ्यानी लक्षात घ्यावे.

C. S. अभ्यासक्रमाचे चार टप्पे
हे चार टप्पे खालील प्रमाणे होय 
1. Foundation Program
2. Executive Program
3. Professional Program
4. Management  raining

पदवीधर विद्यार्थ्याला सूट
जर विद्यार्थी पदवीधर झालेला असेल व त्याला C. S. साठी प्रवेश घ्यावयाचा असेल तर त्याला Foundation Program करण्याची आवश्यकता नसते. त्याला Executive Program  पासून सुरुवात करावी लागेल. C. S. होण्यासाठी वरील चार टप्पे पूर्ण करून Certificate मिळविणे आवश्यक असते.

C. S. नंतर संधी
ही C. S. ची पदवी संपादन केल्यानंतर सदरहू उमेदवाराला  खालील संधी उपलब्ध असून तो त्यामध्ये उत्तम प्रकारचे करिअर करू शकतो.
1. Company Secretary
2. Legal Adviser
3. Corporate Policymaker
4. Corporate Planner
5. Chief Administrative Officer
                      

( लेखक इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयाचे उपप्राचार्य असून स्पर्धा परीक्षांचे महाराष्ट्रातील नामवंत लोकप्रिय मार्गदर्शक आहेत. विविध विषयांवर त्यांची विविध मार्गदर्शक पुस्तके प्रसिद्ध आहेत. )

लेखांक १ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/1815

लेखांक २ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/1838

लेखांक ३ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/1887

लेखांक ४ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/1921

लेखांक ५ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/1965

लेखांक ६ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2018

लेखांक ७ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2030

लेखांक ८ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2067

लेखांक ९ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2090

लेखांक १० साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2132

लेखांक ११ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2157

लेखांक १२ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2204

लेखांक १३ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2238

Similar Posts

Comments

  1. avatar
    प्रा. रोमा विष्णुसिंग परदेशी says:

    अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!