
इगतपुरीनामा न्यूज : इगतपुरी येथील महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती संघ संचलित संजीवनी आश्रमशाळेत आज आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आश्रमशाळेपासून पायी दिंडी काढत तळेगाव येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चिंचलेखैरे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक निवृत्ती तळपाडे हे उपस्थित होते.
मुख्याध्यापक मनोज गोसावी यांच्यासह वैभव तुपे, अनिता जाधव, सचिन बस्ते, कपिल सारुक्ते, निशिगंधा पवार, सागर निकम, नंदकिशोर ढेपले आदींसह शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.