शुक्रवारी २ जूनला नांदगाव बुद्रुक येथे शेतकऱ्यांची महत्वपुर्ण बैठक

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथील हॉटेल माऊली दारणा धरणाजवळ शुक्रवारी २ जूनला सकाळी १० वाजता शेतकऱ्यांची तातडीची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. परिसरातील शेतकऱ्यानी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनेक कारणांनी शेतकरी संकटात सापडला आहे. खरीप हंगामाचे नियोजन, ऊस उत्पादकांना शासकीय एफआरपीप्रमाणे पैसे दिले जात नाही. शासनाने विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. शेतकऱ्याना न्याय मिळवून देण्यासाठी आणि इतर समस्या जाणून घेण्यासाठी ही बैठक महत्वाची आहे. ह्या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन बन्सी पाटील पागेरे, मनोज सहाणे, दादाभाऊ शिरसाठ, ॲड. भाऊसाहेब भोर, तुकाराम सहाणे, विष्णूपंत सहाणे, बाळासाहेब आवारी, मधुकर सहाणे, यादव सहाणे, अर्जुन भोर, गणपत दिवटे, संपत धोंगडे, भाऊसाहेब दिवटे, कमलाकर दवते, शिवाजी गुळवे, सुखदेव दिवटे, दत्तू दिवटे, सुखदेव काजळे, भाऊसाहेब गायकर, नारायण गायकर, ज्ञानेश्वर पागेरे, नाना जाधव, मनोहर जाधव, विठोबा संधान, नाना पाटील गायकर, विष्णुपंथ पागेरे, तानाजी गायकर, समाधान पागेरे, कचरू वाकचौरे आदींनी केले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!