दहावी बारावी नंतर पुढे काय ? लेखांक २६

12 वी नंतर Fire Officer Course ची संधी
इयत्ता बारावी सायन्स उत्तीर्ण झालेला विद्यार्थी सहा महिन्यांचा  Sub Fire Officer Course करून अतिशय चांगली नोकरी करू शकतो. कमी कालावधी, अत्यंत माफक फी असलेला हा कोर्स आर्थिक दृष्टया कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना खरोखर उपयुक्त, रोजगाराभिमुख असा अभ्यासक्रम होय. या अभ्यासक्रमाचा परिचय करून देणारा लेख आज देत आहोत. लेखमालेतील यापूर्वीचे लेख वाचण्यासाठी ह्या लेखाच्या शेवटी लिंक दिल्या आहेत. जिज्ञासूंनी याचा लाभ घ्यावा.
- भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा
प्रा. देविदास गिरी, उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय

मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरी
उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय
संपर्क : 9822478463

12 वी नंतर Fire Officer Course ची संधी

सरकारमान्य संस्था
केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था, समाजसेवी संस्था, शैक्षणिक संस्था, खाजगी व सरकारी कंपन्या, उद्योगधंदे यांच्या गरजा लक्षात घेऊन समाजसेवी, समाजोपयोगी अभ्यासक्रम तयार करणारी तसेच समाजाला उपयुक्त, प्रशिक्षित मनुष्यबळ देणारी, युवक आणि युवतींना स्वतःच्या पायावर उभी करणारी संस्था म्हणून All India Institute OF Local Self – Government ह्या संस्थेकडे बघितले जाते. अनेक चांगल्या संस्थांशी सहकार्य करून या संस्थेने आपले काही महत्त्वाचे अभ्यासक्रम तयार केलेले आहेत.

ज्ञानकेंद्र ही ओळख
AIILSG Knowledge Hub म्हणून ओळखली जाते. कौशल्य विकास, स्मार्ट शहर मिशन, स्वच्छ भारत मिशन, सर्वेक्षण कार्य, जल विभाग, नियोजन आदी माध्यमातून या संस्थेचे कार्य आता समाजमान्य झालेले आहे. भारतातील स्थानिक स्वराज्य संस्था,  राज्य व केंद्र सरकार, शैक्षणिक संस्था, मान्यवर विद्यापीठे यांच्या सहकार्याने युवक युवतींसाठी चांगले अभ्यासक्रम तयार करून प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना स्वावलंबी बनविण्याचे कार्य करणारी संस्था होय.

Sub Fire Officer Course
इयत्ता बारावी सायन्स शाखेचे विद्यार्थी, पदवीधर विद्यार्थी  यांच्यासाठी Sub Fire Officer Course तयार केलेला आहे. हा कोर्स कमी कालावधीचा असून प्रशिक्षणाच्या या सहा महिने कालावधीमध्ये अग्निशमन अधिकारी तयार करणारा अभ्यासक्रम युवकांमध्ये महत्त्वाचा ठरला आहे.

अभ्यासक्रमातील विषय
आगरोधक बचावात्मक उपाययोजना, आपत्तीच्या दरम्यान निर्माण होणारे अडथळे व त्यावरील उपाययोजना, आपत्ती मधील परिस्थितीत बचावात्मक कार्य आणि उपाययोजना, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी अभ्यास घटकांच्या माध्यमातून युवक युवतींना सक्षम बनविणे, आपत्तीमध्ये येणाऱ्या अडचणींना सक्षमपणे तोंड देण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची निर्मिती हा या अभ्यासक्रमाचा उद्देश होय. या कोर्सचे माध्यम हिन्दी आणि इंग्रजी हे होय. अत्यंत कमी कालावधीचा पण रोजगार देणारा अभ्यासक्रम म्हणून याकडे पाहिले जाते.

National Fire Academy
ही राष्ट्रीय स्तरावरील संस्था वडोदरा येथे आहे. याठिकाणी प्रशिक्षणाची उत्तम सोय असून प्रशिक्षित अध्यापकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष प्रॅक्टीकलवर भर देणारा हा अभ्यासक्रम आहे. आर्थिक दृष्टया कमकुवत असणाऱ्या विद्यार्थ्यासाठी स्वतःच्या पायावर उभे करणारा, रोजगाराभिमुख कोर्स आहे.

कोर्सनंतर नोकरीच्या संधी
हा कोर्स केल्यानंतर विविध क्षेत्रात नोकरीच्या संधी आहेत त्या खालील प्रमाणे होय
1. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जसे नगरपालिका, जिल्हा परिषद, महानगरपालिका यामध्ये नोकरीच्या संधी
2. मोठ्या स्वरूपाचे उद्योगधंदे, कंपन्या, मॉल यामध्ये जॉब उपलब्ध
3. रेल्वे, विमानतळ, एसटी महामंडळ, मोठी हॉस्पिटल्स येथेही नोकरीच्या संधी
4. एमआयडीसी, खाजगी व सरकारी कारखाने, विद्यापीठे, देवस्थाने, अम्युझमेंट पार्क आदींमध्ये जॉबच्या संधी आहेत.

( लेखक इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयाचे उपप्राचार्य असून स्पर्धा परीक्षांचे महाराष्ट्रातील नामवंत लोकप्रिय मार्गदर्शक आहेत. विविध विषयांवर त्यांची विविध मार्गदर्शक पुस्तके प्रसिद्ध आहेत. )

◆ लेखमालेतील १ ते १९ ह्या लेखांसाठी खालील लेखांक २० च्या शेवटी सर्व लिंक दिल्या आहेत. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.

https://igatpurinama.in/archives/2428

लेखांक २१ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2460

लेखांक २२ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2484

लेखांक २३ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2500

लेखांक २४ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2534

लेखांक २५ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2550

Similar Posts

error: Content is protected !!