दहावी बारावी नंतर पुढे काय ? लेखांक १३

१२ वी नंतर शिक्षणशास्त्रात करिअर करायचंय ?
इयत्ता बारावी नंतर शिक्षणशास्त्रात पदवी संपादन करून याच विषयात सर्वोच्च करिअर विद्यार्थ्याला करता येते. तसेच आवडीच्या इतर वेगळ्या क्षेत्रातही जाता येते. विद्यार्थ्यांनी शिक्षणातील सातत्य ठेऊन अभ्यास, नियोजन आणि मोठे स्वप्न डोळ्यांसमोर ठेवल्यास उत्तम, उज्ज्वल करिअर करता येते हे सांगणारा लेख देत आहोत. लेखमालेतील इतर लेखांची लिंक शेवटी दिली आहे.
- श्री. भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा

मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरी
उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय
संपर्क : 9822478463

१२ वीच्या सर्व शाखांसाठी संधी
इयत्ता बारावी आर्टस, कॉमर्स आणि सायन्स झालेला विद्यार्थी शिक्षणशास्त्रामध्ये अल्पावधीतच उच्च प्रकारचे करिअर करू शकतो. आज शिक्षणाची गंगा खेडयापाड्यांपर्यंत गेली आहे. त्यामुळे प्रशिक्षित मनुष्यबळाची फार मोठी आवश्यकता निर्माण झालेली आहे. विशेष म्हणजे शहराबरोबरच ग्रामीण भागात, आदिवासी भागात इंग्रजी माध्यमाच्या शाळा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत, सुरु होत आहे. येथे व पुढे अधिक शिक्षण घेतल्यास अनेक संधी उपलब्ध आहेत.

B. A. B. Ed. अथवा B. Sc. B. Ed
इयत्ता बारावी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तसेच इतरही काही विद्यापीठांच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकतो. कला व वाणिज्य शाखेचा बारावी उत्तीर्ण विद्यार्थी B.A.B.Ed व बारावी सायन्स शाखेचा विद्यार्थी B. Sc. B. Ed. चार वर्षांमध्ये पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभे राहू शकतो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेली ही शिक्षणशास्त्र महाविद्यालये नाशिकमध्ये अशोका कॉलेज ऑफ एज्युकेशन, वडाळा रोड, नाशिकसह पुणे आणि भोर येथे आहेत. विद्यार्थ्यांना बारावीनंतरची शिक्षणशास्त्रामध्ये चार वर्षात दोन पदव्या मिळविण्याची ही चांगली संधी होय.

कोणाला प्रवेश मिळतो ?
इयत्ता बारावी कला व वाणिज्य शाखेतला विद्यार्थी B. A. B. Ed. या चार वर्षांच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतो. तर बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थी B. Sc. B. Ed. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतो. इंग्रजी व मराठी माध्यमाचे विद्यार्थी यात प्रवेश घेऊ शकतात. पेपर लेखनाची भाषा मराठी किंवा इंग्रजी पैकी कोणतीही एक विद्यार्थी निवडू शकतो.

D. Ed. किंवा D. E. Ed.
हे शिक्षण झालेला विद्यार्थी या महाविद्यालयात द्वितीय वर्षाला प्रवेश घेऊ शकतो. D. Ed किंवा D. E. Ed. झालेल्या विद्यार्थ्यांना देखील तीन वर्षात पदवीधर होण्याची चांगली संधी आहे हे या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे.

CET परीक्षा आवश्यक
या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या CET cell मार्फत होणारी B. A. B. Ed./ B. Sc. B. Ed. साठीच्या प्रवेशाची CET ( Common Entrance Test ) सामाईक प्रवेश परीक्षा द्यावी लागते.

CET परीक्षेचे स्वरूप
या CET परीक्षेमध्ये :
1. General Knowledge 40 प्रश्न 40 मार्क
2. Mental Ability 30 प्रश्न 30 मार्क
3. Teaching Aptitude 30 प्रश्न 30 मार्क
अशा तीन अभ्यासघटकांवर 100 प्रश्नांचा व 100 मार्कांचा, प्रत्येक प्रश्नाला एक गुण असलेली प्रश्नपत्रिका असते. यातील सर्व प्रश्न Objective व चार विकल्प, पर्याय असलेले असतात. याला Negative Marking नसते. यासाठी 90 मिनिटे म्हणजेच दीड तासांचा वेळ असतो. प्रश्न इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषेत विचारलेले असतात. ही परीक्षा ऑनलाईन असते.

B. A. B. Ed, B. Sc. B. Ed. नंतरच्या संधी
या पध्दतीने बारावीनंतर ज्या विद्यार्थ्याने B. A. B..Ed. व B. Sc. B. Ed. पदवी संपादन केलेली असते त्यांना पुढे विविध क्षेत्रात मोठया प्रमाणात संधी आहेत. शिक्षक म्हणून नोकरीला लागल्यानंतर हे विद्यार्थी
1. M. A, M. Sc.
2. M. Ed.
3. M. A. Education या पदव्या संपादन करून SET, NET, JRF परीक्षा देऊ शकतात. तसेच MPSC, UPSC  च्या सर्व स्पर्धा परीक्षा त्याचप्रमाणे BANK, Railway, Indian Post Department, Staff Selection  Commission च्या परीक्षा विद्यार्थी देऊ शकतात. त्याचप्रमाणे पुढे तो M. B. A., C. A., M. S. W. हे अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो. तसेच माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय, बी. एड. कॉलेज,  एम. एड., डी. ई. एड. कॉलेजमध्ये प्राध्यापक, शिक्षक म्हणून नोकरी करू शकतो. तसेच उप शिक्षणाधिकारी पदाची परीक्षा देऊ शकतो. अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक मंडळ, NCERT, NCTE, जिल्हा शिक्षक प्रशिक्षण संस्था ( डायट ), NIEPA या राष्ट्रीय संस्थांमधील पदांसाठी तो पात्र होऊ शकतो. पुढे पीएचडी पदवी देखील संपादन करू शकतो. तसेच वेगळ्या क्षेत्रात जायचे असेल तर तो  B. Lib., M. Lib., B C J, MCJ अथवा कायद्याची म्हणजे L. L. B. करू शकतो. थोडक्यात भरपूर संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थी अभ्यास करून, कष्ट घेऊन या क्षेत्रातील सर्वोच्च असे करिअर तो घडवू शकतो.

( लेखक इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयाचे उपप्राचार्य असून स्पर्धा परीक्षांचे महाराष्ट्रातील नामवंत लोकप्रिय मार्गदर्शक आहेत. विविध विषयांवर त्यांची विविध मार्गदर्शक पुस्तके प्रसिद्ध आहेत. )

लेखांक १ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/1815

लेखांक २ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/1838

लेखांक ३ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/1887

लेखांक ४ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/1921

लेखांक ५ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/1965

लेखांक ६ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2018

लेखांक ७ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2030

लेखांक ८ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2067

लेखांक ९ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2090

लेखांक १० साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2132

लेखांक ११ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2157

लेखांक १२ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2204

Similar Posts

2 Comments

  1. avatar
    विलास जोपळे says:

    अध्ययन अध्यापन क्षेत्रात करिअर करण्यासाठी SSC-HSC नंतर उपलब्ध असलेल्या संधी या विषयावर सविस्तर अशी माहिती दिली आहे. तसेच कालच्या लेखातील CET सारखी परीक्षा यासाठी देखील खूप महत्वपूर्ण आहे हे पण सांगितलं आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!