खेडभैरव ग्रामसेविकेने दिलेल्या धमकी विरोधात ‘एल्गार’ कष्टकरी संघटना आक्रमक : बीडीओ यांना दिले निवेदन ; कारवाई न झाल्यास १५ ऑगस्टला करणार आंदोलन

इगतपुरीनामा न्यूज – खेडभैरव येथील ग्रामसेविकेला जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी आणि नागरिकांना त्यांचे हक्क मिळावे म्हणून तिची तक्रार इगतपुरीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे केल्याचा ग्रामसेविकेला राग आला. तिने एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मधे यांना सांगितले की तुम्ही माझी गटविकास अधिकारी यांच्याकडे खोटी तक्रार केल्यामुळे मी तुमच्यावर पोलीस केस करते. तिने एल्गार कष्टकरी संघटनेच्या अध्यक्षाला धमकी देणे म्हणजे आम्हा हजारो आदिवासी कष्टकरी बांधवाला धमकी दिली असा त्याचा अर्थ होतो. म्हणून संबंधित ग्रामसेविकेवर नागरिकांना धमकावून दहशत निर्माण केली म्हणून तातडीने कारवाई करावी अशी मागणी एल्गार कष्टकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने इगतपुरीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

खेडभैरव येथील एक आदिवासी महिला शबरी घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी अर्ज घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात गेली होती. कार्यालयात संबंधित ग्रामसेविका उपस्थित नसल्याने ग्रामसेविका कुठे गेल्या अशी विचारणा तिने केली. शासकीय कर्मचारी लोकसेवक असल्याने त्याला जाब विचारण्याचा प्रत्येक नागरिकाला भारतीय संविधानाने अधिकार दिला आहे. आम्ही त्याच अधिकाराने संबंधित ग्रामसेविकेला जाब विचारला. त्याचा राग येऊन संघटनेला पोलीस केस करण्याची धमकी देणाऱ्या कामचुकार ग्रामसेविकेचा आम्ही निषेध करतो असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतेवेळी एल्गार कष्टकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते हजर होते. संबंधित प्रकरणी दखल न घेतल्यास संघटनेच्या वतीने स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला आक्रमक आंदोलन करणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष भगवान मधे यांनी कळवले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!