दहावी बारावी नंतर पुढे काय ? लेखांक ४

मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरी
उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय
संपर्क : 9822478463

अकरावी कॉमर्स
इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेले साधारणतः 25 ते 30 टक्के विद्यार्थी इयत्ता अकरावी वाणिज्य ( Commerce ) वर्गाला प्रवेश घेतात. दहावीपेक्षा साधारणतः दोन विषय या वर्गाला वेगळे असतात. त्यामुळे ही शाखा इतर शाखेपेक्षा अवघड आहे हा गैरसमज विद्यार्थ्यांनी काढून टाकावा.

11 वी व 12 वी कॉमर्स
या वर्गांचे विषय बघितल्यानंतर तुमच्या लक्षात वरील गोष्ट लक्षात येईल.
विषय 1. चिटणीसाचा व्यवसाय व कार्यपद्धती
2. व्यापार संघटन आणि व्यवस्थापन
3. अर्थशास्त्र
4. बुक किपिंग अँड अकौंन्टसी
5. मराठी किंवा हिन्दी यापैकी एक
6. इंग्रजी कंम्पलसरी
7. शारीरिक शिक्षण
8. पर्यावरण

कॉमर्स शाखेची पदवी
इयत्ता अकरावी व इयत्ता बारावी कॉमर्स शाखेचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले व उत्तीर्ण झालेले 75 टक्के विद्यार्थी हे कॉमर्सच्या पदवी शाखेला  प्रवेश घेतात. ह्या पदवीचे एकूण तीन वर्ष असतात. त्याला F. Y. B. Com, S. Y. B. Com, T. Y. B. Com या नावाने संबोधले जाते. हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्याला कॉमर्स शाखेची पदवी विद्यापीठाकडून प्राप्त होते. त्याला कॉमर्स शाखेचा पदवीधर म्हणून संबोधले जाते.

F. Y. B. Com चे विषय
पदवीच्या या पहिल्या वर्षासाठी
1. Compulsory English
2. Financial Accounting
3. Business Economics
4. Business Mathematics and Statistics OR Computer Concepts and Applications
5. Optional Group A व B मधून एका एका विषयाची निवड करावयाची असते.
6. Any one of the following language यामध्ये असलेल्या भाषांपैकी एका भाषेची निवड करावयाची असते.

S. Y., T. Y. B. Com
एस. वाय. बी. कॉम. या द्वितीय वर्षाला एकूण सहा विषय व पर्यावरण हा विषय सक्तीचा असून या विषयाला ग्रेड दिली जाते. टी. वाय. बी. कॉम. या तृतीय वर्षाला सहा विषय असतात. एस. वाय. च्या वर्गाला कॉमर्स शाखेतील स्पेशल विषय निवडता येतो. यामध्ये काही विषयांना प्रॅक्टीकल पूर्ण करावयाचे असते.

करिअरची तयारी
पदवीनंतरच्या विद्यार्थ्याच्या जीवनाला, करिअरला कोणते अभ्यासक्रम केले पाहिजे याची माहिती या काळात करणे आवश्यक आहे. कॉमर्स हा विषय, शाखा ही आंतरराष्ट्रीय शाखा होय हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. कॉमर्स शाखेच्या पदवीधराला पुढे असंख्य संधी आहेत याची जाणीव ठेवावी. संरक्षण क्षेत्रात अथवा पोलीस खात्यात जायचे असेल तर महाविद्यालयातील एन. सी. सी. ( National Cadet Corps ) च्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणे केव्हाही फायद्याचे असते.

इतर महत्त्वाच्या गोष्टी
कॉमर्स शाखेची पदवी मिळविताना विद्यार्थ्यांनी पुढे करिअर करण्यासाठी साधारणत: 60 टक्के व त्यापेक्षा जास्त मार्क मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवावे. या तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करत असताना इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत. त्याचप्रमाणे महाविद्यालयात चालणारे इतर जे प्रमाणपत्र कोर्सेस आहेत त्याला देखील प्रवेश घ्यावा. टॅली सारखा कोर्स, संगणकाचे वाणिज्य विषयाला उपयुक्त असणारे लहान लहान कोर्सेस पूर्ण करावेत. याप्रमाणे तयारी केल्यास पदवी प्राप्त केल्यानंतर असंख्य संधी आहेत हे लक्षात ठेवा.

( लेखक इगतपुरी येथील केपीजी महाविद्यालयाचे उपप्राचार्य असून स्पर्धा परीक्षांचे लोकप्रिय मार्गदर्शक आहेत. )

◆ लेखांक १ साठी क्लिक करा
https://igatpurinama.in/archives/1815
◆ लेखांक २ साठी क्लिक करा
https://igatpurinama.in/archives/1838
◆ लेखांक ३ साठी क्लिक करा
https://igatpurinama.in/archives/1887

Similar Posts

Comments

  1. avatar
    प्रा. संग्राम सीताराम गोसावी says:

    👌👌👍👍👍

Leave a Reply

error: Content is protected !!