
इगतपुरीनामा न्यूज, दि. २६
त्र्यंबकेश्वर पंचायत समितीचे माजी सभापती गणपत वाघ आणि श्रमजीवी संघटनेच्या वतीने देवगाव येथील अनेक गरीब कुटुंबांना मोफत धान्य वाटप करण्यात आले. लॉकडाऊनमुळे रोजगार नसलेले अनेक कुटुंब उपासमार सोसत होते. त्यांना मोफत धान्याचे वाटप केल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला.
कोरोनाच्या संसर्गामुळे गरीब कुटुंबाचा रोजगार बंद झाला आहे. त्यांच्या हाताला काम नाही. कुठलेही उत्पन्नाचे साधन नाही. शासनाने मोफत धान्य वाटपाचा निर्णय तर घेतला मात्र ज्यांना रेशनकार्ड नाही त्याच्या बाबत काहीही निर्णय घेतला नाही. म्हणून देवगाव येथील रेशनकार्ड नसलेल्या 35 कुटुंबातील लाभार्थ्यांना शासनाचे मोफत धान्य मिळाले नाही.
याबाबत श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या कुटुंबाला मदत करण्याचा निर्णय घेतला. संघटनेचे कार्यकर्ते वसंत इरते यांनी तात्काळ माजी सभापती गणपत वाघ यांच्याकडे याबाबत मदत मागितली. या कुटुंबाला धान्य उपलब्ध करून द्यावे अशी विनंती केली. श्री. वाघ यांनी तातडीने मदत करण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार आज देवगाव येथील 35 गरीब गरजू कुटुंबाला धान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी वसंत इरते, बारकू वारे, रोशन वारे, सोमा वारे, कोंडाजी वारे, पांडू वारे, गोपाळ पुंजारे, युवराज वारे, सुनील वारे, दीपक वारे आदी उपस्थित होते