चार्टर्ड अकाऊंटंट व्हायचंय ? मग सोप्पं आहे..!
चार्टर्ड अकाऊंटंट अर्थात सीए व्हायचं असेल तर वयाचे बंधन नाही. तिन्हींपैकी कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण व्यक्ती ही परीक्षा देऊन आपलं स्वप्न पूर्ण करू शकतो. यासाठी दहावीनंतर लगेचच पूर्वतयारी केल्यास निश्चितपणे आपलं ध्येय गाठता येतं. याबाबत सहजसुलभ भाषेत विविध प्रकारे मार्गदर्शन आजच्या लेखांक ११ मध्ये केले आहे. लेखमालेतील आधीचे लेख वाचण्यासाठी शेवटी लेखाच्या लिंक दिल्या आहेत.
- भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा
मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरी
उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय
संपर्क : 9822478463
■ दहावी नंतरची तयारी
इयत्ता दहावी नंतर आता Chartered Accountant म्हणजेच CA अर्थात सनदी लेखापाल व्हायचे असेल तर ICAI च्या नव्या नियमानुसार दहावी नंतर देखील विद्यार्थी नावनोंदणी करून हळूहळू तयारीला सुरुवात करु शकतो.
■ बारावी नंतर खूप चांगली संधी
इयत्ता बारावी कला, वाणिज्य व विज्ञान यापैकी कोणत्याही शाखेचा विद्यार्थी चार्टर्ड अकाउंटंट ( Chartered Accountant ) होऊ शकतो हे फार कमी लोकांना माहित आहे. फक्त कॉमर्स शाखेचा किंवा बारावी कॉमर्स झालेला अथवा कॉमर्सच्या पदवीला शिक्षण घेत असलेलाच विद्यार्थी CA होऊ शकतो किंवा CA ची परीक्षा देऊ शकतो असा काहींचा समज आहे. पण कोणत्याही शाखेचा बारावी उत्तीर्ण CA ची परीक्षा देऊ शकतो हे वरील सर्व शाखेच्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे.थोडक्यात इयत्ता बारावी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना ही फार मोठी संधी आहे.
■ चार्टर्ड अकाउंटंट
CA होण्यासाठी किमान बारावी उत्तीर्ण हवे. कोणतीही शाखा चालेल. ही परीक्षा The Institute of Chartered Accountants of India या संसदेच्या कायद्यान्वये अस्तित्वात आलेल्या संस्थेच्या वतीने घेतली जाते. या संस्थेची वेबसाईट www.icai.org ही असून या परीक्षेसाठी चार टप्प्यातून जावे लागते. हे चार टप्पे पुढीलप्रमाणे आहेत.
1. CA Foundation Course
2. CA Intermigiat Exam.
3. Article Ship
4. CA Final Exam
■ CA Foundation Course
इयत्ता बारावी उत्तीर्ण कोणत्याही शाखेचा विद्यार्थी CA Foundation Course साठी ICAI या संस्थेकडे नाव नोंदणी करू शकतो. आता नव्या नियमाप्रमाणे इयत्ता दहावीनंतर देखील नाव नोंदणी करु शकतो. मात्र परीक्षा बारावी उत्तीर्ण झाल्यानंतरच देता येते. CA Foundation साठी चार पेपर असतात.
1. Principals and Practice of Accounting
2. Business Laws and Business Correspondence and Reporting
3. Business Mathematics and Logical Reasoning and Statistics
4. Business Economics and Business and Commercial Knowledge
हे चार पेपर प्रत्येकी शंभर मार्कांचे असून यात प्रत्येक विषयाला चाळीस मार्क मिळणे आवश्यक असते. मात्र चारही पेपरची बेरीज 200 झाली पाहिजे. तरच पुढील परीक्षेला म्हणजे CA Intermediate या परीक्षेला विद्यार्थी पात्र ठरतो.
■ CA Intermediate
यासाठी ग्रुप एक मध्ये शंभर मार्कांचे चार पेपर असतात. ग्रुप दोन मध्ये शंभर मार्कांचे तीन पेपर असतात. दोन्ही ग्रुपमधील प्रत्येक पेपरला 40 मार्क मिळणे आवश्यक असून ग्रुप एकमध्ये चारही पेपरची बेरीज 200 व ग्रुप दोनमध्ये तीनही पेपरची बेरीज 150 होणे आवश्यक आहे.
■ Article Ship
Intermediate Exam. मध्ये कोणताही एक ग्रुप पास झाल्यानंतर CA फर्ममध्ये तीन वर्षांची Article Ship करावी लागते. तसे प्रमाणपत्र Principal ( म्हणजेच ज्या CA फर्मकडे Article Ship करतो त्यांचे ) असणे आवश्यक असते.
■ CA Final Exam.
CA Intermediate परीक्षा पास झाल्यानंतर व तीन वर्षांची Article Ship झाल्यानंतर CA Final Exam. साठी सदरहू उमेदवार पात्र असतो. CA Final Exam. साठी ग्रुप एकमध्ये चार पेपर व ग्रुप दोनमध्ये चार पेपर असतात. प्रत्येक पेपर 100 मार्कांचा असून प्रत्येक पेपरला 40 मार्क मिळणे आवश्यक असून ग्रुप एकमधील सर्व पेपरची बेरीज 200 तर ग्रुप दोनमधील सर्व पेपरची बेरीज 200 होणे आवश्यक असते.
■ इतर महत्त्वाच्या गोष्टी
1. CA परीक्षा पास झाल्यानंतर खाजगी प्रॅक्टीस अथवा फर्मसाठी ICAI कडून COP ( Certificate of Practice ) घ्यावे लागते.
2. विद्यार्थ्याने व्यावसायिक ज्ञान सतत आत्मसात करणे आवश्यक आहे.
3. आता नव्या नियमाप्रमाणे CA ची पदवी PG समकक्ष मानली जाते.
4. CA पदवी बरोबरच कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
5. CA परीक्षा देण्यासाठी वयाचे बंधन नाही हे लक्षात घ्या.
6. ICAI ने प्रकाशित केलेली पुस्तके व अभ्याससाहित्य परीक्षेसाठी उपयुक्त आहे.
7. मेहनत, कष्ट घेण्याची तयारी, अभ्यासाची आवड आणि CA होण्याचे माझे ध्येय मी पूर्ण करेल ही भूमिका असेल तर अवघड काहीच नाही हे विद्यार्थ्यांनी सतत लक्षात ठेवावे.
लेखकाबद्धल थोडेसे..!
लेखक इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयाचे उपप्राचार्य असून स्पर्धा परीक्षांचे महाराष्ट्रातील नामवंत लोकप्रिय मार्गदर्शक आहेत. विविध विषयांवर त्यांची विविध मार्गदर्शक पुस्तके प्रसिद्ध आहेत.
◆ लेखांक १ साठी क्लिक करा
https://igatpurinama.in/archives/1815
◆ लेखांक २ साठी क्लिक करा
https://igatpurinama.in/archives/1838
◆ लेखांक ३ साठी क्लिक करा
https://igatpurinama.in/archives/1887
◆ लेखांक ४ साठी क्लिक करा
https://igatpurinama.in/archives/1921
◆ लेखांक ५ साठी क्लिक करा
https://igatpurinama.in/archives/1965
◆ लेखांक ६ साठी क्लिक करा
https://igatpurinama.in/archives/2018
◆ लेखांक ७ साठी क्लिक करा
https://igatpurinama.in/archives/2030
◆ लेखांक ८ साठी क्लिक करा
https://igatpurinama.in/archives/2067
◆ लेखांक ९ साठी क्लिक करा
https://igatpurinama.in/archives/2090
◆ लेखांक १० साठी क्लिक करा