12 वी नंतर Music क्षेत्रात करिअर करायचंय ?
आपल्या बालपणाच्या आवडीतून पुढे त्याच क्षेत्रात उज्ज्वल यश संपादन केल्याची अनेक उदाहरणे आहेत. Music या विषयात किंवा क्षेत्रात लहानपणीच्या आवडीमुळे किंवा यातील आकर्षणामुळे अनेक जण पुढे चांगले, उत्तम प्रकारचे करिअर करतात. त्यांनी उज्ज्वल प्रकारचे यश, किर्ती संपादन केल्याची असंख्य उदाहरणे आहेत. Music क्षेत्रातील पदवी, पदव्युत्तर पदवीविषयी आजच्या लेखात माहिती दिली आहे. लेखमालेतील यापूर्वीचे लेख वाचण्यासाठी ह्या लेखाच्या शेवटी लिंक दिलेल्या आहेत. जिज्ञासूंनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा.
- श्री. भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा
मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरी
उपप्राचार्य, केपीजी महाविद्यालय, इगतपुरी
संपर्क : 9822478463
बारावी नंतर Music क्षेत्रात उज्वल करिअर करण्याची सुवर्णसंधी
हटके करिअर
प्रत्येक शाळेत, महाविद्यालयात चांगला खेळाडू, चांगला चित्रकार, चांगला वादक, चांगला गायक, चांगला नेतृत्व गुण असलेला विद्यार्थी तसेच अभ्यासात काही विद्यार्थी पुढे असतात. या सर्वांमध्ये काही विद्यार्थ्यांनी लहानपणीच आपले क्षेत्र निश्चित केलेले असते. त्यासाठी त्यांचे पालक देखील त्या विद्यार्थ्यांना लहानपणापासून मार्गदर्शन करतात आणि त्या प्रकारच्या वातावरणामध्ये आपल्या पाल्याला मार्गदर्शकाकडून मार्गदर्शन मिळविण्याचा प्रयत्न करीत असतात. आज आपण Music क्षेत्रातील करिअर विषयी माहिती पाहणार आहोत.
Music क्षेत्रातील पदवी
हा विषय अत्यंत दुर्मिळ होय. खूप कमी कनिष्ठ महाविद्यालयात Music हा विषय इयत्ता अकरावी व बारावी या वर्गांना शिकवला जातो. पदवी स्तरावर जिल्ह्यामध्ये तर चार ते पाच ठिकाणीच या विषयाच्या अध्ययनाची सोय आहे. हे चित्र महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सारखे आहे.
Music मधील अभ्यास
इयत्ता बारावी नंतर बी. ए. Music आणि त्यानंतर एम. ए. Music करता येते. महाराष्ट्रातील मुंबई विद्यापीठ, एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, तसेच इतर विद्यापीठांमध्ये देखील या विषयात पदवी, पदव्युत्तर तसेच संशोधनात म्हणजेच पीएचडी च्या अभ्यासक्रमाची सोय आहे. बारावी नंतर Music या विषयात पदवीसाठी तीन वर्ष असतात. तर पदव्युत्तर पदवीसाठी दोन वर्ष असतात. म्हणजे पदवी आणि पदव्युत्तर पदवीसाठी 3 + 2 = 5 वर्ष लागतात.
अभ्यासक्रमातील विषय
Music या विषयाअंतर्गत हिंदुस्थानी शास्त्रीय घराण्यांचा इतिहास यामध्ये जयपूर घराणे, आग्रा घराणे, ग्वाल्हेर घराणे, किराणा घराणे इत्यादींचा इतिहास व अभ्यास त्याचप्रमाणे शास्त्रीय संगीतातील पंडितांचे चरित्र उदा. पं. विष्णू नारायण भातखंडे, पं. विष्णू दिगंबर पलूस्कर, पं. भास्करबुवा बखले इत्यादींच्या जीवन कार्याचा परिचय, इतिहास, योगदान यांचा अभ्यास, राग तालांची माहिती व अभ्यास, राग गायन, अभिजात संगीताची माहिती आणि अभ्यास इत्यादींचा अभ्यासक्रमात समावेश असतो.
गांधर्व महाविद्यालय
मिरज येथील गांधर्व महाविद्यालयाच्या वतीने महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये, गावांमध्ये लहान मुलांना संगीत परीक्षांच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते. त्यामध्ये संगीत विशारद, संगीत अलंकार, संगीत पंडित या सर्वोच्च पातळीवरील परीक्षा घेतल्या जातात. संगीत क्षेत्रात या महाविद्यालयाचे योगदान महत्त्वाचे होय.
Music मध्ये पीएचडी
या क्षेत्रात एम. ए. Music झाल्यानंतर अनेक विद्यापीठांमध्ये पीएचडी च्या अभ्यासक्रमाची सोय आहे. आज अनेक विद्यार्थी या पदवीच्या प्रवेशासाठी प्रयत्न करतात हे उल्लेखनीय होय.
या क्षेत्रातील संधी
Music विषयामध्ये पदवी, पदव्युत्तर पदवी संपादन केल्यानंतर या क्षेत्रात अनेक संधी आहेत.
1. विविध शाळांमध्ये Music Teacher म्हणून सेवा कार्य.
2. वरिष्ठ महाविद्यालयात Music विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून अध्यापनाचे कार्य.
3. गायक म्हणून करिअर करता येते
4. गायनांच्या कार्यक्रमात मुख्य गायक, सहाय्यक गायक म्हणून कार्य
5. वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून पुढे जाण्याची व चांगले करिअर करण्याची संधी
6. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वत: चे खाजगी शिक्षण देणारे मार्गदर्शन वर्ग ( Music Academy ) सुरु करुन मार्गदर्शन करणे. आज भारतातील अनेक जण परदेशातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कार्य करणारी अनेक उदाहरणे आहेत.
थोडक्यात महत्त्वाचे
लहानपणापासूनच्या आवडीच्या क्षेत्रात सर्वोच्च पदवी प्राप्त करून विद्यार्थी आपले चांगले करिअर घडवू शकतो. मात्र कष्ट घेण्याची तयारी, त्यातील साधना, रियाज या क्षेत्रातील नव्या नव्या संधींचा शोध घेणे हे देखील महत्त्वाचे होय हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.
( लेखक इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयाचे उपप्राचार्य असून स्पर्धा परीक्षांचे महाराष्ट्रातील नामवंत लोकप्रिय मार्गदर्शक आहेत. विविध विषयांवर त्यांची विविध मार्गदर्शक पुस्तके प्रसिद्ध आहेत. )
◆ लेखांक १ साठी क्लिक करा
https://igatpurinama.in/archives/1815
◆ लेखांक २ साठी क्लिक करा
https://igatpurinama.in/archives/1838
◆ लेखांक ३ साठी क्लिक करा
https://igatpurinama.in/archives/1887
◆ लेखांक ४ साठी क्लिक करा
https://igatpurinama.in/archives/1921
◆ लेखांक ५ साठी क्लिक करा
https://igatpurinama.in/archives/1965
◆ लेखांक ६ साठी क्लिक करा
https://igatpurinama.in/archives/2018
◆ लेखांक ७ साठी क्लिक करा
https://igatpurinama.in/archives/2030
◆ लेखांक ८ साठी क्लिक करा
https://igatpurinama.in/archives/2067
◆ लेखांक ९ साठी क्लिक करा
https://igatpurinama.in/archives/2090
◆ लेखांक १० साठी क्लिक करा
https://igatpurinama.in/archives/2132
◆ लेखांक ११ साठी क्लिक करा
https://igatpurinama.in/archives/2157
◆ लेखांक १२ साठी क्लिक करा
https://igatpurinama.in/archives/2204
◆ लेखांक १३ साठी क्लिक करा
https://igatpurinama.in/archives/2238
◆ लेखांक १४ साठी क्लिक करा
https://igatpurinama.in/archives/2244
◆ लेखांक १५ साठी क्लिक करा
https://igatpurinama.in/archives/2292
◆ लेखांक १६ साठी क्लिक करा
https://igatpurinama.in/archives/2317
◆ लेखांक १७ साठी क्लिक करा