दहावी बारावी नंतर पुढे काय ? लेखांक १०

आजच्या लेखाबद्धल थोडेसे...!
महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना सहज सुलभ भाषेत दहावी बारावी नंतर पुढे काय ? ह्या विषयावर प्रा. देविदास गिरी हे अनुभसिद्ध मार्गदर्शन करत आहेत. आज दिलेल्या लेखांक १० मध्ये Staff Selection Commission च्या माध्यमातून नोकरी आणि करिअर करण्याची सुवर्णसंधी ह्या विषयावर परिणामकारक मार्गदर्शन केलेले आहे. लेखामध्ये केलेले परिपूर्ण मार्गदर्शन प्रत्यक्षात आणल्यास यशाचा राजमार्ग दूर नाही. लेखमालेतील संबंधित सर्व लेखांची लिंक शेवटी दिली आहे. जिज्ञासूंनी ह्याचा अवश्य लाभ घ्यावा.
- भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा
प्रा. देविदास गिरी, उपप्राचार्य इगतपुरी महाविद्यालय

मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरी
उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय
संपर्क : 9822478463

केंद्र सरकारच्या कार्यालयात भरती
केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये विविध पदांसाठी दरवर्षी सतत जाहिराती प्रसिध्द होत असतात. यामध्ये बारावी उत्तीर्ण कला, वाणिज्य, विज्ञान या शाखेतील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात संधी आहेत. कर्मचारी चयन आयोगाच्या परीक्षेद्वारे ( Staff Selection Commission Exam. ) भारत सरकारच्या मंत्रालयात आणि विभागात, कार्यालयात भरती होता येते. याचे मुख्य कार्यालय Staff Selection  Commission ( Government of India ) Block No – 12, CGO Complex, Lodhi Road, New Delhi – 110003 येथे आहे. प्रयाग, मुंबई, कोलकाता, गुवाहाटी, चेन्नई, बंगलोर आदी ठिकाणी विभागीय कार्यालये आहेत.

परीक्षा तयारी, संकेतस्थळ
SSC चे संकेतस्थळ https://ssc.nic.in  हे असून या संकेतस्थळावर वर्षभर होणाऱ्या परीक्षांचे कॅलेंडर ( वेळापत्रक ) जाहीर केलेले असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावी इयत्तेपासून या परीक्षांची तयारी करणे सोपे जाते. आजही या परीक्षांच्या बाबतीत महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी पात्र असूनही मार्गदर्शन व योग्य माहिती नसल्यामुळे  मागे राहतात. परंतु या परीक्षांची माहिती करून घेतल्यास केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये विविध पदांसाठी भरती होता येते. ही भरती पूर्णपणे परीक्षेत मिळविलेल्या गुणांवर, मुलाखतीतील प्राविण्यावर, योग्य पात्रतेवर आणि पदासाठीच्या कौशल्यावर अवलंबून असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कमी वयात, कमी शिक्षणात या जागा, नोकऱ्या मिळवायला हरकत नाही.

यातील काही पदे
केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये विविध प्रकारची पदे असतात त्यामध्ये
1. Combined Higher Second ary Level Examination
2. Stenographers
3. Constable
4. Multi Tasking  ( Non – Technical Staff )
5. Translator  ( Hindi, English ) तसेच इतर भारतीय भाषा
6. Girl Cadet Instructor
7. Junior and Senior Clerk
8. Data Entry Operator
अशा अनेक पदांसाठी ही परीक्षा होते. भरपूर पदे आहेत. येथे काही पदाचांच उल्लेख केला आहे. या व इतर पदांसाठी सतत भरती प्रक्रिया राबवली जात असते.

जाहिरात माहीत होण्याची माध्यमे
केंद्र सरकारच्या वतीने हिन्दी मध्ये प्रकाशित होणाऱ्या ‘रोजगार समाचार’ किंवा इंग्रजीमध्ये प्रकाशित होणाऱ्या  ‘Employment News’ ह्या साप्ताहिकात यांच्या जाहिराती प्रकाशित होतात. तसेच संपूर्ण पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, इतर कौशल्ये, भाषेचे ज्ञान, वयोमर्यादा, आरक्षण आदी सर्वांचा तपशिल लेखात दिलेल्या आयोगाच्या संकेतस्थळावर दिलेला असतो. विद्यार्थ्यांनी नियमितपणे या संकेतस्थळाला भेट देऊन माहिती करून घेणे आवश्यक होय.

निवड प्रक्रिया
साधारणपणे ही निवड प्रक्रिया पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविले जाते. ही परीक्षा भारतातील व तसेच महाराष्ट्रातील निवडक परीक्षा केंद्रांवर किंवा बऱ्याच परीक्षा ह्या Computer Based Exam. ( Online ) होतात. निवड प्रक्रियेत लेखी निवड परीक्षा, डाटा एन्ट्री कौशल्य परीक्षा, टंकलेखन, Computer Knowledge Test  ( पदाप्रमाणे परीक्षेच्या स्वरूपात थोडाफार बदल होतो हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे. ) निवड प्रक्रियेत निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येते.

नेमणूक प्रक्रिया
निवड झालेल्या उमेदवारांना केंद्र सरकारच्या विविध आस्थापना आणि कार्यालयांमध्ये पदांप्रमाणे निर्धारित वेतनश्रेणीत, इतर भत्ते व फायद्यांसह  नेमण्यात येते. विद्यार्थ्यांनी Objective स्वरूपाच्या प्रश्नांची तयारी करणे आवश्यक असते. साधारणतः सामान्य ज्ञान, सामान्य बुद्धिमत्ता, तर्कशक्ती, इंग्रजी भाषा, भाषा आकलन, माहिती आणि तंत्रज्ञान, सामान्य गणित इत्यादी अभ्यास घटकांवर ( पदाप्रमाणे ) प्रश्न विचारले जातात हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे.

बारावी नंतरच्या नोकरीच्या संधी
इयत्ता बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत . विशेष म्हणजे नोकरीत लागल्यानंतर बढतीच्या अनेक संधी यात आहेत. त्याचप्रमाणे पुढील शिक्षण देखील घेता येते. केंद्र सरकारच्या नोकरीत बढतीच्या परीक्षा देता येतात. त्यामुळे बारावी नंतर विद्यार्थ्यांनी या परीक्षांच्या माध्यमातून आपले उज्ज्वल करिअर घडवावे.

( लेखक इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयाचे उपप्राचार्य असून स्पर्धा परीक्षांचे महाराष्ट्रातील लोकप्रिय मार्गदर्शक आहेत. विविध विषयांवर त्यांची विविध मार्गदर्शक पुस्तके प्रसिद्ध आहेत.)

लेखांक १ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/1815

लेखांक २ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/1838

लेखांक ३ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/1887

लेखांक ४ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/1921

लेखांक ५ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/1965

लेखांक ६ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2018

लेखांक ७ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2030

लेखांक ८ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2067

लेखांक ९ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2090

Similar Posts

3 Comments

  1. avatar
    विलास जोपळे says:

    SSC स्टाफ सिलेक्शन आयोग म्हणजे UPSC परीक्षे प्रमाणे काम करते. भारत सरकारच्या महत्वाच्या कार्यालयात काम करण्याची संधी या आयोगामार्फत उपलब्ध होते. दहावी,बारावी व पदवी इ पात्रता मिळवलेले उमेदवार या परीक्षेसाठी पात्र असतात. योग्य माहिती आणि मार्गदर्शन घेऊन तयारी केल्यास यश हमखास आहे. लेखातील लिंक उघडून माहिती मिळवून घ्यावी. धन्यवाद.

  2. avatar
    प्रा. रोमा विष्णुसिंग परदेशी says:

    अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे

Leave a Reply

error: Content is protected !!