दहावी बारावी नंतर पुढे काय ? लेखांक २३

दहावी बारावी नंतर Drawing क्षेत्रात करिअरच्या संधी
इयत्ता दहावी, बारावी नंतर Drawing क्षेत्रात CTC, ATD, G. D. Art, B. F. A., M. F. A., Archaeology, Museology, NET, JRF, Ph. D. असे सर्वोच्च शिक्षण घेऊन राज्यातच नव्हे तर देशात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करता येते. हे सांगणारा लेख देत आहोत. लेखमालेतील यापूर्वीचे लेख वाचण्यासाठी या लेखाखाली लिंक दिलेल्या आहेत. जिज्ञासूंनी त्याचा लाभ घ्यावा.
- श्री. भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा
प्रा. देविदास गिरी, उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय

मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरी
उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय
संपर्क : 9822478463

10 वी 12 वी नंतर Drawing मध्ये करिअर करण्याची संधी

Drawing मधील संधी
इयत्ता बारावी कला, वाणिज्य, विज्ञान, एमसीव्हीसी, होम सायन्स यांमधील कोणत्याही शाखेतील उत्तीर्ण विद्यार्थ्याला Drawing मध्ये चांगल्या प्रकारचे करिअर करता येते. लहानपणापासून पालक आपल्या पाल्याला चित्र काढावयास शिकवत असतात. परंतु सर्वच मुलांना चांगल्या प्रकारचे चित्र काढणे जमत नाही. खूप कमी मुलांची चित्रकला चांगली असते. ह्या विद्यार्थ्यांना पुढे चांगले मार्गदर्शन मिळाले, चांगले वातावरण लाभले तर हेच विद्यार्थी राज्यातच नव्हे तर देशामध्ये चांगले चित्रकार म्हणून नाव मिळवू शकतात. चित्रकला या क्षेत्रातील कोर्स, अभ्यासक्रम व त्यातील सर्वोच्च संधी यांविषयी माहिती पाहूया.

ATD
Art Teacher Diploma हा इयत्ता बारावी उत्तीर्ण कोणत्याही शाखेच्या विद्यार्थ्याला करता येतो. दोन वर्ष  कालावधीचा हा कोर्स आहे. महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाच्या वतीने घेतली जाणारी चित्रकलेची  Intermediate ही परीक्षा दिलेली असावी किंवा ATD ला प्रवेश घेतल्यानंतर दिली पाहिजे.

CTC
Craft Teacher Certificate हा प्रमाणपत्र कोर्स इयत्ता बारावी नंतर असून या प्रमाणपत्र कोर्सचा कालावधी एक वर्षाचा आहे.

G. D Art
Government Diploma in Art हा कोर्स पाच वर्षांचा असून याला इयत्ता दहावी नंतर प्रवेश मिळतो. हा पाच वर्ष कालावधीचा असून महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाच्या वतीने घेतला जातो. याला प्रवेश घेतल्यानंतर एक वर्षाचा फाऊंडेशन कोर्स केल्यानंतर पुढील चार वर्षांमध्ये पेंटिंग, शिल्पकला किंवा उपयोजित कला यापैकी एकामध्ये विशेष प्राविण्य संपादन करता येते.

B. F. A.
Bachelor of Fine Arts हा पदवीचा अभ्यासक्रम चार वर्षांचा असून इयत्ता बारावी नंतर या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळतो. या अभ्यासक्रमासाठी CET परीक्षा द्यावी लागते हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे.

M. F. A.
Master of Fine Arts हा चित्रकलेतला पदव्युत्तर अभ्यासक्रम दोन वर्षांचा असून B. F. A. पदवी नंतर या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो.

Archaeology
हा पौराणिक वस्तु संशोधनविषयक अभ्यासक्रम बारावी नंतर करता येतो. चित्रकलेची अथवा फाईन आर्ट मधील विद्यार्थी हा अभ्यासक्रम पुढील करिअरच्या दृष्टीने करतात. B F A अथवा MFA अभ्यासक्रम चालू असताना देखील करता येतो.

Museology
हा वस्तुसंग्रहालय, नाणीसंग्रहालय या संदर्भातील एक वर्षाचा अभ्यासक्रम असून इयत्ता बारावी नंतर या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळतो. हा अभ्यासक्रम देखील B F A किंवा M F A झालेली विद्यार्थी पुढील करिअरच्या दृष्टीने करतात.

पीएचडी
M. F. A. झाल्यानंतर पीएचडी ची PET परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर या सर्वोच्च अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. पीएचडी पदवी संपादन केलेले विद्यार्थी या क्षेत्रात खूप कमी आहेत.

NET, JRF परीक्षा
M. F. A. झाल्यानंतर National Eligibility Test अथवा Junior Research Fellowship ही परीक्षा देता येते.

या क्षेत्रातील संधी
या क्षेत्रात भरपूर संधी आहेत. त्यातील काही संधी पुढीलप्रमाणे 
1. G. D. Art, B. F. A., ATD यापैकी एक प्रमाणपत्र मिळवल्यानंतर माध्यमिक शाळेत Drawing Teacher म्हणून नोकरी करता येते.
2. स्वतःचा पेंटिंगचा व्यवसाय करता येतो.
3. कमर्शिअल आर्टिस्ट म्हणून  व्यवसाय.
4. केंद्रीय विद्यालयांमध्ये TGT Drawing Teacher म्हणून नोकरी मिळते.
5. केंद्र सरकारच्या नवोदय विद्यालयात Drawing  Teacher म्हणून नोकरी करता येते.
6. प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून व्यवसाय.
7. नोट प्रेस, करन्सी प्रेस मध्ये प्रिंटिंग टेक्नॉलॉजी म्हणून नोकरी.
8. National Institute of Diseaning संस्थेत नोकरी.
9. टेक्स्टाईल डिझायनर, ज्वेलरी डिझायनर म्हणून नोकरीच्या संधी.
10. डिजिटल आर्ट मध्ये नोकरीच्या संधी.
11. फिल्म सिटीमध्ये स्टेज डेकोरेटर, डिझायनर इत्यादीच्या संधी.
12. अॅनिमेशन, ग्राफिक्स, फोटोशॉप सेवेत संधी.
13.  स्वतःच्या चित्रांचे, पेंटिंगचे, कलाकृतींचे प्रदर्शन वेगवेगळ्या शहरात आयोजित करून स्वतःचे या क्षेत्रातले वेगळे स्थान निर्माण करता येते.
                 

( लेखक इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयाचे उपप्राचार्य असून स्पर्धा परीक्षांचे महाराष्ट्रातील नामवंत लोकप्रिय मार्गदर्शक आहेत. विविध विषयांवर त्यांची विविध मार्गदर्शक पुस्तके प्रसिद्ध आहेत. )

◆ लेखमालेतील १ ते १९ ह्या लेखांसाठी खालील लेखांक २० च्या शेवटी सर्व लिंक दिल्या आहेत. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.

https://igatpurinama.in/archives/2428

लेखांक २१ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2460

लेखांक २२ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2484

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!