मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरी
उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय
संपर्क : 9822478463
■ 11 वी 12 वी सायन्स
इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेले जे विद्यार्थी 11 वी व 12 वी सायन्स करतात त्यातील बऱ्याच विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. आजचे युग हे माहिती आणि तंत्रज्ञानाचे असल्यामुळे B. Sc. Computer Science मध्ये पदवी मिळवून पुढील शिक्षणाला प्रवेश घेऊन उज्ज्वल अशाप्रकारचे करिअर करावे. ( विद्यार्थ्यांनी हा लेख वाचत असताना माझा इगतपुरीनामा वेब पोर्टलवर प्रकाशित झालेला लेखांक क्र. ५ वाचावा. लिंक लेखाच्या शेवटी दिली आहे. )
■ F. Y. B. Sc. Computer Science
ज्या विद्यार्थ्यांना बारावी सायन्स नंतर B. Sc. ची पदवी Computer Science मध्ये मिळवायची आहे त्यांचा बारावी सायन्सला Mathematics हा विषय असणे महत्त्वाचे होय. शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून क्रेडिट सिस्टिम ( Credit Pattern ) व सेमिस्टर पध्दतीचा अभ्यासक्रम सुरू झाला आहे. तो आता F. Y. B. Sc. व S. Y. B. Sc. Computer Science या वर्गांना सुरु झाला आहे. पुढील वर्षापासून तो T. Y. B. Sc. Computer Science या वर्गाला देखील नैसर्गिक पध्दतीने सुरु होईल.
■ F. Y. B. Sc. विषय
या वर्गाला प्रवेश घेतल्यानंतर पदवीच्या पहिल्या वर्गाला
1. Computer
2. Mathematics
3. Electronics
4. Statistics
हे विषय असून महाराष्ट्रात सर्वच कॉलेजमध्ये हा अभ्यासक्रम विनाअनुदानित तत्त्वावर चालविला जातो. त्यामुळे या अभ्यासक्रमाची फी २५ ते ३० हजार रूपये साधारणत: असते. हा विषय संपूर्ण प्रॅक्टीकलचा असल्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात Computer Lab उपलब्ध असते.
■ पदवी अभ्यासक्रम
इयत्ता बारावी सायन्सला Mathematics विषय घेतलेले विद्यार्थी B. Sc. Computer Science च्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात. याचे तीन वर्ष F. Y. B. Sc. Computer Science, S. Y. B. Sc. Computer Science, T. Y. B. Sc. Computer Science या नावाने संबोधले जातात. तीन वर्षांचा हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्याला विद्यापीठाकडून पदवी मिळते. पुढील अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला व भवितव्यातील करिअरसाठी पदवीला विद्यार्थ्यांनी साठ टक्क्यांपेक्षा अधिक मार्क मिळविणे केव्हाही फायद्याचे असते हे लक्षात ठेवा.
■ इतरही कोर्सेस करता येतात
पदवीचे शिक्षण चालू असताना विद्यार्थ्याने महाविद्यालयात चालणारे स्किल डेव्हलपमेंट अंतर्गत चालणारे कोर्सेस करावेत. त्यामुळे मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून जॉब करू शकतो. आपल्या परिसरात सायबर कॅफे टाकून स्वतःच्या पायावर आर्थिक दृष्टया उभे राहून शिक्षण घेऊ शकतो हे लक्षात घ्या.
■ पदवी नंतरचे असंख्य पर्याय
विद्यार्थ्याने B. Sc. Computer Science मध्ये पदवी मिळवल्यानंतर असंख्य पर्याय करिअरचे उपलब्ध आहेत त्यामध्ये
1. M. Sc. Computer Science
2. M. C. A.
3. M. B. A.( Systems )
4. Web Development Diploma
5. Advanced Diploma in Development
6. M. Sc. Mathematics
7. BPO, KPO, Oracle Microsoft, Sun Microsystems, Red Hat Testing चे आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र कोर्सेस विद्यार्थी करू शकतो.
8. आंतरराष्ट्रीय विद्यापीठात M. S. करता येते. U. K., Australia Singapore इत्यादी देशांमध्ये
■ इतरही पर्याय
इतर क्षेत्राची आवड असणाऱ्या विद्यार्थ्याना पारंपरिक करिअर करता येते. थोडक्यात B. Sc. Computer Science चा पदवीधर
1. L. L. B.
2. M. B. A.
3. M. S. W.
4. B. Ed.
5. B. Lib.
6. B. P. Ed.
इत्यादी अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतो. तसेच एमपीएससी, युपीएससी, बँक, रेल्वे, पोस्ट खाते, कर्मचारी निवड आयोग इत्यादींच्या स्पर्धा परीक्षा देऊ शकतो. हा विषय आंतरराष्ट्रीय आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना असंख्य संधी आहेत हे लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो हा लेख लिहित असतांना या क्षेत्रातील एक्सपर्ट प्राचार्य डॉ. एस. एन. शिंदे, प्रा. सी. डी. चौधरी, प्रा. गिरीश वाघ यांच्याशी केलेल्या चर्चेचा खूप उपयोग झाला आहे हे नमूद करावयाला मनस्वी आनंद होत आहे.
( लेखक इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयाचे उपप्राचार्य असून स्पर्धा परीक्षांचे महाराष्ट्रातील लोकप्रिय मार्गदर्शक आहेत. विविध विषयांवर त्यांची मार्गदर्शक पुस्तके प्रसिद्ध आहेत.)
◆ लेखांक १ साठी क्लिक करा
https://igatpurinama.in/archives/1815
◆ लेखांक २ साठी क्लिक करा
https://igatpurinama.in/archives/1838
◆ लेखांक ३ साठी क्लिक करा
https://igatpurinama.in/archives/1887
◆ लेखांक ४ साठी क्लिक करा
https://igatpurinama.in/archives/1921
◆ लेखांक ५ साठी क्लिक करा
2 Comments