इगतपुरीनामा न्यूज – सामाजिक कार्यकर्ते प्रवीण ( पप्पू ) कडू यांची कन्या कार्तिकी प्रवीण कडू हिचा दुसरा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. यानिमित्त वाकी ( डहाळेवाडी ) जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रमही राबवण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांना गळ्यातील दर्जेदार टाय आणि पाणी पिण्याच्या उत्तम बॉटल आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी […]
इगतपुरीनामा न्यूज – डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या सौजन्याने आज देशभरात जिल्हा तालुका स्तरावरील सरकारी कार्यालयांच्या आवारासह प्रमुख रस्त्यांची साफसफाई करण्यासाठी स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभियान मोहिमेचे स्वच्छतादूत म्हणून राज्यपालांनी डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची नियुक्ती केली […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील साकुरफाटा येथे खासदार राजाभाऊ वाजे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव यांच्या नेतृत्वाखाली समाजसेवक राधाकिसन झनकर यांनी महाशिवरात्रीचे औचित्य साधून सर्वतीर्थ टाकेदकडे जाणाऱ्या भाविकांना फराळाचे वाटप केले. इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद हे रामायणकालीन अत्यंत महत्त्वाचे असे ठिकाण असल्याने साकुरफाट्यावरून भाविक, महिला, आबालवृद्ध दर्शनासाठी जात असतात. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर साकुरफाट्यावरून बम बम भोलेचा जयघोष […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील निनावी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मॉडेल स्कुलमध्ये इयत्ता पहिलीच्या डिजिटल वर्गखोलीचे उदघाटन संपन्न झाले. केंद्रप्रमुख अनिल पगार, सरपंच गणेश टोचे यांच्या हस्ते नुकतेच डिजिटल वर्गखोली कार्यान्वित करण्यात आली. इगतपुरीचे गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, शिक्षण विस्ताराधिकारी किशोर सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका सुशीला चोथवे यांच्या प्रयत्नातून इयत्ता पहिलीचा […]
इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेमध्ये आनंदतरंग फाउंडेशन वाघेरे निर्मित “हॅप्पी बर्थ डे” या बालनाट्याने राज्यस्तरीय तृतीय क्रमांक पटकावला आहे. नाशिक येथील महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग तथा सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित २१ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत ह्या बालनाट्याला नाशिक जिल्ह्यातून प्रथम तर विभागीय स्तरावर द्वितीय क्रमांक मिळाला होता. बालनाट्य लेखनाचे प्रथम पारितोषिक […]
इगतपुरीनामा न्यूज – शेणवड बुद्रुक जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा संपन्न झाला. आज सकाळी ८ वाजेपासून ह्या मेळाव्याला प्रारंभ झाला आहे. गावासह परिसरातील ग्रामस्थ, विद्यार्थ्यांचे पालक आदींनी उपस्थित राहून मेळाव्याचा आनंद लुटला. शाळेतील विद्यार्थ्यांनी भाजीपाला, खाण्याचे स्टॉल, वडापाव, पाणीपुरी, खाऊचे दुकान, चहा, रस, फळाचे स्टॉल, चायनीज, मन्चुरिअन स्टॉल लावले आहेत. भविष्यात विद्यार्थ्यांना व्यवसायाची आवड […]
इगतपुरीनामा न्यूज – ‘रामकृष्णहरी’ हा मंत्र म्हणजे वारकऱ्यांचा आत्माच.. हा आत्मा पांडुरंग परमात्म्याच्या इच्छेनेच चालतो. वृक्षाचिये पाने हाले त्याचे सत्ते, कोण बोलवितो हरिवीण ह्या अभंगावर अनेकांची श्रद्धा आहे. प्रत्येक माणसामध्येही हाच पंढरीचा पांडुरंग वास्तव्य करतो हा भक्तीभाव मनात ठेवून काम करणारा बोराडे परिवार आहे. पांडुरंगी मन रमवून ह्या पांडुरंगाच्या भक्तीरंगात बोराडे परिवार आपला उद्योग व्यवसाय […]
इगतपुरीनामा न्यूज – नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित इगतपुरी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबीर फांगुळगव्हाण येथे संपन्न झाले. १९ ते २५ जानेवारी या कालावधीत आयोजित ह्या शिबीरात युथ फॉर माय भारत युथ फॉर डिजिटल लिटरसी या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रम राबविण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा […]
इगतपुरीनामा न्यूज – सर्वत्र रक्ताचा तुटवडा असल्याने मोठी वाचू शकणाऱ्यांचा प्राण धोक्यात आलेला आहे. रक्ताचे संकलन होणे काळाची गरज असून यामुळे अनेकांचे प्राण वाचवण्यासाठी हातभार लागतो. केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष तथा केमिस्ट हृदयसम्राट जगन्नाथ शिंदे यांच्या अमृतमहोत्सवी ७५ व्या वाढदिवसानिमित्त राज्यभर ७५ हजार रक्त पिशव्या जमा करण्याचा कार्यक्रम आज संपन्न झाला. त्यानुसार नाशिक जिल्हा […]
इगतपुरीनामा न्यूज : इगतपुरी येथील संजीवनी माध्यमिक आश्रमशाळेत राजमाता जिजाऊ आईसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मुंबई येथील राजीव मोरे फाऊंडेशनचे अध्यक्ष वैभव मोरे हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना यावेळी फाऊंडेशनकडून विविध प्रकारची वाचनीय पुस्तके आणि खेळ साहित्य भेट स्वरूपात प्रदान करण्यात आले. राजीव मोरे फाऊंडेशन ही […]