इगतपुरीनामा न्यूज, दि. १२
इगतपुरी तालुक्यातील खेडभैरव परिसरातील गांगरवाडी येथे आज बुधवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. इगतपुरीच्या पूर्व भागात गेल्या दोन वर्षांपासून बिबट्यांची दहशत पहायला मिळत आहे. खेड येथील गांगरवाडी परिसरात वन विभागाने आज चार वाजेच्या सुमारास पिंजरा लावला होता. नंतर लगेचच संध्याकाळी सहा ते साडेसहा वाजेच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला आहे. मात्र परिसरात आणखी बिबटे असल्याची शक्यता स्थानिक ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे बिबट्या पिंजऱ्यात अडकल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अगोदर तेथील स्थानिक नागरिक पोहचले होते. त्यानंतर नागरिकांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. स्थानिक ग्रामस्थांनी बिबट्याला पाहण्यासाठी झुंबड केली होती.
व्हिडीओ पहा