दहावी बारावी नंतर पुढे काय ? लेखांक १६

12 वी नंतर पोलीस दलात करिअर करायचेय ? 
विद्यार्थी मित्रहो, इयत्ता बारावी नंतर आणि वयाची १८ वर्ष असेल तर पोलीस दलात केवळ लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी परीक्षा यातील गुणवत्तेवर स्वतःच्या पायावर उभे राहू शकतो. देशसेवेची ही एक उत्तम संधी आहे हे लक्षात ठेऊन युवकांनी अल्पावधितील उत्तम करिअरचा एक पर्याय म्हणून पहावे. अनेक विद्यार्थी लहाणपणापासून पोलीस होण्याचे स्वप्न पहात असतात त्यांच्यासाठी तर हे क्षेत्र महत्त्वाचेच होय. याबाबत विशेष मार्गदर्शन आपल्याला करिअर करायला उपयुक्त ठरेल.
- श्री. भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा
प्रा. देविदास गिरी, उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय

मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरी
उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय
संपर्क : 9822478463

पोलीस दलात करिअर करण्याची संधी

बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी
इयत्ता बारावी कला, वाणिज्य, विज्ञान व एमसीव्हीसीच्या सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांना बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पोलीस शिपाई भरतीसाठी प्रयत्न करता येतात. हे क्षेत्र देखील स्वतःच्या पायावर आर्थिक दृष्टया उभे रहाण्यासाठी योग्य होय. ज्या विद्यार्थ्यांना बारावी नंतर लवकरात लवकर नोकरी हवी असेल तर शारीरिक पात्रता आणि लेखी परीक्षा यांची चांगली तयारी केल्यास विद्यार्थी या क्षेत्रात करिअर करू शकतो.

पोलीस दल
पोलीस दलातील मुख्य कामे म्हणजे गुन्हयांचा शोध घेणे, कायदा व सुव्यवस्था राखणे आणि गुन्हे टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, वाहतूक व्यवस्था चांगल्या रितीने चालू ठेवणे, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे, गुन्हेगारांवर खटले दाखल करणे, गुन्हे कमी करण्यासाठी प्रयत्न करणे, सरकारी मालमत्तेचे तसेच खाजगी मालमत्तेचे संरक्षण करणे, स्फोटक पदार्थाची तपासणी करणे यांसारखी कामेदेखील पोलीस करीत असतात. त्याचबरोबर सामाजिक शांतता व सलोखा राखण्याचे काम पोलीसांचे असते.

महाराष्ट्राचे अव्वल स्थान
महाराष्ट्र राज्य हे भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे आणि सर्वाधिक पोलीस बळ असलेले राज्य होय. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कार्यरत असलेल्या यंत्रणेत महाराष्ट्र पोलीस दल अव्वल स्थानावर आहे. ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे महाराष्ट्र पोलीसांचे ब्रीदवाक्य आहे.

करिअरच्या अनेक संधी
महाराष्ट्र पोलीस  दलात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून नागरी सेवा परीक्षेच्या माध्यमातून भारतीय पोलीस सेवेत ( आयपीएस ) तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून  राज्यसेवा परीक्षेच्या माध्यमातून पोलीस उप अधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस उपनिरीक्षक ( PSI ) म्हणून करिअर करता येते.

पोलीस शिपाई भरती
या परीक्षेसाठी संबंधित जिल्हा पोलीस मुख्यालये आणि आयुक्तालयांच्या द्वारे परीक्षेचे नियोजन केले जाते. यासाठी शैक्षणिक पात्रता उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा किमान 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 29 वर्षे असते. मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत शासनाने वेळोवेळी ठरविलेल्या धोरणानुसार उच्चतम वयोमर्यादेत सवलत दिली जाते. शारीरिक पात्रता पुरुषांसाठी उंची 165 सेंमी, छाती 79 सेंमी ( न फुगवता ), 5 सेंमी फुगवता आली पाहिजे. महिलांसाठी उंची 157 सेंमी पेक्षा कमी नसावी.

लेखी व शारीरिक चाचणी
पोलीस शिपाई भरतीसाठी दोन टप्पे अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये लेखी परीक्षा ही शंभर गुणांची असते तर शारीरिक क्षमता चाचणी ही शंभर गुणांची असते. लेखी परीक्षा ही Objective बहुपर्यायी स्वरूपाची असून यात मराठी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता चाचणी, सामान्यज्ञान या अभ्यास घटकांवर प्रश्न विचारले जातात. शारीरिक चाचणीत 1600 मीटर धावणे, 100 मीटर धावणे, गोळाफेक ( 7 किलो, 200 ग्रॅम वजन असलेला ), दहा पुल् – अप्स, लांब उडी इत्यादींचा समावेश असतो. या दोन परीक्षांची चांगली तयारी केल्यास दोन्ही परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारावर निवड केली जाते.

थोडक्यात महत्वाचे
इयत्ता बारावी नंतर १८ वयाच्या नंतर विद्यार्थी लगेचच स्वतःच्या पायावर  उभा राहू शकतो. मात्र दोन टप्यांमधील परीक्षेला यात खूप महत्त्व आहे हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे. म्हणूनच चांगल्या प्रकारची तयारी, मैदानावरील कौशल्य आत्मसात केल्यास काहीच अवघड नाही हे लक्षात ठेवा.

( लेखक इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयाचे उपप्राचार्य असून स्पर्धा परीक्षांचे महाराष्ट्रातील नामवंत लोकप्रिय मार्गदर्शक आहेत. विविध विषयांवर त्यांची विविध मार्गदर्शक पुस्तके प्रसिद्ध आहेत. )

लेखांक १ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/1815

लेखांक २ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/1838

लेखांक ३ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/1887

लेखांक ४ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/1921

लेखांक ५ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/1965

लेखांक ६ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2018

लेखांक ७ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2030

लेखांक ८ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2067

लेखांक ९ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2090

लेखांक १० साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2132

लेखांक ११ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2157

लेखांक १२ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2204

लेखांक १३ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2238

लेखांक १४ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2244

लेखांक १५ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2292

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!