इगतपुरीजवळ भीषण अपघातात १ ठार ; १ गंभीर जखमी : २ तासांच्या अथक प्रयत्नांनी अपघातग्रस्त वाहनातुन काढले बाहेर

इगतपुरीनामा न्यूज, दि. २७

मुंबई आग्रा महामार्गावरील इगतपुरी नांदगाव फाट्यावर
आज पहाटेच्या सुमाराला आयशरने कंटेनरला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. ह्या घटनेत 1 जण जागीच ठार तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे. दोघेही आयशरमध्ये अडकलेले होते. त्यांना 2 तासांच्या अथक प्रयत्नांनी बाहेर काढण्यात आले. त्यातील गंभीर जखमीला टोलनाका रुग्णवाहिकेने इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.

MH 20 AL 3977 ह्या क्रमांकाच्या आयशरने HR 46 E 1716 या कंटेनरला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. यामध्ये संजीव कुमार वय 22 रा. फिरोजाबाद उत्तरप्रदेश हा जागीच ठार झाला आहे. क्लिन्नर गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. महामार्ग पोलीस केंद्र घोटी कर्मचारी हरिश्चंद्र गुजरे, जितू पाटोळे, निंबेकर, अनिकेत जाधव, सागर कापसे, इगतपुरीचे पोलीस निरीक्षक वसंत पथवे, विजय रुद्रे, ए. एस. बोराडे, देवा वाघ, जस्सी भाई, आपत्ती व्यवस्थापन टीम, रूट पेट्रोलिंग टीम यांनी मदतकार्य केले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!