घोटी येथे उद्यापासून शतकोत्तर रौप्य महोत्सवी भव्यदिव्य अखंड हरिनाम सप्ताह : जोग महाराज भजनी मठ आणि तालुक्यातील भाविकांकडून आयोजन

इगतपुरीनामा न्यूज – जगद्‌गुरु श्री तुकोबाराय यांचा सदेह वैकुंठगमनाचा त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवासह इगतपुरी येथे स्वानंदसुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराजांनी जगद्‌गुरु श्री तुकोबारायांच्या सद्गुरु अनुग्रहाच्या निमित्ताने माघ शुद्ध दशमीला सुरु केलेल्या नाम सप्ताहाचा यावर्षी शतकोत्तर रौप्य महोत्सव अर्थात १२५ वे वर्ष आहे. या दोन्ही महोत्सवाच्या निमित्ताने भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. घोटी कृषी […]

‘अवघा रंग पांडुरंग’- संस्कृती आणि संस्कार जपण्यासाठी नवदुर्गांचा भरवला मेळा : साई सारीज कलेक्शनतर्फे महिलांसाठी विविध अनोखे उपक्रम

इगतपुरीनामा न्यूज – ‘रामकृष्णहरी’ हा मंत्र म्हणजे वारकऱ्यांचा आत्माच.. हा आत्मा पांडुरंग परमात्म्याच्या इच्छेनेच चालतो. वृक्षाचिये पाने हाले त्याचे सत्ते, कोण बोलवितो हरिवीण ह्या अभंगावर अनेकांची श्रद्धा आहे. प्रत्येक माणसामध्येही हाच पंढरीचा पांडुरंग वास्तव्य करतो हा भक्तीभाव मनात ठेवून काम करणारा बोराडे परिवार आहे. पांडुरंगी मन रमवून ह्या पांडुरंगाच्या भक्तीरंगात बोराडे परिवार आपला उद्योग व्यवसाय […]

सद्गुरु सच्चिदानंद संत श्रीपाद बाबा व संत रामदास बाबा पुण्यतिथी सोहळा संपन्न : राज्यभरातून भाविकांनी घोटीतील सोहळ्यात घेतला सहभाग

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील घोटी बुद्रुक येथे सद्गुरु सच्चिदानंद संत श्रीपाद बाबा व सद्गुरु सच्चिदानंद संत रामदास बाबा या थोर संत महात्म्यांचा २७ वा पुण्यतिथी सोहळा राज्यभरातील व राज्याच्या बाहेरील सर्व साधक मायबापांच्या उपस्थितीत पार पडला. या पुण्यतिथी सोहळ्यामध्ये कीर्तन प्रवचन आदी कार्यक्रमांसह घोटी नगरीत भव्य पालखी सोहळा पार पडला. अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती यासोबतच […]

महंत ठाणापती ब्रम्हलीन ब्रम्हगिरी महाराज अशोकबाबा यांचा षोढशी कार्यक्रम संपन्न : हजारो भाविकांनी घेतले समाधी दर्शन

इगतपुरीनामा न्यूज – त्र्यंबकेश्वर येथील आवाहन आखाड्याचे ठाणापती, अंजनीमाता, बालहनुमान मंदिर आश्रमाचे महंत ब्रम्हगिरी महाराज अशोकबाबा गुरुवारी ५ डिसेंबरला ब्रम्हमुहूर्तावर पहाटे ब्रम्हलीन झाले. संपूर्ण त्र्यंबकेश्वर शहरातून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. अंजनेरी येथील अंजनी माता मंदिराशेजारी समाधी सोहळा व पूजन झाले. यावेळी त्र्यंबकेश्वर व परिसरातील अनेक भाविकांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले. सोळाव्या दिवशी साधू महंत परंपरेनुसार […]

नवरात्री स्पेशल – रांगोळीतून साकारल्या मनमोहक नवदुर्गा….!

किरण घायदार : इगतपुरीनामा न्यूज – नवरात्र महोत्सवात दुर्गा देवीची नानाविध रूपातील पूजा बांधली जाते. देवीची ही रूपे मन प्रसन्न करून जातात. अशी देवीची नऊ वेगवेगळी आकर्षित व मनमोहक रूपे रांगोळीतून साकारली आहेत माधुरी पैठणकर यांनी…..रांगोळी आर्टिस्ट माधुरी पैठणकर यांनी त्यांच्या अंगणात त्यांनी या रांगोळ्या काढल्या आहेत. रांगोळीतून साकारलेली देवी दुर्गेची ही विविध रूपे नजर […]

निसर्गाच्या सान्निध्यात पाडळीच्या श्री सिद्धिविनायक गणेश मंदिरात भाविकांची मांदियाळी

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज – पाडळी देशमुख येथील श्री सिद्धिविनायक गणेशाचे मनमोहक, आकर्षक व निसर्गरम्य वातावरणात असलेले मंदिर भाविक वा गणेश भक्तांचे श्रद्धास्थान आहे. गणेशोत्सव काळात हा परिसर भाविक भक्तांच्या गर्दीने फुलून निघत आहे. येथील मनमोहक मंदिरामुळे इगतपुरी तालुक्याच्या पर्यटनात भर पडली आहे. संजय अनंत तुपसाखरे यांनी आपल्या स्वतःच्या जमिनीत श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर […]

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाडीवऱ्हे येथे शांतता समितीची बैठक संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – समाज जागृतीच्या हेतूने सुरू झालेल्या गणेशोत्सवाची परंपरा गणेश मंडळांनी ठेवत ठेवावी. नियमांचे तंतोतंत पालन करून उत्सवाला गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नसून सामाजिक जबाबदारीने काम करावे असे आवाहन वाडीवऱ्हेचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी केले. वाडीवऱ्हे येथे आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक घेण्यात आली. […]

नाशिकच्या घरामध्ये अवतरले वारली रामायण ; हरहुन्नरी आदिवासी कलाकार युवकाची अप्रतिम कलाकृती

किरण घायदार : इगतपुरीनामा न्यूज – प्रभू श्रीराम आणि रामायण हे प्रत्येक हिंदू माणसाच्या मनातील श्रद्धास्थान आहे. आदिवासी वारली चित्रशैलीत रामायणातील प्रसंग भाजपचे‌ नेते व प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांच्या महात्मा नगरमधील नवीन वास्तूच्या दर्शनी भिंतीवर नुकतेच साकारण्यात आले आहेत. विक्रमगड येथील कृष्णा भुसारे या आदिवासी युवा चित्रकाराने वारली चित्रशैली तज्ज्ञ संजय देवधर यांच्या मार्गदर्शनाखाली ६ […]

पायी हळूहळू चाला..मुखाने नरेंद्रनाथ बोला !! – इगतपुरी ते कावनई जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज पायी दिंडी सोहळा उत्साहात

इगतपुरीनामा न्यूज –  इगतपुरी येथील राममंदिर ते कपिलधारा तीर्थ कावनई येथे जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज यांचा पायी दिंडी आध्यात्मिक वातावरणात संपन्न झाला. यावेळी जनम प्रवचनकार बिपिन नेवासकर, मोहन महाराज कुलकर्णी यांनी गुरुमाऊली यांचा संदेश आपल्या मार्गदर्शनातून उपस्थित भाविकांना समजून सांगितला. जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या कार्याची महती सांगून त्यांनी उपस्थितांना विविध प्रकारे मार्गदर्शन केले. ह्या सत्संगानिमित्त सकाळी […]

संजीवनी आश्रमशाळेत आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

इगतपुरीनामा न्यूज : इगतपुरी येथील महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती संघ संचलित संजीवनी आश्रमशाळेत आज आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आश्रमशाळेपासून पायी दिंडी काढत तळेगाव येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चिंचलेखैरे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक निवृत्ती तळपाडे […]

error: Content is protected !!