दहावी बारावी नंतर पुढे काय ? लेखांक ५

मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरी
उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय
संपर्क : 9822478463

11 वी व 12 वी सायन्स
इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेले साधारणत:  20 ते 25 टक्के विद्यार्थी अकरावी विज्ञान ( Science ) शाखेला प्रवेश घेतात. विज्ञान शाखा अवघड आहे, या शाखेला प्रॅक्टीकल असते, मार्क खूप कमी मिळतात, इंग्रजी माध्यमामुळे भिती वाटते, सतत अभ्यास करावा लागतो, प्रॅक्टीकल अनिवार्य असते इत्यादी कारणांमुळे या शाखेकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कला ( Arts ) व वाणिज्य ( Commerce ) शाखेपेक्षा कमी असते. काही विद्यार्थी बारावी सायन्स झाल्यानंतर आपल्याला पुढील शिक्षण झेपणार नाही. त्यामुळे पुन्हा कला शाखेकडे F. Y. B. A. साठी प्रवेश घेताना दिसतात. परंतु अभ्यासात सातत्य, योग्य वेळी केलेला अभ्यास, लेक्चर न बुडविणे तसेच अवघड भागाची चांगली तयारी केल्यास विज्ञान शाखा अवघड नाही हे लक्षात घ्या.

इयत्ता 11 वी 12 वी चे विषय

इयत्ता अकरावी विज्ञान शाखेला प्रवेश घेतल्यानंतर
1. मराठी, हिन्दी, संस्कृत, फ्रेंच इत्यादी भाषांपैकी एक भाषा किंवा काही महाविद्यालयांमध्ये भाषेऐवजी IT हा विषय घेता येतो.
2. English ( Compulsory )
3. Physics ( Compulsory )
4. Chemistry ( Compulsory )
5. Biology, Mathematics, Geography  यापैकी कोणतेही दोन विषय घेणे.
6. Environment Education ( Compulsory )
7. Physical Education ( Compulsory ) हे विषय असतात.

प्रॅक्टीकल
विद्यार्थ्यांनी अकरावीला दहावीपेक्षा विषय वेगळे आहेत असे समजता कामा नये. म्हणून या विषयांची तयारी करणे फारसे अवघड नाही. या विषयांची प्राथमिक ओळख माध्यमिक स्तरावर झालेली असते. हे देखील विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे. भाषा विषय सोडून बाकी सर्व विषयांना प्रॅक्टीकल असते हे महत्त्वाचे होय.

PCMB, PCB, PCM
विद्यार्थ्यांना मेडिकल, इंजिनिअरिंग व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घ्यावयाचा असल्यास PCMB, PCB  किंवा PCM यापैकी एक ग्रुप असणे आवश्यक होय. PCMB  किंवा PCB यापैकी एक ग्रुप असलेले विद्यार्थी मेडिकलच्या NEET परीक्षेसाठी बसू शकतात. PCM किंवा PCMB यापैकी कोणताही एक ग्रुप असलेले विद्यार्थी इंजिनिअरिंगच्या शिक्षणक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी ( JEE व MHT – CET ) पात्र असतात. फार्मसी व कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी PCMB, PCB व PCM यापैकी कोणताही एक ग्रुप असलेले विद्यार्थी पात्र असतात.

12 वी विज्ञान नंतरच्या संधी
विज्ञान शाखेतील विद्यार्थी बारावी नंतर खालील प्रवेश परीक्षांसाठी पात्र असतात.
1. NEET
2. JEE
3. MHT – CET ( Pharmacy, Engineering,  Agriculture )
4. NATA ( Architecture )
5. NCHMCT – JEE ( Hotel Management )
6. NIFT ( Fashion Designing )
7. NDA ( Entrance Exam )

विज्ञान शाखेतील पदवी
इयत्ता बारावी विज्ञान शाखेचे विद्यार्थी विज्ञान शाखेच्या पदवीला देखील मोठ्या प्रमाणात प्रवेश घेतात. हा अभ्यासक्रम तीन वर्षांचा असतो. याला F. Y. B. Sc, S.Y. B. Sc., T. Y. B. Sc.या नावाने संबोधले जाते. यामध्ये विद्यार्थी Chemistry, Botany, Micro Biology, Physics, Environment Science, Geography, Mathematics, Biotechnology, Zoology, Nanotechnology, Computer science आदी विषयांमध्ये स्पेशलायझेशन करु शकतो.

( लेखक इगतपुरी येथील केपीजी महाविद्यालयाचे उपप्राचार्य असून स्पर्धा परीक्षांचे लोकप्रिय मार्गदर्शक आहेत. )

लेखांक १ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/1815

लेखांक २ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/1838

लेखांक ३ साठी क्लिक करा
https://igatpurinama.in/archives/1887

लेखांक ४ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/1921

Similar Posts

3 Comments

  1. avatar
    प्रा. रोमा विष्णुसिंग परदेशी says:

    10 वी 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण लेख आहे.

  2. avatar
    विलास जोपळे says:

    आजच्या काळात प्रत्येक विद्यार्थी हा मोबाईल सोबत जोडला आहे.त्यांनी इंटरनेट वर माहिती घेऊन उपरोक्त विषय अभ्यासक्रम आदीबद्दल सखोल माहिती घ्यावी. व पुढील नियोजन करण्यात लक्ष केंद्रित करावे.

Leave a Reply

error: Content is protected !!