इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी राज्य आदर्श पुरस्कार प्राप्त तंत्रस्नेही शिक्षक सिद्धार्थ सपकाळे यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी संघटनेच्या राज्य शाखेच्या सहविचार सभेत संघटनेचे राज्याध्यक्ष तथा सर्व कार्यकारिणी यांच्या ऑनलाईन बैठकीत सिध्दार्थ सपकाळे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. परंतु सपकाळे यांना सदर निवड मान्य नव्हती. भारतरत्न […]
इगतपुरीनामा न्यूज – श्री शंकराचार्य संस्कृत युनिव्हर्सिटी, कलाडी, केरळ येथे अखिल भारतीय विद्यापीठ स्तरावरील शरीरसौष्ठव स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत नाशिप्र संचालित इगतपुरी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाचे दोन विद्यार्थी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सहभागी झाले होते. या स्पर्धेत ७० किलो वजनी गटात प्रथम वर्ष वाणिज्य शाखेतील गणेश भागडे याने गोल्ड मेडल पटकावले. ६५ किलो […]
इगतपुरीनामा न्यूज – छत्रपती शिवरायांचे विचार व्याख्यानाद्वारे पोहचविण्याचे महत्वपूर्ण काम करणारी जानोरीची बाल शिवचरित्रकार कु. प्रतीक्षा एकनाथ बोराडे हिला मनु मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा ‘कन्यारत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. संस्थेच्या संस्थापक मेघाताई शिंपी यांनी याबाबत आज घोषणा केली. कु. प्रतीक्षा बोराडे हिचे या पुरस्काराबाबत अभिनंदन होत आहे. जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने ९ मार्चला श्री […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील कऱ्होळे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत इगतपुरी तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक तथा इगतपुरी विधानसभा अध्यक्ष पांडुरंग खातळे यांच्या शेतकरी विकास पॅनलने बाजी मारली आहे. संपूर्ण १२ जागांपैकी आज ७ जागांची मतमोजणी पार पडली. ह्या ७ जागा आणि यापूर्वीव बिनविरोध झालेल्या ५ जागा अशा १२ जागा जिंकून शेतकरी विकास […]
इगतपुरीनामा न्यूज – दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड मैनेजमेंट अकाउंटंटस ऑफ इंडियातर्फे संपूर्ण भारतभर सीएमए इंटरमेडीएट परीक्षा घेतली जाते. यामध्ये नाशिक शाखेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. सीएमए इंटरमेडीएट परीक्षेत ३० व २०२४ च्या अंतिम परीक्षेत १४ विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत यावर्षीही उत्तम यश संपादन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच आयएमआरटी […]
इगतपुरीनामा न्यूज – गोंदे दुमाला येथील विद्यार्थ्यांनी हैदराबाद येथे नुकत्याच झालेल्या इंडियन ऑलिंपियाड नॅशनल लेव्हल अबॅकस स्पर्धेत गोंदे दुमाला येथील विद्यार्थी वेदांत गणेश शेळके व अलोक मधुकर नाठे यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे. इंडियन ऑलिंपियाड तर्फे अबॅकस मानसिक अंकगणितीय राष्ट्रीयस्तरीय स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये १५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामधून आय जीनियस […]
ज्ञानेश्वर मेढेपाटील : इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र राज्य ॲथेलॅटिक असोसिएशन, सोलापूर जिल्हा ॲथेलॅटिक्स असोसिएशन व अजिंक्य स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर येथे राज्यस्तरीय दोन दिवसीय मैदानी सब ज्युनियर गटाच्या राज्यस्तरीय ॲथेलॅटिक्स स्पर्धेची यशस्वी सांगता झाली. या स्पर्धेत ८, १०, १२, १४ वर्षे व मुले आणि मुली या वयोगटाचा समावेश होता. यामध्ये त्र्यंबकराज ॲथेलॅटिक ग्रुपच्या […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्याच्या अतिदुर्गम आदिवासी भागातील उघडेवाडी देवळे येथील आदिवासी ठाकूर समाजातील प्रा. डॉ. सखाराम सन्या उघडे यांनी शैक्षणिक क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली आहे. नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ३० व्या दीक्षांत समारंभात महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी “यशवंतराव चव्हाण” सुवर्णपदकाने सन्मानित केले. मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन यामध्ये विशेष प्राविण्याने […]
इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेमध्ये आनंदतरंग फाउंडेशन वाघेरे निर्मित “हॅप्पी बर्थ डे” या बालनाट्याने राज्यस्तरीय तृतीय क्रमांक पटकावला आहे. नाशिक येथील महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग तथा सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित २१ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत ह्या बालनाट्याला नाशिक जिल्ह्यातून प्रथम तर विभागीय स्तरावर द्वितीय क्रमांक मिळाला होता. बालनाट्य लेखनाचे प्रथम पारितोषिक […]
इगतपुरीनामा न्यूज – आदिवासी दुर्गम भागात आदिवासी बांधवांच्या समस्यांना वाचा फोडणारे पत्रकार प्रा. तुकाराम रोकडे यांना नाशिकच्या मनू मानसी महिला सेवाभावी संस्थेच्या वतीने पत्रकार भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. नाशिक येथील श्री स्वामी समर्थ सभागृहात पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वेगवेगळ्या वृत्तपत्रातून वृत्तांकन करणाऱ्या अठरा पत्रकारांना आणि पंधरा वृत्तवाहिनी पत्रकारांना पत्रकार भूषण […]