इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी मिळावी. सर्व शेतकऱ्यांसाठी २४ तास अखंड वीज पुरवठा उपलब्ध करुन भारनियमन बंद करावे. इगतपुरी तालुक्याचे प्रमुख पीक असलेल्या भातासह व इतर पिकांना हमीभाव मिळावा. प्रचंड प्रमाणात वाढलेली महागाई कमी करावी, नवयुवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात यावा, पेट्रोल डिझेलची दरवाढ कमी करावी. घरगुती गॅसच्या किंमती कमी कराव्यात. […]
इगतपुरीनामा न्यूज – १९ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत सिन्नर येथे राज्याचे कृषिमंत्री ना. माणिकराव कोकाटे यांच्या संकल्पनेतून श्री “अन्न निरंतर” मिलेट फेस्टिवल २०२५ सुरु आहे. ह्या फेस्टिवलमध्ये आज खरेदीदार विक्रेता संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार एकूण त्यामध्ये मिलीगेंस, वसुंधरा ऑरगॅनिक परिवार, ए. बी. गृहोद्योग, रहेजा ग्रुप, सर्वज्ञ फूड्स, अश्विनी टांकसाळे हे ९ खरेदीदार […]
इगतपुरीनामा न्यूज – सोमठाणे येथील शिवसरस्वती फाउंडेशन आणि कृषी विभागातर्फे ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ या संकल्पने अंतर्गत मिलेट महोत्सवाला कृषिमंत्री ना. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते प्रारंभ झाला. कार्यक्रमाप्रसंगी नाशिकचे विभागीय कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जगदीश पाटील, आत्माचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशिद, माजी जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे आदी उपस्थित […]
इगतपुरीनामा न्यूज – सोमठाणे येथील शिवसरस्वती फाउंडेशन आणि कृषी विभागातर्फे ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ या संकल्पने अंतर्गत मिलेट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थांची संख्या कमी करून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा शेतमाल मिळावा या उद्देशाने ह्या महोत्सवात बचत गट उत्पादने, पौष्टिक तृणधान्य विक्री व प्रदर्शन होणार आहे. […]
इगतपुरीनामा न्यूज – मृद व जलसंधारण विभाग अंतर्गत इगतपुरी तालुक्यातील भरवीर खुर्द व चौरेवाडी येथील बालभैरवनाथ आदिवासी सहकारी उपसा जलसिंचन योजनेच्या प्रगतीपथावरील कामास जलसंधारण महामंडळ छ. संभाजी नगरचे व्यवस्थापकीय संचालक सुनिल कुशिरे यांनी भेट देऊन क्षेत्रीय पाहणी केली. कडवा धरणातुन पाणी उपलब्ध असलेल्या सिंचन योजनेच्या जॅकवेलचे काम व वितरण व्यवस्थेची त्तांनी पाहणी करून कामाबद्दल मार्गदर्शक […]
लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुऱ्हेचे शेतकरी राजू बोराडे यांची अस्वली स्टेशन जवळ उत्कृष्ठ गुलाबांची पाच वर्षांपासून शेती आहे. यावर्षी १७ गुंठ्यात नवीन गुलाब वाणाची निवड करून गुलाब शेतीचा प्रयोग त्यांनी यशस्वी केला आहे. त्यांनी कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेता स्वतःच्या बळावर गुलाबांची आधुनिक शेती यशस्वी केली आहे. व्हॅलेंटाईन डे […]
लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा नाशिक, दिंडोरी प्रणित शेतकरी उत्पादक कंपनीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक कृषी महोत्सवाचे उदघाटन कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले. यावेळी शेतकरी, मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते. कृषिमंत्री ॲड. कोकाटे यांनी विविध स्टॉलला भेट देऊन शेतकऱ्यांच्या उत्पादनाची माहिती घेतली. महोत्सवामध्ये कृषी […]
इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र शासन कृषि विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ‘आत्मा’ नाशिक आणि दिंडोरी प्रणित शेतकरी उत्पादक कंपनीच्या संयुक्त विद्यमाने नाशिकच्या यूथ फेस्टिव्हल मैदानावर ६ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारीपर्यंत जागतिक कृषी महोत्सवाचव आयोजन करण्यात आले आहे. या कृषी महोत्सवात विनामूल्य प्रवेश असल्याने शेतकरी आणि नागरिकांनी या महोत्सवात मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा असे आवाहन कृषी […]
इगतपुरीनामा न्यूज – शेतीशाळा कृषी विस्ताराचे सुलभ आणि प्रभावी माध्यम असल्यामुळे तालुका कृषी अधिकारी इगतपुरी रामदास मडके यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली इगतपुरी तालुक्यात विविध पिकांच्या शेतीशाळा राबविल्या जात आहेत. त्यानुसार शेणवड बुद्रुक येथे तालुका कृषी विभाग आणि ‘आत्मा’ अंतर्गत टोमॅटो पिकाची शेतीशाळा राबवण्यात येत आहे. यामध्ये टोमॅटो उत्पादक ३० शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना दर […]
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – वैतरणा धरण प्रकल्पासाठी तत्कालीन काळात संपादित झालेली ६२३ हेक्टर जमीन प्रत्यक्षात धरणासाठी वापरात नाही. त्यामुळे अतिरिक्त ठरलेली ही जमीन मूळ मालक शेतकऱ्यांना परत करावी ही दीर्घकाळाची मागणी आहे. काही दिवसांपूर्वी इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर ह्यांनी ह्या प्रकरणी अधिवेशनात विषय मांडला. मात्र कोकण पाटबंधारे मंडळाने २०२० मध्येच ह्या जमिनी जाहीर […]