समृद्धी महामार्गावर पिंपळगाव मोर येथे भीषण अपघातात १ ठार, ३ गंभीर जखमी

इगतपुरीनामा न्यूज – नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर येथील दारणा नदीच्या पुलावर भीषण अपघात झाला आहे. MH 05 BS 5164 ह्या वरणा कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी बाजूच्या भिंतीला जाऊन धडकली. या अपघातात वाहनचालकाचा मृत्यू झाला असून २ महिला आणि १ पुरुष असे ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती समजताच महामार्ग […]

दुसरा अपघात – गोंदेजवळ झालेल्या अपघातात देवळे येथील ३ जण गंभीर जखमी : नरेंद्राचार्य रुग्णवाहिकेच्या तत्परतेमुळे जखमी व्यक्तींचे वाचले प्राण

इगतपुरीनामा न्यूज – मुंबई आग्रा महामार्गावर आज सकाळी एका युवकाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. त्यातच आज सकाळी साडेआठच्या दरम्यान दुसरा अपघात घडला आहे. गोंदे फाट्याजवळ महिंद्रा कंपनी परिसरात मोटारसायकलीला एका बसने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. ह्या घटनेत देवळे, ता. इगतपुरी येथील कैलास एकनाथ दालभगत वय २५, कोमल कैलास दालभगत वय २५, साहिल […]

अज्ञात वाहनाच्या धडकेत नांदूरवैद्य येथील २८ वर्षीय युवक ठार

इगतपुरीनामा न्यूज – आज सकाळी सात वाजेच्या सुमारास नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मोटारसायकलीला अज्ञात भरधाव वाहनाने धडक दिल्याने अपघात झाला. ही घटना रायगड नगर जवळ वालदेवी पुलाजवळ घडली. ह्या अपघातात देविदास रावसाहेब मुसळे वय २८, रा. नांदूरवैद्य, ता. इगतपुरी हा युवक ठार झाला. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी […]

एसएमबीटीजवळ भीषण अपघातात बालिकेसह ३ जण ठार, २ जण गंभीर जखमी

इगतपुरीनामा न्यूज – घोटी सिन्नर महामार्गावरील एसएमबीटी हॉस्पिटलजवळ ओव्हरटेक करणाऱ्या MH05 FW 0030 ह्या क्रमांकाच्या रिक्षाला समोरून येणारा NL01 AF 0458 हा कंटेनर न दिसल्याने रिक्षाने कंटेनरला धडक दिली. यामुळे रिक्षा आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात झाला. ह्या अपघातात एका बालिकेसह ३ जण ठार झाले आहेत. रिक्षाचालक अमोल विनायक घुगे वय २५ रा. नांदवली, कल्याण हा […]

वाहतुकीचा खेळखंडोबा – पिंपळगाव टोल प्रशासन, महामार्ग विभागाचे अधिकारी, वाहतूक पोलीस यंत्रणा आणि ठेकेदाराच्या ४२ पिढ्यांचा होतोय उद्धार : जबाबदार अधिकाऱ्यांच्या तोंडाला उद्या शिवसैनिक काळे फासणार – शिवसेना तालुकाप्रमुख राजाभाऊ नाठे यांचा इशारा

इगतपुरीनामा न्यूज – मुंबई आग्रा महामार्गावर नाशिकपासून वाडीवऱ्हे गोंदे पर्यंत वाहतुक व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. १५ मिनिटांच्या प्रवासासाठी दोन ते चार तास लागत आहेत. लहान मोठी वाहने, मोटारसायकली चांगलीच अडकून बसत असल्याने वाहतूकीची प्रचंड कोंडी होत आहे. महामार्गावर काम करणाऱ्या ठेकेदारांनी कोणत्याही प्रकारचे व्यवस्थापन केलेले नसल्याने हा प्रश्न गंभीर बनला आहे. याच कारणांनी अपघातही […]

वाडीवऱ्हे सांजेगाव रस्त्यावरील अपघातात १ ठार, २ जण जखमी : नरेंद्राचार्य रुग्णवाहिकेने केले मदतकार्य

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे सांजेगाव रस्त्यावर आज दुपारी अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने अपघात झाला. आज दुपारी १ वाजेच्या सुमाराला झालेल्या ह्या घटनेत १ जण ठार तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना नाशिकच्या शासकीय […]

नाशिक कसारा बसला अपघात ; ८ ते १० जखमी : जखमींमध्ये घोटीचे वैद्यकीय अधीक्षक ; नरेंद्राचार्य रुग्णवाहिकेने केले मदतकार्य

इगतपुरीनामा न्यूज – नाशिक मुंबई महामार्गावर व्हीटीसी फाट्यावर आज सकाळी एसटी बस आणि ट्रकचा अपघात झाला. ह्या अपघातात आठ ते दहा जण जखमी झाले आहेत. ही बस नाशिकहून कसारा येथे जात होती. बस व ट्रकची समोरासमोर धडक होऊन अपघात घडला. ह्या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी तर बसमधील चालक वाहकासह आठ ते दहा प्रवासी जखमी […]

नासिक मुंबई महामार्गावर खड्डेच खड्डे ; वाहतूक व्यवस्था कोलमडली : ९ ऑगस्टपर्यंत सुधारणा न केल्यास आक्रमक आंदोलन करण्याचा शिवसेना तालुकाप्रमुख राजाभाऊ नाठे यांचा इशारा

इगतपुरीनामा न्यूज – नासिक मुंबई महामार्ग ह्या प्रमुख रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. खड्डेच खड्डे पडले असल्याने ह्या रस्ता कसा म्हणावा असा प्रश्न पडतो आहे. कुठे खड्डे चुकविताना तर कुठे खड्यांमधून रस्ते शोधताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या खड्डेमय रस्त्यांवरून जीव धोक्यात घालून […]

भावलीजवळ नियंत्रण सुटल्याने २ वाहने छोट्या पुलाखाली कोसळली :  समोरच्या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात झाला अपघात

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या दोन वाहनांचा अपघात झाला आहे. समोरून येणाऱ्या वाहनाला वाचवायच्या प्रयत्नात भगतवाडी गावाजवळ हा अपघात झाला आहे. वाहनचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दोन्ही वाहने रस्त्यालगत असणाऱ्या छोट्या पुलावरून खाली कोसळले. ह्या वाहनांमधील ४ जण जखमी झाले असून त्यांची नावे अद्याप कळाली नाहीत. इगतपुरी पोलिसांना याबाबत माहिती […]

मुंढेगावच्या टांगा शर्यतीत टांगा अंगावर आल्याने १ जण ठार 

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील टांगा शर्यतीत बाजूला उभे राहून शर्यत पाहणाऱ्या शौकीन व्यक्तीचा टांगा अंगावर आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. पोपट कचरु मुंजे वय ५२ वर्षे रा. सारुळ, ता. जि. नाशिक असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सारूळ परिसरात सामाजिक कार्यात ते नेहमीच अग्रेसर होते. आज सायंकाळी ५ वाजता मुंढेगाव येथील प्रसिद्ध टांगा […]

error: Content is protected !!