मार्गदर्शक - प्रा. देविदास गिरी
उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय
संपर्क : 9822478463
■ अकरावी – बारावी सायन्स
इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी इयत्ता अकरावी सायन्सला प्रवेश घेऊन फार्मसी शाखेत करिअर करण्याचे स्वप्न आज काल बरेच विद्यार्थी पहात असतात. हे विद्यार्थी इयत्ता बारावी सायन्स झाल्यानंतर फार्मसीच्या अभ्यासक्रमाला असणाऱ्या CET ची तयारी मोठया प्रमाणात करतात. हे क्षेत्र देखील करिअर करण्याच्या दृष्टीने विद्यार्थी महत्त्वाचे मानतात. त्यादृष्टीने सायन्स शाखेच्या विद्यार्थ्यांना खूप संधी आहेत. त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडविण्यासाठी करुन घेणे गरजेचे आहे.
■ महाराष्ट्र CET Cell
राज्य पातळीवरील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रात CET Cell ची स्थापना केली असून या सेल मार्फत राज्यस्तरांवरील अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते. यामध्ये
1. अभियांत्रिकी Engineering
2. औषधनिर्माणशास्त्र Pharmacy
3. कृषी Agriculture
4. वास्तुविशारद Architecture
5. हॉटेल मॅनेजमेंट Hotel Management
6. विधी, कायदा Law
7. शिक्षणशास्त्र B. Ed.
8. पदव्युत्तर शिक्षणशास्त्र M. Ed.
9. एम. बी. ए. M. B. A.
10. एम. सी. ए. M. C. A.
11. फाईन आर्ट Fine Art
12. बी. पी. एड. B. P. Ed. या व्यावसायिक अभ्यासक्रमांचा समावेश होय.
■ फार्मसी अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा
फार्मसी अभ्यासक्रमाला ( D. Pharmacy, B. Pharmacy) प्रवेश घ्यायचा असेल तर इयत्ता बारावी सायन्सनंतर महाराष्ट्र CET Cell मार्फत घेतल्या जाणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेच्या ( Common Entrance Test ) माध्यमातून प्रवेश मिळतो. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. या लेखात फक्त आपण फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेविषयी माहिती पाहणार आहोत.
■ फार्मसी CET साठी पात्रता
या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा असेल तर इयत्ता बारावी सायन्स झालेला विद्यार्थी व PCMB ग्रुपचे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र असून बारावी बोर्डामधून या ग्रुपमध्ये विद्यार्थ्याला पन्नास टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.
■ परीक्षेचे स्वरूप
1. PCB Group असलेल्या विद्यार्थ्यांसाठी Biology ( Botany and Zoology ) या विषयाचे शंभर प्रश्न असून प्रत्येक प्रश्नाला एक गुण याप्रमाणे शंभर गुण. यासाठी 90 मिनिटांचा वेळ दिला जातो.
2. याच प्रश्नपत्रिकेत Physics या विषयाचे पन्नास प्रश्न असून प्रत्येक प्रश्नाला एक गुण याप्रमाणे पन्नास गुण.
3. याच प्रश्नपत्रिकेत Chemistry या विषयाचे पन्नास प्रश्न असून प्रत्येक प्रश्नाला एक गुण याप्रमाणे पन्नास गुण असतात. Physics व Chemistry विषयांचे प्रश्न सोडविण्यासाठी 90 मिनिटे वेळ असतो. ही परीक्षा ऑनलाइन घेतली जाते. एकूण दोनशे गुणांचा व तीन तास वेळ असतो.
4. PCM Group असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अ. Mathematics या विषयाचे एकूण पन्नास प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असून एकूण याविषयासाठी शंभर गुण असतात. ब. Physics या विषयाचे एकूण पन्नास प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला एक गुण याप्रमाणे पन्नास गुण असतात. क. Chemistry या विषयाचे एकूण पन्नास प्रश्न असून प्रत्येक प्रश्न एक गुणाला याप्रमाणे पन्नास गुण असतात. एकूण दोनशे गुणांचा हा पेपर असतो. वेळ 180 मिनिटे म्हणजेच तीन तास असतो. या पेपरला Negative Marking नसते. ही CET फक्त महाराष्ट्र राज्यातील फार्मसी महाविद्यालयांसाठीच असते. या परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळालेल्या Percentile Cut off वरुन विद्यार्थ्याचा नंबर लागतो.
■ अभ्यासक्रम
फार्मसी अभ्यासक्रमाच्या CET परीक्षेसाठी महाराष्ट्राच्या एच. एस. सी. परीक्षेसाठी PCMB चा जो अभ्यासक्रम आहे त्यावर 80 टक्के, तर अकरावीच्या PCMB चा 20 टक्के अभ्यासक्रम असतो.
लेखक इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयाचे उपप्राचार्य असून स्पर्धा परीक्षांचे महाराष्ट्रातील लोकप्रिय नामवंत मार्गदर्शक आहेत. विविध विषयांवर त्यांची विविध मार्गदर्शक पुस्तके प्रसिद्ध आहेत.
◆ लेखांक १ साठी क्लिक करा
https://igatpurinama.in/archives/1815
◆ लेखांक २ साठी क्लिक करा
https://igatpurinama.in/archives/1838
◆ लेखांक ३ साठी क्लिक करा
https://igatpurinama.in/archives/1887
◆ लेखांक ४ साठी क्लिक करा
https://igatpurinama.in/archives/1921
◆ लेखांक ५ साठी क्लिक करा
https://igatpurinama.in/archives/1965
◆ लेखांक ६ साठी क्लिक करा
https://igatpurinama.in/archives/2018
◆ लेखांक ७ साठी क्लिक करा
https://igatpurinama.in/archives/2030
6 Comments