दहावी बारावी नंतर पुढे काय ? लेखांक ९

मार्गदर्शक - प्रा. देविदास गिरी
उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय
संपर्क : 9822478463

इंजिनिअरिंग मधील संधी
इयत्ता दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांपैकी चांगले मार्क मिळालेले विद्यार्थी सायन्स शाखेचा पर्याय निवडताना दिसतात. असे असले तरी आजही सायन्सला येणाऱ्यांचे प्रमाण मोजकेच दिसते. अकरावी सायन्स, बारावी सायन्स झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी आहेत. इयत्ता बारावी सायन्स उत्तीर्ण झालेले विद्यार्थी इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाचा पर्याय निवडताना दिसून येते. कारण या क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत.

JEE – Mains and Advance
इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाला प्रवेश मिळण्यासाठी बारावी सायन्स नंतर PCM Group च्या विद्यार्थ्यांना JEE -Joint Entrance Exam ( Mains and Advance ) परीक्षा देता येते. या परीक्षेमार्फत देशातील IIT ( Indian Institute of Technology ) या संस्थांमध्ये अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळतो. IIT मध्ये प्रवेशासाठी JEE च्या Mains and Advanced या दोन्ही परीक्षा गुणवत्तेसह उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.

JEE -Mains
यामध्ये टॉपमध्ये आलेल्या दहा टक्के विद्यार्थ्यांना ( साधारणतः २ लाख ५० हजार विद्यार्थ्यांना ) JEE advance ला बसता येते. यात टॉपर विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार IIT मध्ये प्रवेश मिळतो. IIT ही देशातील तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च संस्था होय. यात प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थी दहावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यापासून अभ्यासाला प्रारंभ करतात. यात प्रवेश मिळण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात स्पर्धा असते.

देशपातळीवरील इतर संस्था
JEE JEE Mains परीक्षेत जे टॉपर मुले असतात त्यांना गुणवत्तेनुसार JEE-Advance परीक्षा न देता अखिल भारतीय पातळीवरील इंजिनिअरिंग कॉलेजेससाठी प्रवेश मिळतो. जसे की – NITs ( National Institutes of Technology ), IIITs ( Indian Institutes of Technology ), CFTIs ( Centrally Funded Technical Institutes ) या सारख्या उच्चस्तरीय संस्थांमध्ये इंजिनिअरिंगसाठी प्रवेश मिळतो हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे.

JEE – Mains चा Paper Pattern
ही परीक्षा Online Mode मध्ये घेतली जाते. या परीक्षेत Physics, Mathematics व Chemistry हे विषय असतात. प्रत्येक विषयाचे 25 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक बरोबर प्रश्नाला चार गुण असतात. एकूण 300 मार्कांचा पेपर असतो. यासाठी तीन तासांचा वेळ असतो. या परीक्षेसाठी इयत्ता अकरावी व बारावी सायन्सची CBSE बोर्डाची NCERT ने तयार केलेली पुस्तके विद्यार्थी अभ्यासतात. यातील अभ्यासक्रम हा या परीक्षेचा अभ्यासक्रम होय.

JEE – Advance परीक्षेचे स्वरूप
या परीक्षेचे स्वरूप दरवर्षी बदलते. त्याची माहिती व पॅटर्न NTA ( National Testing Agency ) च्या संकेतस्थळावर दिलेली असते. विद्यार्थ्यांनी त्याचे अवलोकन करणे महत्त्वाचे असते.

राज्यस्तरीय कॉलेज मधील प्रवेश
त्या त्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना आपल्या राज्यातल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी त्या त्या राज्याची CET – Common Entrance Test देणे गरजेचे असते. महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय पातळीवर प्रवेश मिळविण्यासाठी MHT – CET देणे गरजेचे आहे. या CET मध्ये मिळालेल्या Percentile गुणांवरून महाराष्ट्रातल्या Engineering College मध्ये प्रवेश घेता येतो.

CET स्वरूप व अभ्यासक्रम
Physics, Chemistry व Mathematics या तीन विषयांवर प्रश्न विचारले जातात. Physics व Chemistry चे प्रत्येकी 50 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला एक गुण असतो. एकूण गुण 100 असतात. Mathematics वर 50 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्न दोन गुणांचा असून एकूण 100 गुण असतात. अशाप्रकारे 200 गुणांची ही प्रश्नपत्रिका असते. परीक्षा Online Mode मध्ये घेतली जाते. यासाठी तीन तास वेळ असतो. CET च्या तयारीसाठी इयत्ता अकरावी व बारावी सायन्सच्या HSC बोर्डाची पुस्तके व त्यातील अभ्यासक्रम हा या परीक्षेचा अभ्यासक्रम असून 80 टक्के प्रश्न बारावीच्या अभ्यासक्रमावर तर 20 टक्के प्रश्न अकरावीच्या अभ्यासक्रमावर विचारले जातात.

लेखक इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयाचे उपप्राचार्य असून स्पर्धा परीक्षांचे महाराष्ट्रातील लोकप्रिय मार्गदर्शक आहेत. विविध विषयांवर त्यांची विविध मार्गदर्शक पुस्तके प्रसिद्ध आहेत.

लेखांक १ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/1815

लेखांक २ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/1838

लेखांक ३ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/1887

लेखांक ४ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/1921

लेखांक ५ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/1965

लेखांक ६ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2018

लेखांक ७ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2030

लेखांक ८ साठी क्लिक करा

https://igatpurinama.in/archives/2067

Similar Posts

2 Comments

  1. avatar
    Anuja V says:

    नमस्ते सर. प्रत्येक लेखात/ अंकात खुपच महत्त्वपूर्ण मार्गदर्शन. धन्यवाद सर.

Leave a Reply

error: Content is protected !!