इगतपुरीजवळ अपघातात ३ युवक जागीच ठार ; १ जखमी : भरधाव आयशरने धडक दिल्याने झाला अपघात

इगतपुरीनामा न्यूज, दि. १० – मुंबई आग्रा महामार्गावर इगतपुरी येथील पंढरपूरवाडी भागात भरधाव आयशरने बैलगाडी आणि मोटारसायकला धडक दिल्याने अपघात झाला  आहे. आज रात्री नऊ वाजेच्या दरम्यान झालेल्या ह्या अपघातात ३ जण जागीच ठार झाल्याचे वृत्त आहे. १ जण गंभीर जखमी झाला आहे. इगतपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. जखमी व्यक्ती इगतपुरीच्या ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आली आहे. भरधाव आयशरचा चालक पसार झाल्याचे समजते. ह्या अपघातामुळे नागरिकांमध्ये संताप पसरला आहे. प्रभाकर सुधाकर आडॊळे वय २५, कुशल सुधाकर आडॊळे वय २२, रोहित भगीरथ आडोळे वय १९ सर्व रा. बोरटेंभे, ता. इगतपुरी अशी मयत युवकांची नावे आहेत.

Similar Posts

error: Content is protected !!